बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमधून वर आलेला चेहरा म्हणजे शिव ठाकरे. रोडिजनंतर त्याला ज्या मराठी रिअॅलिटीने वेगळी ओळख करुन दिली. आता आपला मराठी माणून म्हटल्यावर शिव ठाकरेच नजरेसमोर येतो. सोशल मीडियावर त्याचे अनेक चाहते आहेत. तो सतत काहीना काही कारणास्तव चर्चेत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या व्हायरल होणाऱ्या नव्या फोटोमुळे या फोटोमध्ये तो तृतीयपंथीशी अदबीने बोलताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हसू आणि तृतीयपंथीच्या चेहऱ्यावरील समाधान या फोटोच्या माध्यमातून बरेच काही सांगून जात आहे. त्यामुळे जिथे तिथे शिवच्या या फोटोचीच चर्चा होताना दिसत आहे. तुम्ही हा फोटो पाहिलात का?
अंकुश चौधरीची नवी भूमिका, गुंतवणूकदार म्हणून नेटफ्लिक्समध्ये प्रवेश
शिव, ट्रेन आणि तृतीयपंथी
आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आजही तृतीयपंथीयांनी भीक मागण्यावाचून पर्याय नाही.असा तृतीयपंथीना रेल्वेमध्ये अनेकांनी पाहिले असेल. आपण कित्येक जण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. काही जण तर त्यांच्याकडे आजही बघून नाकं मुरडतात. पण समाजातील या घटकाला आपल्यापासून दूर लोटण्यापेक्षा तोही आपल्या समाजाचा एक भाग आहे असे मानत त्यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे. शिवने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो ट्रेनमध्ये असून दोन तृतीयपंथीशी गप्पा मारताना दिसत आहे. त्यावेळी त्या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे गुलदस्त्यात असेल तरी देखील त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहता ते नक्कीच काही तरी चांगल्या आणि सकारात्मक विषयावर चर्चा करत असतील हे दिसून येत आहे. शिवने काढलेले हे फोटो कोणत्या विशिष्ट कारणासाठी काढले आहेत की, त्याने हे फोटोशूट सहज केले आहे. हे अद्याप कळू शकलेले नाही.
आदर्श जावई अशी ओळख असलेला शशांक साकारणार व्हिलन,मालिकेच्या प्रोमोला पसंती
शिववर होतोय स्तुतीचा वर्षाव
शिव ठाकरे नवनवे प्रयोग नेहमीच करत असतो. त्याच्या सोशल मीडियावर त्याचे डान्स व्हिडिओज बरेचदा शेअर करत असतो. शिवने हा फोटो शेअर केल्यानंतर त्याच्या या फोटोचीही जोरदार चर्चा होते. शिवने हा फोटो टाकल्यानंतर त्याच्यावर स्तुती वर्षाव केला जात आहे. त्याच्या फॅन्सनी या फोटोवर कमेंट देऊन त्याचे कौतुक केले आहे. मराठी माणूस म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिव ठाकरेच्या फोटोवर स्तुतीसुमने उधळत त्याला अस्सल मराठी माणूस असल्याचेही म्हटले जाते.
स्टायलिश मराठी माणूस
मराठीमध्ये असे क्वचितच सेलिब्रिटी असतील जे फिट, फाईन आणि स्टायलिश आहेत. शिव ठाकरे हा त्यापैकीच एक आहे. भाषेच कमीपणा न बाळगता केवळ जिद्दीवर त्याने हिंदीतील रोडिजमधील सगळ्यांची मनं जिंकली. त्याचा फिटनेस हा जबरदस्त असून त्याचे त्या संदर्भातील अनेक फोटोज आणि व्हिडिओजही व्हायरल होत असतात. अत्यंत स्टायलिश असा शिव कोणत्याही कपड्यांमध्ये आणि लुकमध्ये नेहमीच परफेक्ट दिसतो. तो एक उत्तम डान्सर असून त्याच्या डान्स अॅकडमीमधील मुलांसोबतचे त्याचे व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात.
आता त्याचा हा नवा फोटो अनेकांच्या पसंतीस उतरल्यामुळे नेमकं या फोटो काढण्यामागे कारण काय हे जाणून घेण्याची उत्सुकताही अनेकांना आहे.
मुलीच्या नामकरण सोहळ्याची तुफान कल्पना, या अभिनेत्याने साजरा केला व्हर्च्युल सोहळा