एक वेळ अशी होती जेव्हा लहान पडद्यावर काम करण्यासाठी मोठे स्टार्स नकार द्यायचे. पण 2000 साली ‘कौन बनेगा करोडपती’ने सर्व गणितं बदलली. अमिताभ बच्चन यांनी एक नवी सुरूवात करून दिली. त्यानंतर अनेक रियालिटी शो मध्ये स्टार्स हजेरी लावू लागले. अगदी शाहरूख, सलमान, माधुरी या सगळ्यांनी वेगवेगळ्या रियालिटी शो मधून हजेरी लावली. त्याचप्रमाणे आता बॉलीवूड स्टार्सची नजर येऊन थांबली आहे ती म्हणजे डिजीटल ऑडियन्सवर. काही असे स्टार्स आहेत ज्यांना मोठ्या पडद्यावर यश नसेल मिळालं पण त्यांना वेबसिरीजमधून यश मिळालं. तर काही स्टार्स असे आहेत ज्यांनी वेबसिरीजमध्ये नशीब आजमावलं पण त्यांना त्यातही यश मिळालं नाही. आपण अशाच काही स्टार्सबद्दल जाणून घेणार आहोत.
आर माधवन
अभिनेता आर. माधवन हा बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अतिशय मोठा स्टार आहे. 2018 मध्ये आर. माधवनने ‘ब्रीद’ नावाची आपली पहिली वेबसिरीज केली. या वेबसिरीजमधून माधवनने पदार्पण केलं आणि आपही कोणत्याच क्षेत्रात कमी नाही हे दाखवून दिलं. ही वेबसिरीज प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि माधवनचं कामदेखील. त्यामुळे चित्रपट, टीव्ही आणि आता वेबसिरीजमध्येही माधवनने आपली छाप पाडली असं म्हणायला हवं.
सैफ अली खान और नवाज़ुद्दीन सिद्दीकी
नेटफ्लिक्स ओरिजिनल सिरिज “सेक्रेड गेम्स” ही वेबसिरीज प्रचंड प्रसिद्ध झाली. त्याचा पुढचा भाग कधी येणार याचीही प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. या वेबसिरीजमधून सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी पदार्पण केलं. हे पदार्पण इतकं अप्रतिम होतं की, प्रेक्षकांनी अक्षरशः ही वेबसिरीज उचलून धरली. सैफ अली खान आणि नवाजुद्दीन यांनी इतकं अप्रतिम काम केलं की आता पुढच्या भागांमध्ये इतर अभिनेत्यांना काम करण्याचीही इच्छा आहे.
राजकुमार राव
एकता कपूरच्या ऑल्ट बालाजीवर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आयुष्यावर आधारित वेबसिरीज “बोस” देखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. या वेबसिरीजमध्ये नेताजींची भूमिका राजकुमार रावने अतिशय अभ्यासपूर्ण साकारली आहे. राजकुमार राव हा अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो कामात स्वतःला झोकून देतो. मोठा पडदा असो अथवा डिजीटल मीडिया असो राजकुमारने आपलं काम चोख बजावलं आहे.
दिया मिर्झा
अभिनेत्री दिया मिर्झाने बॉलीवूडमध्ये ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली. पण त्यानंतर आलेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवली नाही. आता दियाने वेबसिरीजमध्ये पाऊल ठेवलं आहे. महादेव फेम अभिनेता रोहित रैनासह तिने ‘काफीर’ या वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. या वेबसिरीजलादेखील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
2019 या जोड्यांच्या नशिबी आला विरह
शरमन जोशी
शरमन जोशीने काही चित्रपटांमध्ये अप्रतिम काम केलं आहे. कॉमेडीमध्ये शरमन जोशी अप्रतिम काम करतो अशी त्याची ओळख आहे. पण काही चित्रपटांनंतर शरमन कमाल दाखवू शकला नाही. मात्र आता एकता कपूरच्या ऑल्ट बालाजी वर आलेली नवी वेबसिरीज “बारिश” मध्ये आशा नेगीबरोबर शरमनने काम केलं. आता त्याचा दुसरा भागदेखील येत आहे. पण पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीला इतका आला नाही. तरीही आता त्याचा दुसरा भाग येत आहे. शरमनला या वेबसिरीजकडून खूप अपेक्षा होत्या.
राधिका आपटे
वेबसिरीज आणि राधिका आपटे हे तर समीकरण आहे. राधिका आपटे जी वेबसिरीज करते ती प्रसिद्धच होते असं म्हटलं जातं. राधिकावर तर वेबसिरीज करण्यावरून अनेक मीम्सदेखील करण्यात आले आहेत. चित्रपट असो वा वेबसिरीज राधिका आपटेला यश हे मिळतंच. राधिकाने आतापर्यंत वेबसिरीजमध्ये आपला एक दरारा निर्माण केला आहे.
बॉलिवूडचा ऋतिक रोशन ठरला 2019 मधील ‘सर्वात सेक्सी आशियाई पुरूष’
जॅकी श्रॉफ
बॉलीवूडमधील जग्गू दादा नावाने ओळखला जाणारा अभिनेता जॅकी श्रॉफनेदेखील वेबसिरीजमध्ये पाऊल ठेवलं आहे. विक्रांत मेस्सीच्या ‘क्रिमिनल जस्टीस’ मध्ये जॅकीने काम केलं आहे. पंकज त्रिपाठी, विक्रांत आणि जॅकीचं काम प्रेक्षकांना खूपच आवडलं. आता पुन्हा नव्या कोणत्या सिरीजमध्ये जॅकी दिसणार याचीही प्रेक्षक वाट पाहत आहेत.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.