ADVERTISEMENT
home / मनोरंजन
मालदिव्जमध्ये आहे बिपाशा बासू, शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट

मालदिव्जमध्ये आहे बिपाशा बासू, शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट

मालदिव्ज हे सध्या सर्वच बॉलीवूड सेलिब्रेटिजसाठी हॉट डेस्टिनेशन आहे. ज्यामुळे एका पाठोपाठ एक असे सर्वच बॉलीवूड कलाकार मालदिव्जमध्ये वेकेशनवर जात असतात. अभिनेत्री बिपाशा बासू सध्या मालदिव्जमध्ये तिचा  पती करण सिंह ग्रोवरसोबत वेकेशेनवर गेली आहे. ती तिथे तिच्या पतीचा म्हणजेच करणचा  वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली आहे. बिपाशा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्यामुळे तिने तिच्या इन्टा अकाऊंटवर तिचे मालदिव्जमधले काही फोटो शेअर केले आहेत. हे  ग्लॅमरस फोटो पाहून चाहते मात्र नक्कीच घायाळ झाले आहेत.

बिपाशाने शेअर केले हॉट फोटो

बिपाशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा लुक नेहमीपेक्षा वेगळा दिसत आहे. ती समुद्रकिनारी स्विमसूट घालून पोझ देताना तिचे हे फोटो आहेत. या फोटोज सोबत तिने शेअर केलं आहे लव्ह इज इन दी एअर थोडक्यात ती करणसोबत रोमॅंटिक क्षण तिथे एन्जॉंय करत आहे. विशेष म्हणजे बिपाशाने या मध्ये एक प्रिंटेड स्विमसूट परिधान केला आहे. तिचा हा स्विमसूट पिवळ्या रंगाच्या शेडमधला असून त्यामुळे एक वेगळा आणि हटके लुक बिपाशाला मिळाला आहे. या लुकमधला बिपाशाचा अंदाज अनोखा असल्यामुळे तिच्या फोटोजवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कंमेट्सचा पाऊसच पडला आहे. बिपाशानेही या सर्व कंमेट्सना प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यावरून तिचं चाहत्यांवर असलेलं प्रेम नक्कीच दिसून येतं. 

बिपाशा आणि करणचं नातं

बिपाशा बासूने करण सिंह ग्रोवरसोबत संसार थाटला आणि बॉलीवूडपासून काहीशी दुरावली. यापूर्वी ती फक्त अलोन या चित्रपटात दिसली होती. ज्या चित्रपटात तिच्यासोबत करणनेच मुख्य भूमिका साकारली होती.याच चित्रपटात तिची भेट करणसोबत झाली आणि शूटिंग दरम्यान त्यांचं एकमेकांशी सूत जमलं. या प्रेमाचं रुपांतर लग्नात झालं आणि बिपाशा करणसोबत संसार करण्यात रमली. बिपाशाच्या लग्नाला या वर्षी एप्रिलमध्ये पाच वर्षे पूर्ण होतील. त्यानंतर  ती मॉडेलिंग, फोटोशूट, गाण्याचे अल्बम, जाहिरात यातून अनेकदा प्रेक्षकांसमोर आली आहे. मात्र तिने कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही. बिपाशा चित्रपटसृष्टीतील एक बोल्ड अॅंड ब्युटिफुल अभिनेत्री आहे. मात्र सध्या ती चित्रपटात अॅक्टिव्ह नाही. मात्र तिचे तिच्या पतीसोबत रोमॅंटिक फोटो ती सतत तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. 

कसं जुळलं प्रेमातं नातं

बिपाशाच्या प्रेमात पडण्यापूर्वी करणचं जेनिफरसोबत आणि बिपाशाचं जॉन इब्राहिमसोबत अफेअर होतं. मात्र जेनिफर आणि करणच्या नात्यात दूरावा आला. जेनिफर विंगेट आणि करण सिंह ग्रोव्हर लोकप्रिय हिंदी मालिका ‘दिल मिल गए’ मध्ये काम करता करता एकमेंकांच्या जवळ आले. काही वर्षांच्या अफेअरनंतर त्या दोघांनी 2012 मध्ये लग्न केलं. जेनिफर आणि करणची जोडी टेलीव्हिजन माध्यमातील एक हिट जोडी होती.जेनिफरसोबत घटस्फोट झाल्यावर करणने बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूसोबत लग्न केलं आहे. तोपर्यंत बिपाशा आणि जॉनच्या नात्यातही दुरावा आला होता. करणचे हे तिसरे लग्न आहे. मात्र करण आणि बिपाशाचं एकमेकांवर खरं प्रेम आहे ज्यामुळे ते दोघांच्या प्रेमात आजही आखंड बुडालेले आहेत. सोशल मीडियावरील त्यांच्या या फोटोमुळे त्यांच्या प्रेमाची कबुली मिळत आहे.

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

डिअर जिंदगीनंतर आता ‘या’ चित्रपटात शाहरूख आणि आलिया एकत्र

मराठी चित्रपटातून जया बच्चन करणार कमबॅक

ADVERTISEMENT

ज्येष्ठ गीतकाराला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी नेहा कक्करची मदत

22 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT