ADVERTISEMENT
home / Recipes
काळ्या तिळापासून तयार करा पौष्टिक आणि चविष्ट सुकी चटणी

काळ्या तिळापासून तयार करा पौष्टिक आणि चविष्ट सुकी चटणी

काळे तिळ हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. काळ्या तिळापासून लाडू आणि चिक्की असे बरेच पदार्थ तयार केले जातात. आहारात काळे तिळ हे फारच फायद्याचे मानले जातात. ह्रदयरोग,मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तिळ मदत करतात. केस आणि त्वचेसाठीही तिळ फारच फायद्याचे असतात. तिळामध्ये असलेले तैलीय घटक त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करतात. याशिवाय केसांनाही पोषक घटक पुरवण्याचे काम करतात. याशिवाय काळ्या तिळाच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता आणि मूळव्याधीचा त्रास होत नाही. आहारात काळ्या तिळाचा समावेश रोज करायचा असेल तर त्याची चटणी बनवून खाण्यास काहीच हरकत नाही. चुरचुरीत अशी काळ्या तिळाची चटणी चवीला फारच चविष्ट लागते. पोळी, भात कशासोबतही ती तुम्हाला खाता येते. जाणून घेऊया ही अशी चुरचुरीत चटणी घरी कशी बनवता येईल.

दही चिवडा आहे अप्रतिम नाश्ता, मिळतील फायदे

अशी तयार करा तिळाची चटणी

Instagram

ADVERTISEMENT

तिळाची चटणी ही नुसती तिळापासून केली जात नाही. तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी घातल्या जातात. 

साहित्य:  2 वाटी काळे तिळ, 1 वाटी शेंगदाणे , 1 वाटी सुकं खोबरं,  3-4 लसणीचा कांदा, तेल, मीठ किंवा सैंधव 

कृती :  

  • काळे तिळ स्वच्छ करुन द्या. बरेचदा काळ्या तिळांमध्ये बारीक बारीक खडे असतात. जे दाताखाली आल्यावर त्याची चव बिघडते. 
  • एक पॅन घेऊन त्यामध्ये काळे तिळ, शेंगदाणे, सुकं खोबरं एक एक करुन भाजून घ्या. तिळ भाजताना ते पॅनमध्ये उडू लागतात. तसे उडू लागले की, तिळ भाजले असे समजावे. 
  • लसूण सोलून घ्यावे. लसूण जितके जास्त तितकी ही चटणी अधिक चांगली लागते. फोडणी पात्र घेऊन त्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घालून सोललेली लसूण चांगली तळून घ्या. लसूण थोडी कुरकुरीत झाली की, गॅस बंद करा. 
  • एका मिक्सरच्या भांड्यात तिळ, खोबरं, शेंगदाणे, तेलातील लसूण एकत्र करावी. मिक्सरमध्ये ही चटणी बारीक वाटून घ्यावी. जर चटणी फारच कोरडी वाटत असेल तर त्यामध्ये थंड तेल घालावे. 
  • मस्त चुरचुरीत चटणी तयार
  • ही चटणी एअर टाईट डब्यात भरुन तुम्ही ठेवू शकता. ही चांगली दोन ते चार महिने टिकते. जर तुम्हाला थोडी तिखट चटणी आवडत असेल तर त्यामध्ये लाल मिरची पावडर घालायला विसरु नका.

पानाच्या डाव्या बाजूला वाढण्यासाठी चटणीचे प्रकार

ADVERTISEMENT

या सोबत खाऊ शकता चटणी

चटणी ही कशासोबतही खाता येते. पण गरम गरम भाकरी आणि डाळ-भात किंवा तूप भात आणि चटणी हे कॉम्बिनेशनही फारच कमाल आहे. तुम्ही अशा पद्धतीनेही ही चटणी खाऊ शकता. थंडीच्या दिवसात ही चटणी तुमच्या शरीरात उष्णता निर्माण करुन तुम्हाला उर्जा देण्याचे काम करते. ही चटणी इतकी चविष्ट असते की, ती जास्त खाण्याचा मोह झाला तरी देखील एक मोठा चमचा एक दिवसासाठी पुरेसा आहे.

अशा पद्धतीने तयार करा हेल्दी अशी काळ्या तिळाची चटणी. तुम्हीही नक्की ट्राय करा या शिवाय विविध राज्यातील खास चटकदार  चटण्या देखील घरी करुन पाहा. तुम्हाला त्या नक्की आवडतील

03 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT