ADVERTISEMENT
home / बिग बॉस
‘बिग बॉस मराठी 3' चे दरवाजे उघडणार आणि एकच आवाज घुमणार!

‘बिग बॉस मराठी 3′ चे दरवाजे उघडणार आणि एकच आवाज घुमणार!

कोरोनामुळे (Coronavirus) मागच्या वर्षी बिग बॉस मराठीचा सीझन झाला नाही. पण आता प्रतिक्षा संपली आहे. यावर्षी चाहत्यांसाठी बिग बॉस मराठीचा सीझन 3 (Bigg Boss Marathi 3) लवकरच येत असल्याची अधिकृत घोषणा सोशल मीडियावरून करण्यात आली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. पहिले दोन सीझन मराठीमध्ये खूपच गाजले. मेघा धाडे आणि शिव ठाकरे या दोघांनी अनुक्रमे हे दोन्ही सीझन जिंकले. पण आता या नव्या सीझनमध्ये नक्की कोणकोणते कलाकार असणार आणि काय धमाल येणार याची उत्सुकता सर्वच मराठी रसिकांना लागली आहे हे नक्की! तर या सीझनचे सूत्रसंचालनही अभिनेता – दिग्दर्शक – निवेदक महेश मांजरेकरच करणार असून ‘त्याच्यासोबत मी परत येतोय…तुम्ही तयार राहा’ असे ट्विट त्यानी केले आहे. त्यामुळे आता निवेदक कोण हे तर स्पष्ट झाले आहे. 

बिग बॉस’ची तयारी सुरु, यंदा 6 महिने चालणार हा रिअॅलिटी शो

वादग्रस्त असला तरीही आवडीचा रियालिटी शो

बिग बॉस कोणत्याही भाषेतील असो कितीही वादग्रस्त असला तरीही प्रेक्षकांच्या हा अगदी आवडीचा शो आहे. यातील भांडणे आणि स्वतः पुढे जाण्यासाठी करण्यात येणारे राजकारण आणि स्पर्धकांमधील शत्रूत्व आणि मैत्री या सगळ्याच गोष्टी अगदी मनापासून प्रेक्षकांना पाहायला आवडतात. विशेषतः या स्पर्धेतील टास्क आणि ते टास्क कोणते कलाकार कशा पद्धतीने पूर्ण करतात हे पाहणे जास्त मनोरंजक ठरते. आता मराठीतील तिसरा सीझन येत असल्याने प्रेक्षक नक्कीच आनंदी झाले आहेत. पहिल्या पर्वात मेघा धाडे (Megha Dhade) विजेती ठरली. तर लागोपाठ दुसरे पर्वही येऊन गेले. ज्यामध्ये शिव ठाकरे (Shiv Thakare) विजयी ठरला. मराठीमधील तिसरे पर्व कधी येणार याचीच सर्व जण आतुरतेने वाट पाहत होते. पण दोन सीझन लागोपाठ आल्यानंतर तिसऱ्या पर्वाला खूपच उशीर झाला. पण आता ही प्रतिक्षा संपली आहे. कारण ‘दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय बिग बॉस 3. लवकरच कलर्स मराठीवर’ असे कॅप्शन देत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 

शंतनू – शर्वरी लग्नसोहळा, मालिकांमधील लग्नसोहळे ठरत आहेत टीआरपीसाठी फायदेशीर

ADVERTISEMENT

स्पर्धक कोण याची उत्सुकता

कोणत्याही बिग बॉसमध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत याची प्रेक्षकांना आणि त्या कलाकारांच्या चाहत्यांना उत्सुकता असते. गेले दोन वर्ष कोरोनामुळे अनेक कलाकारांना काम नाही. त्यामुळे यावर्षी या सीझनमध्ये नक्की कोणकोणते कलाकार सहभागी होणार आहेत याची केवळ प्रेक्षकांनाच नाही तर अगदी तमाम मराठीतील कलाकारांनाही उत्सुकता असेल यात शंका नाही. मराठीच्या निवेदनाची धुरा पुन्हा एकदा महेश मांजरेकर यांनीच सांभाळली आहे. तर गेले दोन सीझन बघायला मराठी प्रेक्षकांना खूपच मजा आली. आता यावर्षी नक्की कोणती थीम असेल आणि कोणता फॉरमॅट पाहायला मिळेल याचीही चर्चा सुरू झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आवडते कलाकार असतील का? तसंच काही ओळखीचे आणि प्रसिद्ध चेहरेही सहभागी होतील का आणि यावर्षी नक्की काय काय घडेल या चर्चांनाही सुरूवात झाली आहे. नक्की हा सीझन कधी सुरू होणार याची तारीख घोषित करण्यात आलेली नाही. पण लवकरच हा सीझन सुरू होणार आहे. 

आमच्यात तसं काहीही नाही तेजश्रीने केला त्या फोटोवरुन खुलासा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

21 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT