बिग बॉस हा शो गेले 15 वर्ष प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. जितका हा शो प्रेक्षकांना आवडतो तितकाच तो वादग्रस्तही ठरतो तर एका बाजूला या शो मध्ये अनेक जोड्याही जमल्या आहेत आणि या जोड्यांनी संसारही थाटला आहे. तर काही जोड्या बाहेर आल्यानंतर वेगळ्याही झाल्या आहेत. सध्या प्रथमच केवळ दीड महिन्यासाठी ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर बिग बॉस हा शो चालू करण्यात आला आहे. मात्र अगदी पहिल्या दिवसापासून नेहमीप्रमाणेच हा शो आणि यातील स्पर्धक वादग्रस्त ठरत आहेत. या शो चा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे आणि त्यामुळेच सोशल मीडियावर या शो ची जबरदस्त फॅन फॉलोईंगही आहे. सध्या या शो मध्ये मराठमोळ्या राकेश बापट (Raquesh Bapat) आणि शमिता शेट्टीच्या (Shamita Shetty) केमिस्ट्रीबद्दलही चर्चा होताना दिसून येत आहे. इतकंच नाही तर या दोघांचे काही व्हिडिओ व्हायरल होत असून दोघेही एकमेकांच्या अधिकाधिक जवळ येत असून प्रेमात तर नाहीत ना अशी चर्चा सुरू होऊन #ShaRa असा नवा हॅशटॅगही सुरू झाला आहे.
अधिक वाचा – अंधश्रद्धेवरील सस्पेन्स सीरिज ‘परिस’ येतेय भेटीला
राकेश आणि शमिताची केमिस्ट्री
राकेश बापट हे नक्कीच इंडस्ट्रीतील नावाजलेला कलाकार आहे. शिवाय तो एक आगळावेगळा कलाकार म्हणूनही प्रसिद्ध आहे. राकेश गणपतीच्या मूर्ती स्वतः बनवतो आणि गपणती कसा बनवायचा याच्या कार्यशाळाही घेतो. तसंच एक संवेदनशील माणूस म्हणूनही त्याची ओळख आहे आणि बिग बॉसमध्येही तो त्याची संवेदनशीलता वेळोवेळी दाखवून देत असतो. तर शमिता शेट्टी आधी राकेशला ओळखत नव्हती. पण गेल्या आठवड्यापासून दोघांमधील केमिस्ट्री अधिकाधिक फुलत असल्याचे दिसून येत आहे. सध्या हा शो 24 x 7 चालू असल्याने यातील काही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शमिता आणि राकेशमधील प्रेम वेळोवेळी दिसून येत आहे. राकेश प्रत्येक ठिकाणी शमिताला नेहमीच पाठिंबा देतानाही दिसून आला आहे.
अधिक वाचा – ‘रावरंभा’ या ऐतिहासिक सिनेमात दिसणार अभिनेत्री मोनालिसा बागल
राकेश नेहमी करतो शमिताबरोबर फ्लर्ट
राकेश बऱ्याचदा शमिताबरोबर घरामध्ये फ्लर्ट करत असतो. तसंच शमिता त्याची काळजी घेताना आणि त्याला भरवतानाही दिसून येते. दोघांना स्वतंत्र मत असले तरीही एकमेकांच्या मतांचा आदर करतानाही बऱ्याचदा दिसून येतात. त्यामुळे शमिता आणि राकेश एकमेकांच्या प्रेमात असून एकमेकांच्या जवळ येत आहेत असा अंदाज सध्या त्यांचे चाहते बांधत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय बऱ्याचदा कोणत्याही टास्कच्या वेळी असो अथवा गप्पा मारताना असो दोघेही एकमेकांचा हात धरून बसलेले आणि एकमेकांना समजावत असलेले दिसतात अथवा एकमेकांच्या आयुष्याबद्दल गप्पा मारतानाही दिसून येतात. घरात येताना दोघांनाही आपण कसे आहोत हे माहीत नव्हते. पण #StayConnected या बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) च्या खेळामुळे दोघांना एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. इतकंच नाही तर आपला जोडीदार बदलण्याची संधी आलेली असतानाही दोघांनीही एकमेकांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा आपली जोडी अप्रतिम असल्याचेही दाखवून दिले आहे. या दोघांचेही नाते दिवसेंदिवस घट्ट होत चालले असून दोघांच्याही या नात्याला कोणाचीही नजर न लागो असे त्यांच्या चाहत्यांनीही म्हटले आहे. तर राकेश सर्वांशी प्रेमाने वागत असल्यामुळे त्याने प्रेक्षकांचेही मन जिंकून घेतले आहे.
अधिक वाचा – “रणवीर सिंह झाला बाबा” या मेसेजमुळे सोशल मीडियावर धमाल
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक