ADVERTISEMENT
home / बिग बॉस
Bigg Boss च्या नव्या सीझनमध्ये रिया चक्रवर्ती येणार असल्याची चर्चा

Bigg Boss च्या नव्या सीझनमध्ये रिया चक्रवर्ती येणार असल्याची चर्चा

पुन्हा एकदा बिग बॉसच्या नव्या सीझनची चर्चा सुरु झाली आहे. 14 वा सीझन चांगलाच गाजल्यानंतर आता या नव्या सीझनमध्ये कोण असणार याची चर्चा रंगू लागली आहे. या नव्या सीझनमध्ये अनेक नव्या नावांची चर्चा होत असताना आता यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती येणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. रिया चक्रवर्ती ही सुशांतच्या आत्महत्येनंतर खूपच चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा तिच्या नावाची चर्चा झाल्यामुळे या रिअॅलिटी शोमुळे ती या सगळ्या वादातून पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. रिया चक्रवर्ती व्यतिरिक्त या मालिकेमध्ये अन्य काही कलाकारांच्या नावांचीही चर्चा होत आहे.

लोकांसमोर आपली माजू मांडण्याची संधी

रिया चक्रवर्ती

Instagram

रिया चक्रवर्ती ही गेल्यावर्षी सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणानंतर चर्चेत आली होती. तिच्यावर त्याच्या आत्महत्येचा कट आणि ड्रग्ज संदर्भात आरोप करण्यात आले होते. त्यामुळे तिला काही काळासाठी कैदही झाली होती. रियाची अशी बाजू एकदाच एका मुलाखतीतून समोर आली पण तिला व्यक्त होण्याची संधी कधीही मिळाली नाही. पण या निमित्ताने तिला आपली बाजू आणि खरी रिया दाखवता येणार असल्याचे बोलले जात आहे. Bigg Boss हा असा रिअॅलिटी शो आहे. ज्याचा फॅन फॉलोविंग हा खूप जास्त आहे. यामधील अनेक कलाकारांना प्रसिद्ध होण्याची संधी मिळते. त्यामुळे कमबॅक करण्यासाठी रियाला अगदी उत्तम संधी मिळणार आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.

ADVERTISEMENT

वीस वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणार गोविंदा आणि नीलमची जोडी

सुशांत सिंहचे गूढ उलगडणार

आता रियाच्या नावाची चर्चा होेतेय म्हणजेच सुशांत सिंहबद्दल एकदा तरी यामध्ये चर्चा होणारच. त्यामुळे अनेकांची आधीच यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खूप जणांना सुशांत सिंहच्या आयुष्यात नेमके काय झाले हे जाणून घ्यायचे आहे. एका तरुण कलाकाराने अशा प्रकारे आयुष्य संपवणे अजिबात रुचलेले नाही. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात रियाचा काय हात होता हे या निमित्ताने कळेल असे अनेकांना वाटत आहे. पण तरीही तिच्या नावाची केवळ चर्चाच होत आहे.

अजून चर्चा

Bigg Boss चा प्रत्येक नवा सीझन सुरु होण्याआधी त्याची चर्चा होतेच. कोणते सेलिब्रिटी स्पर्धक या खेळात येणार याची चर्चा होत असली आणि काही नाव पुढे येत असली तरी देखील ही यादी बरेचदा बदलते सुद्धा. त्यामुळे रियाच्या नावाची चर्चा होत असली तरी देखील त्यावर शोकडून कोणतेही शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. त्यामुळे अद्याप तिच्या नावाची केवळ चर्चाच होते आहे असे म्हणायला काही हरकत नाही. पण रियाच नाही तर आणखी काही नावाची देखील चर्चा होताना दिसत आहे. 

अभिनेत्री अश्विनी भावे यांचे व्हिडिओ चाहत्यांना सुखावणारे

ADVERTISEMENT

लाईमलाईटपासून दुरावलेल्यांना मिळणार संधी

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नव्या सीझनमध्ये लाईमलाईटपासून दूरावलेल्या सेलिब्रिटींना यामध्ये चमकण्याची संधी मिळणार आहे. इतकेच नाही तर यामध्ये या आधीच्या सीझनमध्ये हिट ठरलेले रुबिना दिलैक आणि राहुल वैद्य हे देखील दिसणार आहे. गेल्या सीझनमध्ये राखी सावंत हिने देखील एंटरटेन्मेंटचा तडका लावला होता. आता या नव्या सीझनमध्ये एंटरटेन्मेंट वाढवण्यासाठी  आणखी कोणाला आणणार आहे हे देखील लवकरच कळेल. 

पण सध्या तरी रियाच्या नावामुळे खूपच जास्त चर्चा होऊ लागली आहे. 

सकारात्मक विचार हाच एकमेव मार्ग – अभिनेता डॉक्टर आशिष गोखले

02 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT