बॉलीवूड अभिनेत्रींच्या दिलखेचक अदा आणि सौंदर्यांचे चाहते अनेक असतात. त्यामुळे चित्रपटातील प्रत्येक अभिनेत्रीचा रोल नेहमी सुंदर आणि ग्लॅमरसच असावा असं आपल्याला वाटत असतं. मात्र बऱ्याचदा कथानकाच्या गरजेनुसार हिरॉईनचे पात्र रंगवले जाते. कारण भूमिकेची नॉन ग्लॅमरस असेल तर ती साकारण्यासाठी अभिनेत्रींना स्वतःमध्ये काही बदल करावे लागतात. अशावेळी अभिनेत्री कितीही ग्लॅमरस असली तरी तिला पदड्यावर नॉन ग्लॅमरस भूमिकाच साकारावी लागते. आजवर अनेक बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींनी असे नॉन ग्लॅमरस रोल केलेले आहेत. जाणून घेऊ या अशा बॉलीवूड अभिनेत्रींबाबत ज्यांनी त्यांच्या नॉन ग्लॅमरस भूमिकांनी आजवर अनेक चित्रपट हिट केले आहेत.
आलिया भट
आलिया भटने खूप कमी वेळात बॉलीवूडमध्ये स्वतःचं निराळं स्थान निर्माण केलं आहे. तिची सुरूवात जरी ‘स्टुडंट ऑफ दी इअर’ सारख्या ग्लॅम भूमिकेतून झाली असली तरी पुढे चित्रपटातील भूमिकांच्या गरजेनुसार तिने तिच्या लुकमध्ये बदल केलेला आहे. राजी, हायवे आणि उडता पंजाब हे चित्रपट आलियाने तिच्या नॉन ग्लॅम लुकमधील अप्रतिम अभिनयाने हिट केले होते. एवढंच नाही तर ता ती ‘गंगूबाई काठियावाडी’मध्येही एका हटके आणि नॉन ग्लॅमरस भूमिकेत झळकणार आहे.
दीपिका पादूकोण
बॉलीवूड अभिनेत्री दीपिकाने तिच्या सौंदर्य आणि फॅशन सेंसने स्वतःची एक वेगळं स्थान या क्षेत्रात कमावलं आहे. ज्यामुळे दीपिका आजच्या घडीला एक सुंदर आणि स्मार्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र तिचे अनेक चित्रपट आहेत ज्यात कथानकाची गरज म्हणून तिने नॉन ग्लॅमरस भूमिका निवडल्या आहेत. ‘पज्ञावत’ चित्रपटात ती सतत अंगभर झाकलेले कपडे आणि घुंगटमध्ये दिसली होती. एवढंच नाही तर ‘छपाक’ चित्रपटात अॅसिड अटॅक झालेल्या लक्ष्मी अग्रवालप्रमाणे दिसण्यासाठी तिने स्वतःची ग्लॅमरस ओळख काही काळ लपवून ठेवली होती.
प्रियांका चोप्रा
बॉलीवूडच्या या देसी गर्लने बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमध्येही चांगलं नाव कमावलं आहे. ती नेहमी तिच्या ग्लॅम आणि हॉट लुकने चाहत्यांना खिळवून ठेवते. मात्र ‘बाजीराव मस्तानी’ अथवा ‘बर्फी’सारख्या चित्रपटात मात्र कथानकाच्या गरजेनुसार तिने तिचा ग्लॅम लुक बाजूला ठेवला होता. फक्त अभिनयाच्या जोरावर तिने या चित्रपटात तिने खरी बाजी मारली होती.
कैतरिना कैफ –
कैतरिना कैफ जेव्हा बॉलीवूडमध्ये आली तेव्हा तिची ओळख एखाद्या काचेच्या अथवा शोभेची बाहुलीप्रमाणे होती. तिचे लटके झटके आणि इंग्रजाळलेलं हिंदी पाहून ती आयुष्यात फक्त ग्लॅमरस भूमिका करू शकेल असं अनेकांना वाटत होतं. मात्र तिने ‘राजनिती’ आणि ‘भारत’मधील नॉन ग्लॅमरस भूमिका साकारून चाहत्यांना अक्षरशः थक्क केलं. राजनितीतील तिचा अभिनय पाहून अनेकांना अक्षरशः तोंडात बोट घालावी लागली होती.
प्रिती झिंटा –
प्रिती झिंटा म्हणजे बॉलीवूडमधील एके काळची बबली गर्ल. तिच्या गालावरची खळी आणि चुलबुलीपणा पाहून ती एखाद्या नॉन ग्लॅमरस भूमिकेत कशी दिसेल असा अनेकांना प्रश्न पडला असेल. मात्र ‘वीरझारा’ चित्रपटात तिने वृद्ध महिलेची भूमिका साकारून स्वतःची चुलबुली इमेज खोडून काढली होती. वीरझारातील प्रितीचा अभिनय चित्रपट हिट होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण ठरलं.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
या कारणासाठी ‘गंगूबाई काठियावाडी’ होणार ओटीटीवर प्रदर्शित
नेटफ्लिक्सला कोरोनाचा या कारणामुळे बसतोय फटका
कोरोनापेक्षाही देशाला लागलेली ‘कीड’ म्हणजे राजकारण, अभिनेत्रीने व्यक्त केला राग