एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रींना सतत एक सारख्याच भूमिका कराव्या असत. प्रेक्षकांना पडद्यावर नेहमीच सदगुणी आणि सोशिक रूपातच नायिकांना पाहायला आवडत असे. नायिकांनी ग्रे शेड साकारणं त्यांच्या करिअरसाठी योग्य नाही असं तेव्हा मानलं जात असे. वास्तविक चांगला कलाकार कोणत्याही भूमिकेत जीव ओतून तिला जीवंत करू शकतो. मग ती भूमिका सकारात्मक असो वा नकारात्मक. बॉलीवूडमध्येही अशा अनेक दिग्गज अभिनेत्री आहेत ज्यांनी निगेटिव्ह रोल साकारूनही चित्रपट हिट करून दाखवले होते. ज्यामुळे चित्रपटांमधील नकारात्मक भूमिकांनाही योग्य न्याय मिळाला.यासाठीच जाणून घेऊया बॉलीवूडमध्ये ग्रे शेड साकारणाऱ्या काही अभिनेत्रींविषयी…ज्यांनी करिअरची पर्वा न करता चित्रपटांमध्ये खलनायिका साकारल्या होत्या. नायिकेप्रमाणेच उत्तम खलनायिका साकारणाऱ्या या अभिनेत्री आजही आहेत सुपरहिट
प्रियांका चोप्रा –
प्रियांका चोप्राला बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ या नावाने ओळखलं जातं. बॉलीवूड आणि हॉलीवूड गाजवणाऱ्या प्रियांकाने ‘ऐतराज’ या चित्रपटात निगोटिव्ह रोल केला होता. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि करिना कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील प्रियांकाच्या भूमिकेला लोकांनी एवढा चांगला प्रतिसाद दिला की तिला यासाठी फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता.
काजोल –
अनेक चित्रपटांमधून रोमॅंटिक आणि सशक्त नायिकेची भूमिका साकारणाऱ्या काजोलनेही एके काळी नकारात्मक भूमिका साकारलेली आहे. काजोल ‘गुप्त’ या चित्रपटात निगोटिव्ह रोलमध्ये दिसली होती. गुप्तमधील काजोलची ही नकारात्मक भूमिका पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. एवढंच नाही तर काजोलमुळे हा चित्रपट हिटदेखील झाला होता.
रेखा –
दिग्गज अभिनेत्री रेखाने केवळ नायिकाच नाही तर खलनायिकेच्या रूपातही प्रसिद्धी मिळवली आहे. ‘खिलाडिओं का खिलाडी’ या चित्रपटात रेखाने माया मॅडमची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी रेखाला अनेक पुरस्कार मिळाले होते. प्रसिद्धीच्या झोतात असताना असा निर्णय घेणं आणि तो यशस्वी करून दाखवणं हे लोकांनी रेखाकडून शिकायला हवं.
अरूणा ईराणी –
नव्वदीच्या काळात अनिल कपूर आणि माधुरी दिक्षीत यांचा ‘बेटा’ हा चित्रपट खूप गाजला होता. मात्र त्याचं श्रेय जातं ते अभिनेत्री अरूणा ईराणी यांना. कारण या चित्रपटात त्यांनी साकारलेली नकारात्मक भूमिका लोकांना प्रंचड आवडली होती. अरूणा यांनी साकारलेली सावत्र आईची भूमिका आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहे. या चित्रपटामुळे अरूणा ईराणी यांच्या करिअरला चांगलाच टर्निंग पॉईंट मिळाला आणि त्यांना निरनिराळ्या स्वरूपाच्या भूमिकांसाठी ऑफर मिळू लागल्या.
जुही चावला-
कयामत से कयामत तक मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली जुही चावला म्हणजे बॉलीवूडची एक सुंदर आणि चुलबुली अभिनेत्री. मात्र जुही चावलानेही चित्रपटात नकारात्मक भूमिका साकालेली आहे. ‘गुलाब गॅंग’ या चित्रपटात तिने निगेटिव्ह रोल करून तिच्या चाहत्यांना धक्का दिला होता. या चित्रपटात तिच्यासोबत माधुरी दिक्षीतही मुख्य भूमिकेत होती.
या अभिनेत्रींप्रमाणेच बिपाशी बासूने राज 3, इशा गुप्ताने रुस्तम, विद्या बालनने इश्किया, कंगनाने क्रिश 3, तब्बूने मकबूल, अमृता सिंगने कलयुग, कोंकना सेनने एक थी डायन आणि प्रिती झिंटाने अरमान या चित्रपटांमध्ये खलनायिका साकारली होती.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
निक जोनस आधी खरंच ‘या’ व्यक्तीशी झालं होतं का प्रियांकाचं लग्न, जाणून घ्या सत्य
साजिदसोबतच्या लग्नाला दिव्या भारतीच्या पालकांचा होता विरोध