संजय दत्तचा अभिनय हा तर नेहमीच बऱ्याच प्रेक्षकांना आवडला आहे पण त्याहीपेक्षा संजय दत्तचं खासगी आयुष्य जास्त चर्चेत राहिलं आहे. संजय दत्त पाच वर्षांची शिक्षा भोगून आला. त्यानंतर त्याने पुन्हा बॉलीवूडमध्ये नवी इनिंग सुरू केली. मात्र त्याच्या मागची साडेसाती काही संपायचं नाव घेत नाही. संजय दत्त दोन दिवसांपूर्वीच श्वास घ्यायला त्रास होत असल्याने लीलावतीमध्ये दाखल झाला होता. त्याची कोरोना टेस्ट तर नेगेटिव्ह आली मात्र आता वेगळ्याच आजाराने त्याला ग्रासले असल्याचे समोर आले आहे. संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाला असून काही काळासाठी आपण ब्रेक घेत असल्याचं त्याने सोशल मीडियावरून सांगितलं आहे. पुढील उपचारासाठी संजय दत्त आता अमेरिकेला जाणार असल्याची चर्चा असून त्याला नक्की कोणत्या स्टेजचा कॅन्सर झाला आहे याची मात्र माहिती मिळू शकलेली नाही. पण आपण लवकरच परत येऊ असा विश्वास संजय दत्तने व्यक्त केला आहे.
मंगळवारी ब्रेक घेत असल्याचे केले घोषित
रुग्णालयात दाखल झालेला संजय दत्त सोमवारी घरी परतला. त्याची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली मात्र अचानक आपण तब्बेतीच्या कारणामुळे कामातून ब्रेक घेत असल्याचं संजय दत्तने सोशल मीडियावर सांगितले. इतकेच नाही तर कोणत्याही अफवा पसरवू नका मी लवकरच काम करायला सुरूवात करेन असंही त्याने म्हटलं आहे. संजय दत्तने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात म्हटले की, ‘मित्रांनो, सध्या वैद्यकीय उपचार सुरू असल्याने मी काही वेळासाठी चित्रपटांमधून ब्रेक घेत आहे. माझे कुटुंबीय आणि मित्र माझ्यासोबत आहेत. माझ्या सर्व शुभचिंतकांनी काळजी करू नये आणि कोणीही अफवा पसरवू नयेत. तुमच्या प्रार्थना आणि प्रेमामुळे मी लवकरच परत येईन.’ यानंतर अनेक त्याच्या सहकलाकारांनीही त्याला काळजी घेण्याचे मेसेज सोशल मीडियावरही केले आहेत.
लाईक्स, कमेंट शेअरच्या मायाजाळापासून दूर राहा- मानुषी छिल्लर
मान्यता आणि मुलं दुबईत
लॉकडाऊनच्या आधी संजय दत्तची बायको मान्यता आणि त्याची दोन्ही मुलं दुबईला गेले होते. तिघेही गेल्या पाच महिन्यांपासून तिथे अडकले असून अजूनही परतले नाहीत. मध्यंतरी आपल्या बायकोची आणि मुलांची आपल्याला खूपच आठवण येत असल्याचेही संजय दत्तने सोशल मीडियावरून सांगितले होते. मात्र ते तिथे सुरक्षित असल्याने आपण इथे निश्चिंत आहोत असंही त्याने म्हटले होते.
यंदा दहीहंडी साजरी करा घरीच, ऐका ही हिट बॉलीवूड गाणी
आई आणि पहिल्या बायकोलाही होता कर्करोग
संजय दत्तच्या मागची संकटं काही केल्या संपत नाहीत अशीच काहीशी भावना त्याच्या चाहत्यांची आहे. संजय दत्तचे अनेक फॉलोअर्स आहेत आणि अगदी आजची पिढीही त्याला फॉलो करते. मात्र त्याच्या खऱ्या आयुष्यात त्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं आहे. आता फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान संजय दत्तला झालं असून त्याची आई नर्गिस दत्तही कर्करोधानेच निधन पावली होती. इतकंच नाही तर त्याची पहिली पत्नी रिचा शर्माही कर्करोगानेच निधन पावली होती. आईच्या जाण्यानंतर संजय दत्त स्वतःला बराच काळ सावरू शकला नव्हता. आता त्याला स्वतःलाही कर्करोगाने ग्रासले आहे. गेल्या काही वर्षात कर्करोगाने अनेक कलाकारांना ग्रासलेले दिसून येत आहे. त्यापैकी सोनाली बेंद्रेने कर्करोगावर मात केली तर ऋषी कपूर आणि इरफान खान यांना कर्करोगामुळे जीव गमवावा लागल्याचे दिसून आले आहे. संजय दत्त लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत असून पुन्हा एकदा संजय दत्त लढवय्याप्रमाणे परत येईल याची त्याच्या चाहत्यांना नक्कीच खात्री आहे. मात्र या बातमीमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
अचानक ट्रेंडिंगमध्ये आलेली धनश्री वर्मा कोण आहे, लवकरच होणार क्रिकेटरची बायको
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा