ADVERTISEMENT
home / बिग बॉस
Big Boss Marathi 3: संग्राम समेळ आणि नेहा जोशीचा सहभाग असण्याची शक्यता

Big Boss Marathi 3: संग्राम समेळ आणि नेहा जोशीचा सहभाग असण्याची शक्यता

लवकरच बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व (Bigg Boss Marathi 3) सुरू होत आहे. सर्व प्रेक्षकांना आता या नव्या पर्वात कोणते कलाकार सहभागी होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. सोशल मीडियावर आता या नव्या पर्वाबद्दल चर्चा चालू आहे. बिग बॉसचे कोणतेही पर्व असो प्रत्येक पर्व हे गाजतेच. तसंच कोणत्याही भाषेतील बिग बॉस हे कितीही नावे प्रेक्षकांनी ठेवली तरीही बिग बॉसचा वेगळा असा चाहता वर्ग आहे आणि हा रियालिटी शो हमखास पाहिला जातो आणि त्याला टीआरपी मिळतोच. या नव्या हंगामात कोणकोणते मराठी कलाकार असणार आहेत याची आता चर्चा सुरू झाली आहे. 

Bigg Boss फेम निकी तांबोळीचे एका मागोमाग म्युझिक अल्बम रिलीज

नेहा जोशी आणि संग्रामचे नाव पुढे

बिग बॉस मराठीचे हे पर्व मे 2021 मध्ये सुरू होणार होते. पण महाराष्ट्रातील कोरोनाच्या (Coronavirus -Covid 19) परिस्थितीमुळे हे पर्व थोडे पुढे ढकलण्यात आले.  सध्या या रियालिटी शो च्या सेटचे काम चालू असून कोणती थीम असणार यावरही काम चालू आहे. तर दुसऱ्या बाजूला कोणत्या कलाकारांचा यामध्ये सहभाग असेल यावरही सध्या काम चालू आहे. मराठीतील दोन प्रसिद्ध नावे संग्राम समेळ (Sangram  Samel) आणि अभिनेत्री नेहा जोशी (Neha Joshi) ही दोन नावं सध्या यादीमध्ये पुढे आलेली दिसून येत आहे. हे दोन्ही चेहरे मराठीमध्ये प्रसिद्ध आहेत. या दोन्ही कलाकारांनी कोणतीही माहिती दिली नसली तरीही हे दोघेही या पर्वामध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. सध्या या रियालिटी शो साठी कलाकारांना विचारणा होत असून लवकरच नावे फायनल करण्यात येतील. त्यामुळे सर्वच चाहत्यांना यावर्षी कोण कोण पाहायला मिळणार आणि यावर्षीचे पर्व कसे असणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. हा शो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी वादग्रस्त ठरतो. विशेषतः या शो मध्ये अनेकदा प्रेमप्रकरणं गाजतात. त्यामुळे आता निर्माते नक्की कोणकोणते असे मराठी कलाकार घेऊन येणार आहेत याबाबत सर्वांनाचा उत्सुकता आहे. 

#KKK11 प्रेक्षकांना खिळवून ठेवायला तयार, राहुल वैद्यचा पहिला प्रोमो

ADVERTISEMENT

जुलैमध्ये होणार सुरू

बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व लवकरच सुरू होणार असा पहिला प्रोमो आला आहे. या प्रोमोलाही प्रेक्षकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र या शो ची तारीख नक्की काय आहे याची घोषणा करण्यात आलेली नाही. तर जुलै महिन्यात हा शो सुरू करण्यात येईल असा अंदाज आहे. सध्या याच्या सेट आणि थीमवर काम सुरू असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. मात्र याची नेमकी तारीख काय आहे याची घोषणा झालेली नाही. तर लवकरच याबाबतही माहिती देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. गेल्यावर्षी कोविडमुळे हे पर्व होऊ शकले नाही. त्यामुळे यावर्षी मराठीचा हंगाम खूप गाजावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. तसंच त्यांचे आवडते कलाकार यावेळी सहभागी व्हावेत असंही चाहत्यांना वाटत आहे. पहिले दोन पर्वदेखील कलाकारांनी गाजवले आहे. पहिल्या पर्वात मेघा धाडे (Megha Dhade) आणि दुसऱ्या पर्वात शिव ठाकरे (Shiv Thakare) या दोघांनीही प्रेक्षकांचे मन जिंकत बिग बॉस गाजवले. या पर्वातही निवेदनाची धुरा महेश मांजरेकर सांभाळणार आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून महेश मांजरेकर यांनी याची काहीच दिवसांपूर्वी घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रेक्षक आतुरतेने या पर्वाची वाट पाहत आहेत हे नक्की! 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

24 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT