ADVERTISEMENT
home / Uncategorized
blush-shades-for-indian-skin-tone-in-marathi

भारतीय स्किन टोनवर शोभतात हे ब्लश

मेकअप करताना आपल्याला अनेक उत्पादनांचा वापर करावा लागतो. मेकअप केल्यानंतर एक वेगळाच लुक मिळतो. मेकअप करताना ब्लशचा (Blush) वापर केला नाही तर मेकअप अपूर्ण वाटतो. काही महिला या मेकअप करताना अनेक उत्पादनांचा वापर करत नाहीत, पण ब्लशचा वापर मात्र न चुकता करतात. कारण त्यांनाही माहीत आहे की, ब्लश हे आपल्या लुकला अधिक चांगली शोभा मिळवून देते. ब्लश तुमच्या गालांना केवळ हलकासा रंग देतो असं नाही तर तुमच्या ओव्हरऑल लुकलाही यामुळे शोभा मिळते. इतकंच नाही तर हे तुमच्या चेहऱ्यावर एक चांगली चमक आणि ताजेपणा आणण्यासही मदत करते. मात्र ब्लशचा योग्य वापर तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही ब्लशच्या रंगाची निवड चांगली करता. भारतीय स्किन टोननुसार अनेक ब्लश मिळतात. मात्र त्यापैकी कोणते ब्लश अधिक चांगले आहेत आणि त्याचा वापर केल्याने तुमचा रंग अधिक खुलून दिसतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घेऊया कोणते ब्लश शेड्स (Blush Shades) भारतीय स्किन टोनवर अधिक चांगले दिसून येतात.  

कोरल ब्लश शेड्स (Coral Blush Shades)

जेव्हा आपण भारतीय स्किन टोन (Indian Skin Tone) बाबत समजून घेतो, तेव्हा याबाबतीत महत्त्वाचे म्हणजे हा एक वॉर्म स्किन टोन आहे आणि त्यासाठी योग्य ब्लशच्या शेड्सची निवड करणे थोडे कठीण असते. लक्षात ठेवा की, तुम्ही चुकीची शेड निवडल्यास, तुमचा चेहरा अधिक खराब दिसू  शकतो. त्यामुळे तुमचा चेहरा जर गव्हाळ असेल तर तुम्ही अशा स्किन टोनसाठी नैसर्गिक सुंदर आणि चमकदार करण्यासाठी पीच अथवा कोरलच्या वेगवेगळ्या शेड्सचा ब्लश म्हणून वापर करू शकता. यामुळे तुमचा चेहरा अधिक सुंदर आणि तजेलदार दिसण्यास मदत मिळेल. तसंच या स्किनटोनवर या शेड्स अधिक उठावदार दिसतात. 

पिंक ब्लश शेड्स (Pink Blush Shades)

ब्लश शेड्समध्ये पिंक अर्थात गुलाबी ही एक अशी शेड आहे, जी प्रत्येक भारतीय महिलांना उपयोगी ठरते. वास्तविक याचा वापर करताना तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, कोणत्याही गुलाबी रंगाच्या दोन शेड्स या एकसारख्या नसतात. त्यामुळे तुम्हाला समसमान लुक मिळू शकत नाही. त्यामुळे पिंक ब्लश तुम्ही लावत असाल तर तुम्ही तुमच्या स्किनटोननुसार याची निवड करा. उदाहरणार्थ तुमचा रंग गोरा असेल तर तुम्ही सॉफ्ट गुलाबी रंगाची निवड करा. तर तुमचा रंग सावळेपणापेक्षा अधिक गडद असेल तर तुम्ही वॉर्म पिंक शेड्सचा वापर करा. अशा पद्धतीने तुम्ही पिंक ब्लशचा वापर करून अधिक सुंदर दिसू शकता. 

ब्राऊन ब्लश शेड्स (Brown Blush Shades)

ब्लशमध्ये ब्राऊन शेड्सदेखील भारतीय स्किन टोनसाठी अधिक चांगले मानण्यात आले आहे. जर तुम्हाला एखादा म्युट लुक (Mute Look) क्रिएट करायचा असेल तर तुम्ही ब्राऊन ब्लश शेड्सचा पर्याय निवडू शकता. तुम्हाला हवं असेल तर ब्राऊन ब्रॉन्झर तुम्ही तुमच्या गालाला लावा आणि तुमचा लुक अधिक सुंदर करा. तुम्हाला तुमचा लुक ग्लॅमरस हवा असेल तर तुम्ही या शेड्सचा वापर करू शकता. तुमचा कोणताही स्किन टोन असला तरीही ही शेड तुम्हाला चांगली दिसते. विशेषतः सावळ्या आणि गोऱ्या रंगावर हा रंग अधिक उठून दिसतो आणि पार्टीसाठी तुम्ही याचा नक्कीच वापर करून घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT