ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
ही अभिनेत्री होणार आई, दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

ही अभिनेत्री होणार आई, दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

सध्या लग्न आणि आई होण्याचा सीझनच चालू आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. दोनच महिन्यांपूर्वी आपल्या लग्नाची बातमी देणाऱ्या ‘ये जवानी है दिवानी’ फेम अभिनेत्री एव्हलिन शर्माने (Evelyn Sharma) आता आपण आई होणार असल्याचे शेअर केले आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिने फोटो पोस्ट करत ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. 15 मे रोजी एव्हलिनने आपला बॉयफ्रेंड तुषान भिंडी याच्याशी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे विवाह पार पाडला. त्यानंतरही एव्हलिन नेहमीच आपल्या अकाऊंटवरून त्यांच्या हनीमूनचे आणि तिच्या इतर प्रोजेक्टबद्दल फोटो शेअर करत होती. आता तर तिच्या चाहत्यांसाठी तिने हा फोटो शेअर करत सुखद धक्का दिला आहे. 

अर्जुन कपूर आणि तारा सुतारियाच्या ‘एक व्हिलेन रिटर्न्स’चं शूटिंग सुरू

खूप आतुरतेने तुझी वाट पाहत आहे

‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट कोणाला माहीत नाही असं होणारच नाही आणि यामधील लाराची भूमिका करणारी एव्हलिन शर्मादेखील (Evelyn Sharma) सर्वांच्याच लक्षात आहे. एव्हलिनने आपला बॉयफ्रेंड तुशान भिंडी याच्याशी विवाहबद्ध झाल्याचे जून महिन्यात फोटो शेअर करत जाहीर केले. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आता एव्हलिनने दोन महिन्यानंतरच आपण गरोदर असल्याचेही फोटो शेअर करत जाहीर केले आहे. तर आनंदाने तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुला माझ्या हातात घेण्यासाठी मी तुझी खूपच आतुरतेने वाट पाहात आहे’. तिने शेअर केलेल्या या बातमीनंतर इंडस्ट्रीतील तिच्या मित्रमैत्रिणींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. इतकंच नाही तर तिच्या चाहत्यांनीही तिचे मनापासून अभिनंदन केले आहे. 2019 मध्ये एव्हलिन आणि तुशानने साखरपुडा केला होता तर आता मे महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये दोघेही विवाहबद्ध झाले. दरम्यान एव्हलिनने आपल्या हनिमूनचे फोटो शेअर करत आपण कायम तुझ्यासह असंच हनीमून करत राहू असंही प्रेमात म्हटलं होतं. आज 12 जुलैला एव्हलिनचा वाढदिवस असतो आणि तिच्यासाठी यापेक्षा मोठं गिफ्ट काहीच असू शकत नाही असंही तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. इतकंच नाही तर आपल्याला सध्या चंद्रावर असल्यासारखं वाटत असून मी माझ्या बाळाला घेऊन मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाला लवकरच भेटू शकेन अशी आशा करते अशीही भावना तिने व्यक्त केली आहे. तर ऑस्ट्रेलियामध्येच ती आपल्या बाळाला जन्म देणार असल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे. तुषार आणि एव्हलिनचे हे पहिलेच बाळ आहे. 

दिलबरो म्हणत मुलीची केली पाठवणी, सुनील बर्वेचा व्हिडिओ व्हायरल

ADVERTISEMENT

जवळच्या मित्राशी लग्न करणे हे सुख

2019 मध्ये तुशानसह एव्हलिनने साखरपुडा केला होता. तुशानने एव्हलिनला सिडनीमधील हार्बर ब्रिजवर लग्नाची मागणी घातली होती. इतकंच नाही तर एव्हलिनच्या आनंदासाठी त्याने एक खास नोटही यावेळी लिहिली होती. ही गोष्ट एव्हलिनने एका मुलाखतीमध्येही सांगितली होती. तर तुशान हा ऑस्ट्रेलियातील एक डेंटल सर्जन आहे आणि एव्हलिनचा सर्वात जवळचा मित्र आहे. त्यामुळे एव्हलिनने आपल्या भावना व्यक्त करत सांगितले होते की, ‘आपल्या सर्वात जवळच्या मित्राशी लग्न करणे यापेक्षा कोणतीच चांगली गोष्ट असू शकत नाही. संपूर्ण आयुष्य एकत्र घालविण्यासाठी आम्ही दोघेही उत्सुक आहोत.’ आता दोघांच्याही आयुष्यात बाळाच्या पावलाने अजून एक आनंद येत आहे. त्यामुळे दोघांचाही संसार आता सुखाचा सुरू झाल्याचे तिच्या चाहत्यांनाही वाटत आहे. 

खऱ्या आईबद्दल विचारणाऱ्यांना सुश्मिता सेनच्या मुलीने दिलं असं उत्तर

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT