इरफान खानच्या निधनाच्या दुःखातून सावरायच्या आधीच आता बॉलीवूडला अजून एक धक्का पोहचला आहे. बॉलीवूडचा चॉकलेट हिरो ऋषी कपूर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनी ही बातमी ट्विट करून दिली आहे. ऋषी कपूर आपल्याला सोडून निघून गेला असून आपण आता पूर्णतः संपलो आहोत अशा तऱ्हेने अमिताभ बच्चन यांनी दुःख व्यक्त केले आहे. ऋषी कपूर यांना रिलायन्स रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे भरती केले होते. याची माहिती त्यांचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी रात्रीच दिली होती. मात्र ही सकाळ अशी उजाडेल अशी कोणालाही स्वप्नातही जाणीव नव्हती. आज सकाळी 8.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले दोन वर्ष लुकेमियाशी लढा दिल्यानंतर ऋषी कपूरने अखेरचा श्वास घेतला.
कार्तिक आर्यनला हवाय दाढी करण्यासाठी सल्ला, दिला फराहा खानला त्रास
बुधवारी करण्यात आले होते रूग्णालयात भरती
T 3517 – He's GONE .. ! Rishi Kapoor .. gone .. just passed away ..
I am destroyed !— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 30, 2020
बुधवारी सकाळी ऋषी कपूर यांच्या कुटुंबीयांनी एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांना भरती केले होते. ऋषीच्या तब्बेतीबाबत त्यांच्या मोठ्या भावाने अर्थात रणधीर कपूरने सांगितले होते, ‘ऋषी रुग्णालयात आहे. त्याला कॅन्सर आहे आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत आहे, त्यामुळे त्याला भरती करण्यात आले आहे. मात्र आता त्याची तब्बेत स्थिर आहे.’ याआधीही फेब्रुवारीमध्ये दिल्लीमध्ये तब्बेत अचानक बिघडल्यामुळे ऋषी कपूर यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्यातून बरे होऊन ऋषी पुन्हा मुंबईत आले होते. त्यावेळी स्वतः ऋषीने आपल्याला इन्फेक्शन झाल्याचे सांगितले होते. पण दिल्लीतून मुंबईत आल्यानंतरही पुन्हा एकदा व्हायरल फिव्हरमुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले होते.
जेव्हा जया बच्चन यांच्यामुळे ऐश्वर्याला कोसळलं होतं रडू
ऋषी कपूर होते बिनधास्त
ऋषी कपूर आपल्या बोलण्यासाठी जास्त प्रसिद्ध होते. त्यांनी बॉलीवूडमध्ये केलेले काम हे तर अप्रतिम आहेच. मात्र त्यांनी आपल्या बोलण्यानेही बऱ्याच जणांशी पंगा घेतल्याच्या बातम्या नेहमी प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र आपले विचार ते अत्यंत परखडपणे मांडत आणि त्यामुळे त्यांच्याशी जास्त वाद घालण्यात कोणीही पुढे येत नसे. सोशल मीडियावरही सामाजिक मुद्दयांवर ते आपले मत अतिशय परखडपणे मांडत होते. मात्र 2 एप्रिलनंतर त्यांनी कोणत्याही प्रकारेच ट्विट केलेले नाही. आपल्या तब्बेतीमुळे ऋषी अत्यंत त्रास सहन करत असल्याने समजते. मात्र त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी अगदी पहिल्या दिवसापासून त्यांची साथ दिली. तसंच त्यांची मुलगी रिद्धिमा आणि रणबीरही त्यांच्या या काळात सतत त्यांच्यासह होते.
इरफान खानची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी, 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बॉलीवूड धक्क्यात
कपूर खानदानाचा एक तारा निखळल्याने बॉलीवूडही धक्क्यात आहे. इरफान खान यांच्या निधनाच्या बातमीला अजून 24 तासही उलटून गेलेले नाहीत आणि आता हे दुःख सर्वांना सहन करावे लागणार आहे. त्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कोणालाही सध्या काहीही सुचत नाहीये हे नक्की. ऋषी कपूर यांनी अगदी आपल्या लहानपणापासून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले आणि पुन्हा मागे वळून पाहिले नाही. अमिताभ बच्चन आणि त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे ऋषी कपूर गेल्याचा सर्वात जास्त धक्का अमिताभ बच्चन यांना बसला आहे. त्यांनी तसे आपल्या ट्विटमध्येही म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वीच ऋषीची बहिणीचेही निधन झाले होते. त्यामुळे सध्या कपूर खानदानावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे असेच म्हणावे लागेल.