ADVERTISEMENT
home / Love
Birthday wishes for boyfriend

Birthday Wishes And Quotes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रेम ही जगातील एक स्पेशल गोष्ट आहे. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात प्रेम मिळेलच असं नाही. मात्र अनेकांना हे अद्भूत गिफ्ट परमेश्वराकडून नकक्कीच मिळतं. असं म्हणतात प्रेमात जग बदलण्याची ताकत असते. प्रेससी आणि प्रियकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना जगातील कोणत्याच गोष्टींचे भान राहत नाही. आपण आपल्या प्रिय व्यक्तीला आयुष्यभर आनंदी आणि सुखात ठेवावं अशीच त्यांची इच्छा असते. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस खास असावा असं तुम्हाला वाटत असतं. जर तुमच्या प्रियकराचा वाढदिवस असेल तर त्याच्यासाठी नेहमीपेक्षा काहीतरी खास प्लॅनिंग करावं आणि त्याचा हा स्पेशल दिवस आणखी खास करावा असं प्रत्येक प्रेयसीला वाटत असतं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत काही खास शुभेच्छा संदेश. ज्यामुळे तुम्ही देऊ शकता तुमच्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Boyfriend In Marathi)

बॉयफ्रेंडच्या बर्थडेला असं द्या सरप्राईज Birthday Surprise Ideas For Boyfriend In Marathi

Birthday Wishes For Boyfriend In Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Boyfriend In Marathi
Birthday Wishes For Boyfriend In Marathi

प्रियकराचा वाढदिवस स्पेशल करायचा असेल तर त्याला या खास दिवशी द्या स्पेशल बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या कविता व विश (Birthday Wishes For Bf In Marathi)

1. माझं आयुष्य अधिक सुंदर बनवणाऱ्या माझ्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

ADVERTISEMENT

2. तुला पाहताना नव्याने पुन्हा मी तुझ्या प्रेमात पडते…तुझ्यावर मला असंच आयुष्यभर प्रेम करायचं आहे. ‘…….’ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

3. नाते आपले प्रेमाचे, आनंदाचे आणि सौख्याचे… असेच बहरत राहू दे… तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

4. आयुष्यात कधी कधी एखादी व्यक्ती इतकी जवळ येते की, त्याच्याशिवाय आयुष्य जगण्याचा विचारही करता येत नाही… अशा माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

5. तुला यश मिळताना मला आयुष्यभर पाहायचं आहे. माझ्या या दोन नयनांनी तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा आहे. प्रिय….. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

6. माय लव्ह, आजचा दिवस माझ्यासाठी आहे खूपच खास… परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो हाच आहे माझा मनापासून ध्यास… वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

7.संकल्प असावे तुझे नवे, मिळावी त्यांना योग्य दिशा… तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जगणे हीच आहे माझी आशा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

8. चांदण्याच्या मंद प्रकाशात सदैव असावी तुझी साथ, तू आणि मी म्हणजे आयुष्याची नवी सुरूवात. प्रिय ……, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

9. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस असाच खास असावा, आयुष्यभर फक्त तुझ्या हातात माझाच हात असावा…. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

10. वर्षभरात अनेक खास दिवस येतात, माझ्यासाठी खास तोच दिवस ज्या दिवशी तुझा वाढदिवस… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Romantic Birthday Wishes For Boyfriend In Marathi | बॉयफ्रेंडसाठी रोमॅंटिक बर्थ डे विश

Birthday Wishes For Bf In Marathi
Birthday Wishes For Bf In Marathi

वाढदिवस हा प्रत्येकासाठी नेहमीच स्पेशल असतो. त्यात जर तुमच्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस असेल तर तो अधिक उत्साहाने तुम्ही साजरा करता. यासाठीच बॉयफ्रेंडसाठी रोमॅंटिक बर्थ डे विश (Romantic Birthday Wishes For Bf In Marathi)

1. कितीपण राग आला तरी समजून घेतोस मला, रूसल्यावर पाठी पाठी येतोस माझ्या, कधी रडवतोस, कधी हसवतोस माझ्यासाठी काहीपण करतोस… आज तुझ्यासाठी काहीतरी करण्याचा दिवस आहे. म्हणून सांगते आय लव्ह यु… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

2. आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे…. तुला यशाच्या शिखरावर चढताना मला माझाच अभिमान वाटू दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

3. साखरेपेक्षाही गोड अशा माझ्या….. ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

4. प्रेमाचे नाते आपले आयुष्यभर जपून ठेव, तुझ्यासोबत वाढदिवस साजरा करायचा आहे. माझ्यासाठी खास वेळ ठेव… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

5. हसत राहा तू नेहमी, आनंदी आणि सुखी राहा, आजच्या दिवशी तुला खास शुभेच्छा, आयुष्यभर फक्त तू माझाच राहा.

6. इंद्रधनुष्याप्रमाणे तुझे आयुष्य रंगीत असावे हीच माझी देवाजवळ प्रार्थना… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

7. तुझा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी एखादा खास सणच, म्हणूनच आज मला तुझ्यासोबत घालवायचा आहे प्रत्येक क्षण. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

8. नातं आपलं दिवसेंदिवस फुलत राहावे, तू आयुष्यभर माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

9. वाढदिवसाच्या शुभक्षणांनी तुझी सारी स्वप्नं पूर्ण व्हावी, आयुष्यातील प्रत्येक क्षण तुझी माझी साथ असावी… माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

10. तुझ्या वाढदिवशी एकच सांगेन वाक्य, मी तुला विसरणं कधीच नाही शक्य… हॅपी बर्थडे माय BF 

ADVERTISEMENT

Valentines Day: व्हॅलेंटाईन डेला तुमच्या प्रियकराला द्या ‘हे’ स्पेशल गिफ्ट (Valentines Gift For Boyfriend In Marathi)

Best Birthday Wishes For Boyfriend In Marathi | बॉयफ्रेंडसाठी बेस्ट बर्थ डे विश

Best Birthday Wishes For Boyfriend In Marathi
Best Birthday Wishes For Boyfriend In Marathi

वाढदिवसासाठी बेस्ट गिफ्ट जर काही असेल तर त्या तुम्ही प्रेमाने दिलेल्या शुभेच्छा… यासाठीच तुमच्या बॉयफ्रेंडला द्या हे बेस्ट बर्थ डे विश (Best Birthday Wishes For Boyfriend In Marathi)

1. आनंदाने भरलेले तुझे आयुष्य असावे… तुझ्यासोबत माझे नाते जन्मोजन्मी असावे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

2. माझ्या आनंदाचे कारण तू आहेस, माझ्या यशाची प्रेरणा तू आहेस…. तुझ्या आयुष्यात माझे असणं हेच माझे भाग्य आहे… एकमेकांच्या साथीने घालवलेला प्रत्येक क्षण गोड आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

3.आजच्या खास दिवशी तुला काहितरी सांगायचे आहे, तुझा हात हातात घेऊन आनंदाचे गाणे गायचे आहे… वाढदिवसाच्या आनंदमय शुभेच्छा

4. तुझ्या जीवनात कधीच दुःख नसावे, प्रत्येक क्षण म्हणजे आनंदोत्सव असावा… असाच आजचा दिवस म्हणून तुझ्यासाठी या खास शुभेच्छा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

5.माझे सर्वस्व आहेस तू… काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू…मी फक्त देह आहे मात्र माझा आत्मा आहेस तू… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

6. आजपर्यंत देवाकडे जे जे मागितलं ते ते सर्व मिळालं, आता देवाने मला तू दिला आहेस आता देवाकडून दुसरं काहीच नको…फक्त तुला यश, आनंद, सुख, आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य द्यावं एवढंच माझं मागणं आहे.

ADVERTISEMENT

7. माझी आवड, निवड आहेस तू, माझा श्वास , ध्यास आहेस तू, तू जवळ असताना दुसरं कुणीच नको वाटतं कारण माझं सर्वस्व आहेस तू… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

8. माझ्यासाठी एखादा राजकुमार आहेस तू, कधी आलास, कधी भेटलास आणि कधी माझा झालास ते कळलंच नाही… सर्व काही अगदी परिकथेतील वाटावं असंच घडत आहे. आजच्या खास दिवशी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

9. नशिबवान असतात ते लोक ज्यांना त्यांचे प्रेम सहज मिळते. त्यातील एक नशिबवान मी पण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

10. नातं आपल्या प्रेमाचं असंच फुलत राहू दे… तुझ्यासोबत प्रत्येक क्षण मला आनंदाने साजरा करता येऊ दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

ADVERTISEMENT

Cute Birthday Quotes For Boyfriend In Marathi | बॉयफ्रेंडसाठी क्युट बर्थ डे विश

Cute Birthday Quotes For Boyfriend In Marathi
Cute Birthday Quotes For Boyfriend In Marathi

प्रेमाचे नाते शब्दात मांडणे निव्वळ अशक्य असते. कारण प्रेम ही अनुभवण्याची गोष्ट आहे. यासाठी असं अदभूत प्रेम शब्दातून मांडण्यासाठी तुमच्या प्रियकराला द्या या क्युट बर्थ विश ( Cute Birthday Quotes For Boyfriend In Marathi ) 

1.तुझ्या माझ्या भाग्यरेषा कधीच जुळल्या एकमेकांशी, जेव्हा तू हातात हात देत प्रेमाने कुजबुजलास माझ्या कानाशी… वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

2. ह्दयातील स्पंदनाचा आलाप तू, मनाच्या कोंदणात शोभेल असा माझा कोहिनूर तू… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

3.अशीच क्षणोक्षणी आपल्या प्रेमाची गोडी वाढत राहो, तुझ्यासोबत मी आणि माझा संसार सुखी राहो… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

4. व्हावास तू शतायुषी, व्हावास तू दीर्घायुषी, माझी एकच इच्छा तुझ्यासोबत व्हावी मी तुझी जीवनसंगिनी… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

5. ज्याच्यामुळे माझे आयुष्य इतके सुंदर झाले त्या माझ्या प्रेमळ…. ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

6. तुझे आयुष्य गोड आणि प्रेमळ आठवणींनी भरायचे आहे… फक्त त्यासाठी तुझी साथ हवी… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

7. तुझी माझी प्रीत जमली नदीकाठी, सांजपारी पडल्या चोरून भेटीगाठी… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

8. आजच्या दिवशी तुला जगातील प्रत्येक आनंद मिळावा, तू आणि मी तो आयुष्यभर एकत्र साजरा करावा, वाढदिवसाच्या हार्दिकस शुभेच्छा

9. चांदण्यात फिरताना हातात धरलास अलगद हात, आता मात्र दे वचन तू सोडणार नाही माझी साथ… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

10. तुझ्यावरचं प्रेम हीच माझी खरी संपत्ती आहे, तू सुखी राहावंस इतकीच माझी इच्छा आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

रोझ डे आणि प्रेम संदेश (Rose Day Quotes In Marathi)

ADVERTISEMENT
16 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT