कामगार कष्ट करतात म्हणून सर्व सामान्यांना अनेक सुविधा मिळतात. देश प्रगतीपथावर तेव्हाच जातो जेव्हा देशातील प्रत्येक व्यक्ती त्याच्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे करते. मग अंगमेहनत करून दररोज पैसे कमवणारे कष्टकरी मजूर असोत वा एसी ऑफिसमध्ये काम करणारे सुशिक्षित पगारी कर्मचारी. जगण्यासाठी प्रत्येकाला कष्ट, मेहनत ही घ्यावीच लागते. कामगारांच्या सन्मानासाठी आणि न्यायासाठी १ मेला खूप महत्त्व आहे. हा दिवस कामगारांच्या हितानिमित्त केल्या गेलेल्या आंदोलनाचे प्रतिक आहे. नव्वदीच्या शतकात कामगार चळवळीला एक भव्य रूप प्राप्त झाले होते. ज्यामध्ये कामगारांनी दिवसाचे कामाचे तास आठ असावेत अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. कामगारांनी काढलेल्या एका मोर्च्याला शिकागोमध्ये हिंसक वळण मिळालं होतं. पुढे १ मे १९९० ला कामगार चळवळ यशस्वी झाली आणि हा दिवस कामगार दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. आजही जगभरात १ मेला आंतराराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. १ मेहा दिवस महाराष्ट्रासाठी खास आहे कारण या दिवशी महाराष्ट्र दिन देखील असतो. यासाठीच सर्वांना द्या कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Maharashtra Day Wishes In Marathi). बॉलीवूडच्या काही जुन्या चित्रपटांमध्ये मजूरांवर होणारा अन्याय आणि संघर्ष दाखवण्यात आलेला आहे. एक काळ असा होता जेव्हा अशा धाटणीचे चित्रपट आणि कामगारांवर आधारित गाणी खूप हिट होत असत. म्हणूनच कामगार दिनानिमित्त ऐकूयात कामगारांवर आधारित खास गाणी
साथी हाथ बढाना ( नया दौर)
सुपरस्टार दिलीप कुमार आणि वैजंयती मालाचा चित्रपट नया दौर मध्ये साथी हाथ बढाना हे गाणं आहे. या गाण्यातील साथी हाथ बढाना… एक अकेला थक जाएगा तो मिलकर बोझ उठाना हे शब्द मजूरांचे कष्ट आणि त्यांच्यातील उत्साहाचे प्रतिक आहेत. या चित्रपटात काबाडकष्ट करणारे गरीब लोक आणि लबाड उद्योगपती यांची लढाई दाखवण्यात आली होती. पूर्वीच्या काळी हे गाणं खूपच गाजलं होतं. आजही कामगार दिनाच्या कार्यक्रमात हे खाणं आवर्जून लावलं जातं.
हम मेहनत कश इस दुनिया से (मजदूर)
कामगारांना हिंदीत मजदूर असं म्हटलं जातं. मजदूर हा चित्रपट कामगारांच्या जीवनावर आधारित होता. नावाप्रमाणेच यात कामगारांवर होणारे अन्याय आणि त्यांना करावा लागणाऱ्या संघर्षाचे चित्र दाखवण्यात आले होते. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती दिलीप कुमार आणि राज बब्बर यांनी. या गाण्यातून कामगारांच्या एकजुटीचे आणि ताकदीचे वर्णन केलेले आहे.
मेहनत कर इंसान ( इंसान जाग उठा)
भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५९ मध्ये इंसान जाग उठा नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्या चित्रपटात सुनिल दत्त आणि मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील एक गाणं हे खास कामगारांच्या जीवनावर आधारित आहे. माणसाने कष्ट केले तर तो मातीतून सोनं पिकवू शकतो आणि धरणीमातेला प्रसन्न करून घेऊ शकतो अशा आशयाचे हे गाणं आहे. हे गाणं प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी गायलं होतं.
दुनिया में हम आये है तो जीना ही पडेगा ( मदर इंडिया)
आजवर दुनिया में हम आये है तो जीना ही पडेगा हे गाणं बऱ्याचदा ऐकलं असेल. हे गाण मदर इंडिया चित्रपटातील आहे. या गाण्यातून त्या काळात मजूरांवर होणारा अन्याय आणि त्यांना जगण्यासाठी करावा लागणारा संघर्षाचे वर्णन करण्यात आलेला आहे. या गाण्यातून मजूरांच्या जीवनातील वेदना दिसून येते. हा चित्रपटा नरगिस, सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार यांच्या मुख्य भूमिका होत्या.
ठहर जरा ओ जानेवाले (बूट पॉलिश)
भारत स्वतंत्र झाल्यावर १८५३ एक चित्रपट प्रदर्शित झाला ज्याचं नाव होतं ‘बूट पॉलिश’ या गाण्याचे बोल ऐकून तुम्हाला केवळ दुःख होणार नाही तर तुमचे ह्रदय वेदनेने पिरगटून जाईल. कारण या चित्रपटात दोन लहान मुले आईवडिलांसाठी बूट पॉलिश करताना दाखवण्यात आली आहेत. भारतात आता बालकामगारांना मनाई आहे. मात्र एक काळ असा होता जेव्हा लहान मुलांनाही पैशांसाठी कष्ट करावे लागत होते.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
ही Remix गाणी एकेकाळी होती फारच प्रसिद्ध, तुम्हाला ही गाणी आठवतात का
Labour Day Poem is English