नवा कॅप्टन निवडण्यासाठी घरात सुरु असलेले देवदूत आणि राक्षस कार्य पार पडले असून सध्या घरात नव्या कॅप्टनचे वार वाहात आहेत. घरात नवा कॅप्टन निवडण्यासाठी जे कार्य पार पडले त्यातून चार स्पर्धकांची निवड ही कॅप्टन पदाच्या दावेदारीसाठी करण्यात आली आहे. यामध्ये स्नेहा, गायत्री, सोनाली,तृप्ती यांची निवड झाली आहे. सोनाली, गायत्री, स्नेहा पहिल्यांदाच कॅप्टन्सी पदासाठी दावेदार म्हणून समोर आल्या. पण त्यामध्येही ट्विस्ट पाहायला मिळाला. कारण या चौघांमधून दोघांनी नावं खेळासाठी पुढे करण्यात आली. स्नेहा आणि तृप्ती यांचे नाव सर्वानुमते पुढे आल्यामुळे घरात अनेक समीकरणं बदलणार आहे असे दिसून येत आहे.
आईना का बाईना… झाला राडा
घरात कॅप्टन निवडण्यासाठी आईना का बाईना खेळ घेण्यात आला. यामध्ये जो काही राडा झाला त्यामुळे तृप्ती देसाई यांना काही गोष्टी नक्कीच समोर आल्या आहेत. स्नेहाला कॅप्टन बनवण्यासाठी जयने जे काही केले त्यामुळे तृप्ती ताईंना दुखापत झाली. स्नेहा कॅप्टन पदासाठी योग्य दावेदार नव्हती अशी प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे. या खेळामध्ये घरात आखाडा करण्यात आला होता. या नुसार जास्तीत जास्त ट्रॉफी घेतलेला स्पर्धक कॅप्टन होणार आहे. त्यामुळे आता हा टास्क पुन्हा सुरु झाल्यानंतर कॅप्टन कोण होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
स्नेहाला मिळाली संधी
स्नेहा वाघचा खेळ गेल्याकाही दिवसांपासून अजिबात दिसत नाही. टास्कमध्ये तिचा तिच्यासाठीचा सक्रिय सहभाग हा फारच कमी झालेला आहे. त्यामुळे दोन आठवडे तिचा वावर अजिबात दिसला नाही. पण आता पुन्हा एकदा कॅप्टन्सी पदामुळे ती दिसू लागली आहे. कॅप्टन होण्यासाठी स्नेहाचा खेळ नाही तर जयचा सपोर्ट दिसत आहे. असे अनेकांचे म्हणणे आहे. या घरात टिकून राहण्यासाठी स्नेहाने जयला आधार घेतल्याचे दिसून आले आहे. घरात झालेल्या साप्ताहिक टास्कध्येही तिची कामगिरी इतरांपेक्षा कमी असताना देखील त्यांना संधी न मिळता स्नेहाला संधी मिळाल्यामुळे अनेकांनी धक्का बसला आहे.
विकास-विशालमध्ये नाराजी
विकास-विशाल या दोघांमध्ये नाराजी अजूनही कायम आहे. विशाल-विकास हे दोन वेगवेगळ्या टीमचे संचालक होते. विकासने विशालला बाहेर काढून टाकल्यानंतर विशालने हा राग धरुन विकासला टास्कमधून बाहेर काढले. त्यामुळे या दोघांमघ्ये नाराजी दिसून आली. ही नाराजी पुढे जाऊनही दिसली. या दोघांमध्ये फारसे बोलणे दिसून आलेले नाही. त्यामुळे प्रेक्षकही नाराज झाले आहेत. या दोघांपैकी नेमकं कोण चुकलं? असा एक प्रश्न आणि सर्व्हे फिरताना दिसत आहे. पण या दोघांनी विशेषत: विशालने खेळ समजून एकत्र राहावे असे अनेकांना वाटत आहे.
जय होतोय नारद
घरात एकमेकांना फूस लावण्याचे आणि ग्रुप तोडण्याचे योग्य काम हे जय दुधाणे आणि उत्कर्ष करताना दिसत आहे. घरातील इतरांना कोणतीही संधी मिळू नये यासाठी यांचा प्रयत्न सुरु आहे. घरात त्यांच्या गटातील लोकं जास्त असल्यामुळे साहजिकच सगळे निर्णय हे कायम जयच्या आणि उत्कर्षच्या गटाकडे जातात. नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये गायत्रीला संधी न देता स्नेहाला दिल्यामुळे मीरा आणि गायत्रीच्या मनात आता शंकेची पाल चुकचुकू लागली आहे. स्नेहासाठी जयने हे सगळे काही घडवून आणले असे अनेकांचे म्हणणे झाले आहे. तृप्ती ताईंना दावेदार बनवले असले तरी देखील त्यांचाही जय विरुद्ध राडा झालेला आहे. नव्या आलेल्या प्रोमोमध्ये या गोष्टी दिसून आल्या आहेत.
आता या नव्या कॅप्टन्सीमुळे नेमका काय गोंधळ होणार आणि त्यामुळे चावडीवर कोणाची शाळा घेतली जाणार हे पाहावे लागणार आहे.
अधिक वाचा
Bigg Boss Marathi: पिस्तूल गर्ल सोनाली पाटील
क्रिश 4′ साठी ह्रतिक रोशन बनला गायक,एक्शनसोबत दाखवणार गाण्याची जादू