ADVERTISEMENT
home / आरोग्य
चिडचिडेपणा

सतत होणारी चिडचिड सांगते तुमच्या शरीरातील कमतरता

राग येणे हा प्रत्येकाचा स्वभाव आहे. खूप जणांना अगदी क्षुल्लक कारणावरुन राग येतो. घरी आल्यानंतर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे काही होताना दिसले नाही की, अशी व्यक्ती चिडचिड करु लागते. घरात अशी एखादी व्यक्ती असतेच जिचा राग अगदी लहानसहान कारणावरुन अनावर होतो. अशी सतत होणारी चिडचिड त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी फारच हानिकारक असते. पण ही सतत होणाऱ्या चिडचिडेपणासाठी काही गोष्टी या नक्कीच कारणीभूत असतात. त्या आपण जाणून घ्यायला हव्यात. कदाचित हा चिडचिडेपणा तुम्हाला या शारीरिक कमतरतेमुळेही आलेला असू शकतो.

अतिस्वच्छता ही बिघडवू शकते मानसिक आरोग्य

अपुरी झोप

हल्ली कामाचा ताण सगळ्यांसाठी इतका झाला आहे की, खूप जणांंच्या कामाच्या वेळा या बदलून गेल्या आहेत. खूप जण हे हल्ली फारच कमी झोपतात. ही झोप एक दिवसापूरती असेल तर ती एका दिवसात कदाचित पूर्ण होण्यास मदत मिळेल. पण ही झोप खूप दिवसांची किंवा महिन्याची राहून गेलेली असेल तर मात्र काही कालावधीनंतर ती झोप कितीही पूर्ण केली तरी पूर्ण होत नाही. अशी अपुरी झोप ही देखील तुमच्या चिडचिडेपणाचे कारण ठरु शकते. त्यामुळे तुमच्या चिडचिडेपणाचे कारण हे अपुरी झोप तर  नाही ना हे जाणून घ्या. 

कॅल्शिअमची कमतरता

शरीरात कॅल्शिअमची कमतरता असेल तर अशावेळीही तुमची चिडचिड होणे स्वाभाविक आहे. खूप जणांचा चिडचिडेपणा हा शरीरातील कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होत असतो. जर तुमच्या शरीरात अशी कॅल्शिअमची कमतरता असेल तर तुम्हाला सांधेदुखी, कंबरदुखी असे काही त्रास होण्याची नक्कीच शक्यता असते. जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या शरीरातील कॅल्शिअमची पातळी तपासून घ्या. शरीरातील कॅल्शिअम वाढवण्याचा प्रयत्न करा

ADVERTISEMENT

टेस्टोस्टेरॉनची कमतरता

पुरुषांसाठी टेस्टोस्टेरॉनची कमतरता असणे हे शरीरासाठी फारच त्रासदायक ठरु शकते. पुरुषांमध्ये असलेला हा घटक त्यांच्या मूडवर परिणाम करतो. जर शरीरातून टेस्टोस्टेरॉनची कमतरता कमी झाली असेल तर पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोन्हीमध्ये जीवनाला आणि सेक्सला घेऊन आनंद कमी झालेला दिसतो. जर हा आनंद मिळाला नाही तरीदेखील नक्कीच दोघांमध्ये चिडचिडेपणा येऊ लागतो. 

हर्मोन्समध्ये बदल

हार्मोन्समध्ये होणारे बदल हे देखील तुमच्या आरोग्यासाठी फारच फरक दाखवणारे असतात. वाढत्या वयानुसार आणि शरीरातील कमतरतेमुळे खूप जणांना हार्मोन्समध्ये बदल होतात. जर असे बदल होत असतील तर तुमच्या स्वभावात त्याचा बदल आणि फरक जाणवू लागतो. जर तुम्हाला हा फरक जाणवत असेल तर तुम्ही  तुमच्या हार्मोन्सवरील योग्य औषधे नक्की घ्या. त्यामुळेही तुमच्यामध्ये फरक पडेल. 

आता तुमचा चिडचिडेपणा या कारणामुळे होत असेल तर या गोष्टींचा नक्की विचार करा.

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव कारणांमुळे वंधत्वाच्या समस्येत वाढ

ADVERTISEMENT
01 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT