ADVERTISEMENT
home / Family
120+ Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

120+ Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

पती पत्नीचे नाते हे जन्मांतरीचे नाते असते. लग्नाच्या पवित्र बंधनाने हे नाते अधिकच दृढ होत जाते. पतीसाठी बायको म्हणजे फक्त त्याची आयुष्याची जोडीदार नाही तर अर्धांगिनी असते. म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीत समान वाटेकरी…सुख असो वा दुःख पत्नी पतीची साथ कधीच सोडत नाही. बायको एका दिवसासाठी जरी माहेरी गेली तरी पतीला घरात अन्न गोड लागत नाही. तर काही गर्लफ्रेंड या बायको होतात. अशा प्रेमळ गर्लफ्रेंडलादेखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे खास असते. वरवर कितीही भांडले तरी आतून पतीपत्नीचे प्रेम हे इतरांना समजण्या पलीकडचे असते. अशा प्रेमळ पत्नीचा वाढदिवस विसरून कसे चालेल. वाढदिवसाच्या महिनाभर आधीच अनेक जणी नवऱ्याकडे गिफ्ट आणि शॉपिंगचा धडाका लावतात. अशा प्रिय आणि लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (Birthday Wishes For Wife In Marathi) द्यायलाच हवेत. बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हे मेसेज, कोट्स, कविता आणि तुमच्या बायकोसाठी प्रेमळ संदेश हे नक्कीच फायद्याचे ठरतील

Birthday Wishes for Wife in Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes for Wife in Marathi
Happy Birthday Wishes For Wife In Marathi

1. माझ्या घराला घरपण आणणारी 
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या 
माझ्या प्रेमळ पत्नीस 
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

2. मी खूप भाग्यवान आहे 
कारण मला तुझ्यासारखी
कष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू 
सहचारिणी मिळाली
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

3. चेहऱ्यावरील आनंद तुझ्या
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!

ADVERTISEMENT

4. मी खवळलेला महासागर, तू शांत किनारा आहेस,
मी उमलणापे फुल तर तू त्यातला सुगंध आहेस,
मी एक देह तू त्यातला श्वास आहेस
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

5. जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे…प्रेम
जगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे… तू
जगातील सर्वात अविस्मरणीय दिवस म्हणजे… तुझा वाढदिवस 
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

6. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव
प्रेम म्हणजे आपलेपण आणि प्रेम म्हणजे समजून घेणं
हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं
त्या माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

7. माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या
माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 

ADVERTISEMENT

8. प्राणाहून प्रिय बायको 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

9. प्रिय बायको
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

10. ‘प्राणसखे’ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

वाचा – ५०० पेक्षा जास्त सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT

Wife Birthday Wishes In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Wife Birthday Wishes In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Quotes For Wife In Marathi

बायकोचा वाढदिवस अविस्मरणीय करायचा असेल तर तिला शुभेच्छा देताना द्या या वाढदिवसाच्या मराठी कविता, मेसेज आणि काही सुविचार(Birthday Wishes For Wife In Marathi). तसंच तुम्ही नवरा – बायकोच्या हृदयस्पर्शी नात्यावरील कोट्स देखील ठेऊ शकता.

1. कधी रुसलीस, कधी हसलीस 
राग आलाच माझा तर 
उपाशीही झोपलीस
मनातले दुःख
समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तू मला 
खूप सुख दिलेस
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

2. माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर…
हा वेडा तुझ्याशिवाय कोणालाच पाहत नाही
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

3. माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्यासोबत असणारी…
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणारी
अशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

4. माझं प्रेम आहेस तू
माझं जीवन आहेस तू
माझ्या ध्यास आहेस तू
माझा श्वास आहेस तू
मी खूप नशिबवान आहे
कारण माझ्या जीवनाची सहचारिणी आहेस तू
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

ADVERTISEMENT

5. मी तुला जगातील सर्व सुख देईन
तुझी वाट फुलांनी सजवीन,
तुझा प्रत्येक दिवस अधिक सुंदर करीन
तुझं जीवन प्रेममय करीन…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

6. तुझ्यासोबत प्रत्येक दिवस उत्सवासारखा वाटतो पण आजचा दिवस माझ्यासाठी जरा जास्त खास आहे
कारण याच दिवसामुळे मला माझे प्रेम मिळाले
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

7. वेळ चांगली असो वा वाईट 
मला त्याची काळजी नसते
कारण माझ्या चेहऱ्यावर 
आनंद आणण्यासाठी
तुझी एक स्माईलच पुरेशी असते
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

8. जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

ADVERTISEMENT

9. जगातील कोणीही तुझ्याप्रमाणे मला 
माझ्या कामासाठी प्रोत्साहन देत नाही,
तुझ्यासारखी प्रेरणाही मला आजवर कुठूनच मिळालेली नाही
यासाठीच तू जे करतेस त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद
माझ्या आनंदामागील कारण यशामागील आधार असणाऱ्या 
माझ्या घरात लक्ष्मी स्वरूपात नांदणाऱ्या…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

10. तुझे आयुष्य गोड आणि प्रेमळ
आठवणींना भरलेले असावे
वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा
चल प्रिये, आणखी एक वर्ष असंच आनंदात आणि जल्लोषात घालवू या!!!

वाचा – सुंदर अशा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Love Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

Happy Birthday Wishes For Wife In Marathi SMS | बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Wishes For Wife In Marathi SMS

Birthday Wishes For Wife In Marathi- आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच खास आहे कारण आज आहे तुमच्या लाडक्या बायकोचा वाढदिवस… हा दिवस आणखी खास करण्यासाठी या मेसेजची मदत घ्या.

1. नशिबवान आहे मी
कारण मला तुझ्यासारखी 
मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी
आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी जोडीदार मिळाली…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

ADVERTISEMENT

2. ज्या स्त्रीने मला माझ्या आयुष्यातील 
चढउतारांमध्ये साथ दिली,
मला सतत आनंदी ठेवलं
जिला नेहमीच माझी काळजी असते
अशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

3. नाते आपल्या प्रेमाचे 
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात चिंब भिजावे
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

4. तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू नसावे
सुखांनी सदैव तुझ्या जवळ असावे
ह्याच माझ्या मनातील इच्छा आणि अपेक्षा
प्रत्येक क्षणी तू माझ्या जवळ असावे
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

5. तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!!
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

ADVERTISEMENT

6. तू माझ्यासाठी किती खास आहेस, 
हे शब्दात सांगणे कठीण आहे.
मी तुझ्यावर सर्वात जास्त 
प्रेम करतो आज तुला सांगणं माझं कर्तव्य आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

7. तू ते गुलाब नाहीस जे बागेत फुलतं, 
तू तर माझ्या जीवनातील शान आहेस
ज्यामुळे माझं ह्रदय गर्वाने फुलतं
तुझ्या चेहऱ्यावरचं हसूच माझ्यासाठी खूप आहे
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

8. परमेश्वराचे अनेक धन्यवाद
कारण त्याने मला जगातील सुंदर,
प्रेमळ आणि समजूतदार पत्नी दिली
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

9. जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
तुझी सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा दिवस तुझ्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी आणि 
त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

ADVERTISEMENT

10. घे हात हाती माझा,
जगीचं सारं सुख तेव्हा तुझं असेल
माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे
अवघं ब्रम्हांडदेखील खुजं ठरेल
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

वाचा – Birthday Wishes For Husband In Marathi

Romantic Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश रोमॅंटिक

Romantic Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश रोमॅंटिक
Romantic Birthday Wishes For Wife In Marathi

बायकोवरचं प्रेम जाहीर करण्याची आज चांगली संधी आहे यासाठीच बायकोला पाठवा वाढदिवसानिमित्त हे काही रोमॅंटिक मेसेज (heart touching birthday wishes for wife in marathi)

1.जगाला सुख पाहिजे
आणि मला मात्र
माझ्या प्रत्येक सुखात 
फक्त तू पाहिजे
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

ADVERTISEMENT

2. तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की, 
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ स्त्रीसोबत 
आणखी एक वर्ष जगलो आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

3. व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी तुझ्या
प्रेमळ पतीकडून खूप खूप शुभेच्छा!!!

4. पत्नी आपली अर्धांगनी असते
आपल्या आयुष्याची साथीदार असते
प्रत्येक सुखदुःखात भागीदार असते
अशा माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

5. हार्दिक शुभेच्छा बायको,
देव तुझ्यावर सदैव सुख, समृद्धी, यश, आरोग्य आणि आनंदाची बरसात करो हिच प्रार्थना…

ADVERTISEMENT

6. नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपळत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

7. स्वप्नवत वाटावी अशी बायको आहेस
मुलांवर जीवापाड प्रेम करणारी हळवी आई आहेस
माझ्याकडे जे काही आहे ते फक्त तूच आहेस
तुझ्या असण्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

8. प्रत्येक क्षणी पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदैव असे माझ्या आयुष्यातील फुल
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

9. सुगंध बनून डोळ्यात सामावेन
समाधान बनून तुझ्या मनात राहिन
तुला समजून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीन
फक्त तू अशीच आनंदी राहा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ADVERTISEMENT

10. प्राणाहून प्रिय बायको
तुला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो

वाचा – 60+ मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Funny Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा

Funny Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा
Funny Birthday Wishes For Wife In Marathi

पती पत्नीचं नातं जितकं प्रेमाचं, समजूतीचं असतं तितकंच मैत्री आणि मौजमजेचंही असतं. यासाठीच तुमच्या पत्नीला पाठवा वाढदिवसानिमित्त हे काही मजेशीर शुभेच्छा संदेश

1. तुझ्या प्रेमात झालो आहे मी सायको
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको

2. तुला जेव्हा पाहतो मी फक्त पाहतच राहतो
तुझ्या गालावरील खळीत पार हरवून जातो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

ADVERTISEMENT

3. शिंपल्याचा शो पीस नको, जीव अडकला मोत्यात
अशा मोत्याहून सुंदर माझ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

4. जल्लोश आहे गावचा
कारण वाढदिवस आहे 
माझ्या प्रिय पत्नीचा
वाढदिवसाच्या शुभेच्छा माय डिअर वाईफ

5. बायकोचा वाढदिवस म्हणजे नवऱ्यासाठी जणू सणच
मग पार्टी तर व्हायलाच हवी आता ती कोणी द्यायची हा मोठा प्रश्न आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

6. तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
पण अचानक लक्षात आलं तुझं वय आता जरा जास्त झालंय… तसंच मागच्या वर्षीचं गिफ्ट अजून तसंच आहे
म्हणून यंदा फक्त शुभेच्छाच..

ADVERTISEMENT

7. वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
आजच्या दिवशी देवाचे विशेष आभार मान
कारण त्याने आपली भेट घडवली
तर काय झालं मला हवी तशी पत्नी नाही मिळाली
पण तुला हवा तसा पती तर नक्कीच मिळाला ना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

8. आजपासून इमानदारीने आयुष्य जग…मला जमाखर्चात गंडवू नकोस आणि स्वतःच्या वयाबद्दल इतरांना खोटं बोलू नकोस… बाकी मी सर्व सांभाळून घेईन… वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

9. जिचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी मला कॅलेंडरची गरज नाही…. एक महिन्याआधीपासूनच जी गिफ्टचा धडाका सुरू करते अशा माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

वाचा – वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

ADVERTISEMENT

Best Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोसाठी वाढदिवसाचे सर्वोत्कृष्ट संदेश

Best Birthday Wishes For Wife In Marathi
Best Birthday Wishes For Wife In Marathi

बायकोला खूश करण्याची आज तुम्हाला चांगलीच संधी मिळालेली आहे तेव्हा या संधीचं सोन करा आणि या खास शुभेच्छा संदेशने बायकोचा वाढदिवस खास करा.

1. मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी माझ्या ह्रदयाची राणी आहेस तू
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल तुला माझी साथ…
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

2. फुलांनी अमृतपेय पाठवलं,सूर्याने आकाशातून केला सलाम
वाढदिवसाच्या दिवशी मी तुला सांगतो मी खरंच आहे बायकोचा गुलाम
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

3. बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
संसार आणि जबाबदारीने ते नाते तू जपलेले 
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

ADVERTISEMENT

4. मी जेव्हा तुझा विचार करतो 
तेव्हा माझे ह्रदय किती आनंदी होते
हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

5. लखलखते तारे, सळसळते वारे
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्याचसाठी उभे, आज सारे तारे
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

हे देखील वाचा,

आईसाठी सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा

ADVERTISEMENT
22 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT