home / मनोरंजन
mouni roy wedding

मौनी रॉयचे लग्न, गोव्यामध्ये रंगणार लग्नसोहळा

गेल्या अनेक महिन्यांपासून विशेषतः 2020 मधील लॉकडाऊनपासून अभिनेत्री मौनी रॉयच्या (Mouni Roy) लग्नाच्या वावड्या उठत आहेत. दुबतील व्यावसायिक सूरज नांबियार (Suraj Nambiar) याच्यासह मौनी लग्नगाठ बांधणार आहे असे अनेकदा सांगण्यात आले आहे. मात्र प्रत्येकवेळी मौनीच्या चाहत्यांची निराशाच झाली आहे. मात्र आता एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मौनी जानेवारी महिन्यातील 27 तारखेला दुबईत नाही तर भारतातच सूरजसह लग्न करण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान तिच्या लग्नाची तयारी सुरू झाली असून गोव्यातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हे लग्न होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मौनी सध्या दुबईत असून लग्नाची तयारी करत असल्याचेही म्हटले जात आहे. तर आमंत्रित करण्यात आलेल्या पाहुण्यांंना याबाबत कोणतीही चर्चा न करण्याबाबत सांगण्यात आले आहे. 

अधिक वाचा – कार्तिकनंतर साराच्या आयुष्यात आली आहे का ही व्यक्ती

गोव्यात होणार लग्न 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय ही गेले अनेक वर्ष डेट करत असणाऱ्या व्यावसायिक सूरज नांबियार याच्यासह लग्नगाठ बांधणार आहे. तिचे जवळचे मित्र प्रतीक उतेकर आणि राहुल शेट्टी यांनी संगीत कार्यक्रमाची तयारी सुरू केल्याचेही सांगण्यात येत आहे. तसंच संगीत तयारी जोरात चालू असून डान्स रिहर्सलदेखील चालू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसंच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मौनीच्या लग्नात सर्व व्यक्तींना आपले व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट दाखवणे अनिवार्य आहे. वागातोर बीचच्या (Vagator Beach) जवळ वेस्ट गोव्यात (West Goa) मौनीचे लग्न होणार आहे. लग्न दुपारच्या वेळेत समुद्रकिनारी होणार असून, 28 तारखेला दुसऱ्या दिवशी मौनी आणि तिचा होणारा पती सूरज हा आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवासाठी खास रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मौनीचे जवळचे मित्र मंदिरा बेदी, आश्का गोराडिया, मनिष मल्होत्रा, करण जोहर, एकता कपूर, अर्जुन बिजलानी हे या लग्नाला हजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अधिक वाचा – मराठी शिक्षणपद्धतीचा आरसा ‘बदली’

मंदिरा बेदीच्या घरी ठरले लग्न 

काही दिवसांपूर्वीच एका हिंदी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार मौनीच्या आईने मंदिरा बेदीच्या घरी सूरज नांबियारच्या आई आणि वडिलांची भेट घेत हे लग्न ठरविले असे सांगण्यात आले आहे. 2020 मध्येच या दोघांचे लग्न होणार होते. मात्र असे काहीही नसल्याचे मौनीने सांगितले होते. आता पुन्हा एकदा मौनीच्या लग्नाच्या चर्चांना नुसतेच उधाण आले नाही. तर तिच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. मात्र यावर मौनीने अजून कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे आता खरंच मौनी लग्न करणार की हीदेखील एक अफवाच ठरणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तर काही दिवसांपूर्वीच मौनीचा एक्स बॉयफ्रेंड याने सर्वांना धक्का देत लग्नाचे फोटो शेअर केले होते. त्याचवेळी आता अचानक मौनीदेखील आपल्या चाहत्यांना लग्नाचा धक्का देणार अशी चर्चा रंगायला लागली होती. मौनी नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. मात्र तिने कधीही आतापर्यंत आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासे केलेले नाहीत. त्यामुळे आता नक्की फोटो समोर आल्यावरच खुलासा होईल आणि त्यासाठी चाहते वाट पाहात आहेत. 

अधिक वाचा – इंद्रा आणि दिपूच्या नात्यात ट्विस्ट, सानूसोबत लागणार इंद्राचं लग्न

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 Jan 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text