ADVERTISEMENT
home / मनोरंजन
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणार आहे या कलाकारांची एन्ट्री

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणार आहे या कलाकारांची एन्ट्री

मराठीतील रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ आता लवकरच सुरु होणार आहे. या रिअॅलिटी शोची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. बिग बॉस हिंदीनंतर लगेचच मराठी सुरु होईल अशी अपेक्षा होती. पण 2020 या वर्षात हा रिअॅलिटी शो होऊ शकला नाही. पण आता 2021 च्या वर्षात हा रिअॅलिटी शो  होणार आहे. वादग्रस्त असलेला असा शो मराठीतील दोन सीझन होताच एकदम हिट झाला. आता या रिअॅलिटी शोचा तिसरा सीझन येणार आहे. आता या तिसऱ्या सीझनमध्ये कोणते नवे चेहरे येणार याची चर्चाही जोरदार होऊ लागली आहे. या तिसऱ्या सीझनमध्ये काही सेलिब्रिटी नावांची चर्चा  जोर धरु लागली आहे. काही लोकांची नावे यामध्ये पुढे येऊ लागली आहेत. जाणून घेऊया कोणत्या नावांची होत आहे यामध्ये चर्चा

मीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता, ‘अजूनही बरसात आहे’

 

या नावांची होत आहे चर्चा

काही मराठी सेलिब्रिटींची नावे ही प्रामुख्याने समोर येऊ लागली आहे. यामधील काही नावे ही फारच प्रसिद्ध अशा चेहऱ्याची आहे

ADVERTISEMENT

तेजश्री प्रधान: टीव्ही मालिकांमध्ये नावाजलेला चेहरा म्हणजे तेजश्री प्रधान. मालिकांमधून तिला अफाट अशी प्रसिद्धी मिळाली आहे. शशांक केतकरसोबत तिचे लग्न झाले. पण काहीच काळात ते लग्न मोडले. तयामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

 सुयश टिळक:  सुयश टिळक याचा नुकताच साखरपुडा झाला आहे. त्याची ही बातमी अनेकांसाठी धक्का देणारी होती. सुयश हा देखील त्याच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत होता. मालिका आणि चित्रपटांमधून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

दोन मुलांच्या जन्मानंतर ईशा देओलचा कमबॅक

संग्राम समेळ : मराठी मालिकेमधील आणखी एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे संग्राम समेळ. त्याने देखील आताच दुसरा विवाह केला आहे.  अनेक मालिकांमधून प्रसिद्धी मिळवलेला हा चेहरा  वेगवेगळ्या कॉन्ट्राव्हर्सीजमुळे देखील तितकाच सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा देखील जोरदार होऊ लागली आहे.

ADVERTISEMENT

अक्षया देवधर:तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अक्षया देवधर ही देखील तिच्या रिलेशनशीपमुळे खूपच चर्चेत आली होती. आता ती या शोमध्ये आल्यानंतर काही गोष्टींची चर्चा ही देखील होणारच आहे. त्यामुळे तिच्या नावाची देखील चर्चा होत आहे. 

ऋषी सक्सेना : काहे हिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अमराठी चेहरा म्हणजे ऋषी सक्सेना. त्याला देखील या मालिकेमुळे खूपच प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत त्याने काम केले होते. तो देखील या रिअॅलिटी शोमध्ये येणार असल्याची चर्चा होत आहे. 

अजून काही नावांची चर्चा देखील होत आहे. पण सध्या तरी ही नाव यामध्ये येत आहे. पण आता  रिअॅलिटी शोमध्ये नेमकं  कोण येतं ते तर हा शो सुरु झाल्यानंतरच कळू शकेल.

तारक मेहता का उल्टा चष्माला तेरा वर्षे पूर्ण

ADVERTISEMENT

बिग बॉसचे दोन सीझन हे चांगलेच गाजले होते. या सीझनमध्ये झालेली भांडणे देखील आजही अनेकांच्या लक्षात येतील. हिंदीप्रमाणे मराठीत अद्याप कॉन्ट्राव्हर्सी असलेला चेहरा आलेला नाही. पण आता या नव्या सीझनमध्ये  काही खास चेहरे येण्याची शक्यता आहे 

07 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT