ADVERTISEMENT
home / मनोरंजन
बिग बॉस विजेत्याचे लॉकडाऊनमध्ये लग्न, टेरेसवर पार पडला सोहळा

बिग बॉस विजेत्याचे लॉकडाऊनमध्ये लग्न, टेरेसवर पार पडला सोहळा

लॉकडाऊनमुळे देशात सामूहिक पद्धतीने साजरे केले जाणारे सोहळे रद्द करण्यात आले आहे. एप्रिल, मे दरम्यान लग्नाचे अनेक मुहूर्त असतात. पण देशासाठी सगळ्यांना ते रद्द करावे लागले आहेत. काहींनी ठरलेल्या वेळात लग्न केली खरी. पण तिही अगदी गपचूप आणि फक्त दोन-चार पाहुण्यांच्या उपस्थित. अगदी त्याच पद्धतीने बिग बॉस विजेता लॉकडाऊनमध्ये विवाहबंधनात अडकला आहे. हा सेलिब्रिटी म्हणजे आशुतोष कौशिक. सध्या त्याच्या लग्नाचे फोटो सगळ्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. अत्यंत साधेपणाने त्याचा हा लग्नसोहळा पार पडल्याचे वायरल फोटोवरुन कळत आहे.

अग्गबाई सासूबाई’ फेम आसावरी खऱ्या आयुष्यातदेखील आहे सुगरण

या कारणामुळे लग्न अगदी थोडक्यात

नव विवाहित दाम्पत्य आशुतोष आणि अर्पिता

Instagram

ADVERTISEMENT

आशुतोष मूळचा उत्तर प्रदेशमधील सहारनपुरचा आहे. पण तो सध्या दिल्लीतील नोएडामध्ये राहतो. लॉकडाऊन होण्याआधी त्याच्या लग्नाची बोलणी झाली होती. अलीगढ येथे राहणाऱ्या अर्पिताशी त्याला विवाह ठरला होता. विवाहासाठी  26 एप्रिल अर्थात अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त काढण्यात आला होता. पण लॉकडाऊन वाढल्यानंतर लग्नाचा सोहळा शाही थाटात पार पडणे शक्य नव्हते. आशुतोष आणि अर्पिताला लग्नाची तारीख पुढे न्यायाची नव्हती. म्हणून त्यांनी ठरलेल्या दिवशी ठरलेल्या मुहूर्तावर अगदी 4 ते 5 पाहुण्यांच्या उपस्थित हा सगळा सोहळा टेरेसवर पार पडला. 

लग्नाचा खर्च केला दान

आता या नव्या जोडप्याची तारीफ करण्याची गोष्ट म्हणजे आशुतोष आणि अर्पिता यांनी त्यांचा लग्नाचा सगळा खर्च हा PM फंडासाठी दान केला आहे. देशात उद्भवलेली परिस्थिती निवारण्यासाठी त्याने ही मदत केली आहे. त्यामुळे त्याच्या फॅन्सनाही त्याचा अभिमान वाटत आहे. कारण त्याने लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर अर्पिता लग्नाच्या लेहंग्यात दिसत असली तरी आशुतोष अगदी साध्या कपड्यांमध्ये दिसत आहे. लग्नासाठी आलेल्या भटजींनी कोरोना संक्रमण होऊ नये याची काळजी घेतली आहे. सोशल डिस्टसिंग हा नियम त्याच्या लग्नातही पाळला गेला आहे. 

शाहरूखला जाडा म्हटल्याने आर्यन खानने मारले होते एका मुलीला

या कारणामुळे आला चर्चेत

सहारनपुरसारख्या छोट्याशा गावातून आलेला आशुतोष M टीव्हीच्या रोडीजमधून पुढे आला. त्यानंतर त्याला बिग बॉस 2 मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याने हे दोन्ही शो त्याच्या टॅलेंटमुळे जिंकले त्यामुळेच त्याचे फॅन फॉलोविंगही बरेच आहे. तो त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन बराच अॅक्टिव्ह असतो. त्याने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहेत. 

ADVERTISEMENT

अभिनेत्री इशा गुप्ताही चढणार लवकरच बोहल्यावर, नात्यात असल्याची कबुली

अभिनयातही दाखवली चुणूक

आता आशुतोषबद्दल आणखी सांगायचे म्हणजे आशुतोषने चित्रपटांमध्येही त्याचा दबदबा निर्माण केला आहे. त्याच्या अभिनय कौशल्यामुळेच त्याला ‘जिला गाजियाबाद’, ‘शॉर्टकट रोमियो’ अशा काही चित्रपटात काम केले. पण या प्रसिद्धीबरोबरच तो अनेक वादांमधूनही समोर आला. फोटोग्राफर मारहाण प्रकरणी त्याचा एक व्हडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर अनेक ताशेरे ओढले गेले. या सगळ्या गोष्टींमुळे त्याने प्रसिद्धी असूनही लाईमलाईटपासून दूर जाणे योग्य मानले. 

आता सध्या तरी आशुतोषने अत्यंत चांगला आणि आदर्श ठेवावा असा निर्णय घेतला आहे. त्याला पुढील वाटचालीस POPxo कडून शुभेच्छा!

28 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT