ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
mother's day in bollywood

असा साजरा झाला बॉलिवूडमध्ये मदर्स डे, स्टार्सने आईला दिल्या खास शुभेच्छा

भारतासह जगभरात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जात जातो. कालही जगभरात सगळीकडे मदर्स डे मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. मदर्स डेच्या या खास प्रसंगी प्रत्येक व्यक्तीला आपल्या आईसाठी काहीतरी खास करण्याची इच्छा असते. बॉलीवूड स्टार्सही या बाबतीत मागे नाहीत. काल अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपल्या आईसाठी हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केल्या आहेत. हृतिक रोशन, करीना कपूर, अक्षय कुमार या व इतर अनेक सेलिब्रिटींनी या खास दिवशी आपापल्या आईसाठी खास शुभेच्छा पोस्ट केल्या.  

हृतिक रोशनने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा 

हृतिकप्रमाणेच त्याची आई पिंकी रोशनही फिटनेस फ्रीक आहेत. वयाच्या या टप्प्यावरही त्या खूप फिट आहेत. सोशल मीडियावर अनेकदा त्यांचे फोटो पाहून लोक त्यांचे  कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत. काल हृतिकने त्याच्या आईसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत आणि त्यांना मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आपल्या आईसोबत योगा करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये हृतिक व त्याच्या आईचे छान नाते दिसून येत आहे. या फोटोंसोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मदर्स डे निमित्त तुमच्या सर्वांसोबत काही मॉमचे क्षण शेअर करत आहे. मी तिला एक चित्रपट दाखवायला घेऊन गेलो होतो जो तिला फारसा आवडला नाही. यानंतर तिने मला काही योगासने शिकवली, ज्याचा मला खूप आनंद झाला. आईला खरोखर बर्‍याच गोष्टी माहित आहेत. सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा, लव्ह यू आई.”

अक्षय कुमारनेही शेअर केली भावुक पोस्ट 

काल मदर्स डेच्या निमित्ताने जवळजवळ प्रत्येकानेच स्वतःच्या आईसोबतचे फोटो शेअर करून मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अक्षय कुमारनेही त्याच्या आईच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. यासोबतच त्याने आपल्या आईसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये तो तिला मिठी मारताना दिसत आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अक्षयने लिहिले की, “ एकही दिवस असा जात नाही की जेव्हा तुझी आठवण येत नाही, पण आज सगळ्यांचे मदर्स डे चे फोटो बघून तुझी खूप आठवण येते आहे. मिस यु आई!” गेल्या वर्षी अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे निधन झाले. अक्षयच्या या पोस्टला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या. 

रामचरण तेजाने शेअर केली आईसाठी व्हिडीओ क्लिप 

मदर्स डेच्या निमित्ताने अनेक सिनेतारकांनी सोशल मीडियावर आपल्या आईबद्दलचे प्रेम व्यक्त केले. साऊथ सुपरस्टार राम चरणनेही आपल्या आईसाठी एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर करत खास पद्धतीत आईला शुभेच्छा दिल्या. या क्लिपमध्ये राम चरण त्याच्या आईसोबत दिसत आहे. त्याचवेळी त्याचे वडील चिरंजीवी देखील या क्लिपमध्ये दिसत आहेत. या व्हिडिओसोबत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर एक गोड कॅप्शनही लिहिले आहे. त्याने लिहिले, “लव्ह यू आई, सर्वांना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा.’”राम चरणच्या या इन्स्टा पोस्टला चाहत्यांनी पसंती दिली. क्लिपवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले, लव्ह यू अण्णा. 

ADVERTISEMENT

स्मृती इराणींनी व्यक्त केल्या भावना 

स्मृती इराणी यांनी आपल्या आईसाठी इंस्टाग्रामवर एक मोठी नोट लिहिली. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आईच्या संघर्षाचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले की, “तुझ्यासाठी हे कधीच सोपे नव्हते…एक वेळ अशी आली की पुढच्या महिन्याचे घराचे भाडे कसे भरणार हे माहीत नव्हते…पण मी तुला कधी घाबरलेले पाहिले नाही…नशिबाला दोष देताना ऐकले नाही. जेव्हा जेव्हा आम्हाला आव्हानांचा सामना करावा लागला तेव्हा तुझे एकच उत्तर होते, चला लढूया.” 

आई अशीच असते, प्रत्येक परिस्थितीत मुलांच्या पाठीशी भक्कम आधार म्हणून उभी राहते. म्हणून तर कितीही मोठे झालो तरी प्रत्येकालाच आपली आई कायम हवी असते.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

09 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT