ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
बॉलीवूड आणि ड्रग्ज कनेक्शन, आजवर या सेलिब्रेटींची नावे आली आहेत पुढे

बॉलीवूड आणि ड्रग्ज कनेक्शन, आजवर या सेलिब्रेटींची नावे आली आहेत पुढे

बॉलीवूडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्ज कनेक्शनच्या चर्चा रंगत आहेत. त्यात पडली ती म्हणजे काल शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला झालेली अटक. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर शाहरूखचा मुलगा आर्यन खान त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत रंगे हात रेव्ह पार्टीत सापडला. एवढंच नाही तर त्या सर्वांकडे ड्रग्ज असल्याचे पुरावे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सापडले आहेत. या आठ जणांवर योग्य ती कारवाई लवकरच केली जाणार आहे. मात्र या प्रकारणामुळे पुन्हा एकदा बॉलीवूड आणि सेलिब्रेटींच्या ड्रग्ज कनेक्शनच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आजवर असे अनेक बॉलीवूड सेलिब्रेटी आहेत ज्यांची नावे ड्रग्ज प्रकारणात गुंतलेली आहेत.

ड्रग्ज प्रकरण आणि बॉलीवूड सेलिब्रेटी

बॉलीवूडचे असे अनेक सेलिब्रेटीज आहेत ज्यांची नावं ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहेत.

रिया चक्रवर्ती 

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. त्यावेळी चौकशी दरम्यान रियासोबत अनेक सेलिब्रेटींच्या नावाचा खुलासा झाला जे लोक ड्रग्जच्या आहारी गेले होते. यामध्ये बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींजची नावे गुंतलेली होती. रियाने या चौकशी दरम्यान ती आणि सुशांत ड्रग्ज घेत होते याची कबुली दिली होती. 

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया

ड्रग्ज प्रकरणात आणखी सर्वांजमोर जगजाहीर झालेले सेलिब्रेटी म्हणजे कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया. या दोघांजवळ ड्रग्ज सापडल्यामुळे त्यांना अटकही करण्यात आली होती. चौकशी दरम्यान या दोघांनी ते गांजा सेवन करत असल्याची कबुली दिली होती. मात्र ती दोघांना नंतर जामिनावर सोडण्यात आलं होतं. 

ADVERTISEMENT

रकुल प्रित सिंह

अभिनेत्री रकुल प्रित सिंहचं नावही ड्रग्ज प्रकरणात अडकलेलं आहे. रिया चक्रवर्तीकडून तिच्या नावाचा खुलासा झाल्यामुळे रकुलची एनसीबीने अचानक छापा टाकून चौकशी केली होती. या दरम्यान तिच्या घरी ड्रग्ज सापडलं होतं आणि तिने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली होती. 

अर्जुन रामपाल 

अभिनेता अर्जुन रामपालही ड्रग्ज घेण्यावरून चर्चेत आहे. एनसीबीला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अर्जूनच्या घरी छापा मारला होता. त्यावेळी अर्जूनची गर्लफ्रेंड ग्रॅबिलियाच्या भावाकडे ड्रग्ज सापडलं होतं. ज्यामुळे अर्जुन आणि त्याच्या गर्लफ्रेंडला ड्रग्जबाबत चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. 

सारा अली खान 

सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खानलाही ड्रग्ज प्रकरणात चौकशीला सामोरं जावं लागलं होतं. यासाठी एनसीबीकडून तिला समन पाठवण्यात आलं होतं. सुशांत सिंह राजपूत प्रकारणात साराचे नाव चर्चेत होतं. सुशांतसोबत अफेअर आणि रिया चक्रवर्तीशी असलेली मैत्री यातून हे कनेक्शन समोर आलं होतं. ज्यासाठी साराची चौकशी करण्यात आली होती. 

दीपिका पादुकोण

ड्रग्ज प्रकरणात याआधी दीपिका पादुकोणच्या नावाची चर्चाही होती. दीपिकाचे नाव पुढे आल्यामुळे अनेकांना अक्षरशः धक्का बसला होता. यासाठी एनसीबीने दीपिकाची खूप वेळ चौकशी केली होती. एनसीबीकडे दीपिका पादुकोन आणि करिश्मा यांच्यात ड्रग्जचा व्यवहार झाल्याचे स्क्रिन शॉट होते. ज्यासाठी दीपिकाचं नाव चर्चेत आलं होतं.

ADVERTISEMENT

या व्यतिरिक्त याआधी ड्रग्ज प्रकरणात बॉलीवूड सेलिब्रेटी अरमान कोहली, एजाज खान, गौरव दीक्षित, संजय दत्त, ममता कुलकर्णी, फरदीन खान, गौरी खान अशा अनेक सेलिब्रेटीजची नावे गुंतलेली आहेत.

04 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT