ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सरसावले स्टार्स, सडेतोडपणे मांडली मतं

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सरसावले स्टार्स, सडेतोडपणे मांडली मतं

पंजाब – हरयाणामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळतच चालले आहे. आपल्या हक्कासाठी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस आता बॉलीवूडमधील कलाकारांचाही पाठिंबा मिळू लागला आहे. दिलजित दुसांजने (Diljit Dosanjh) आवाज उठवल्यानंतर आणि कंगनाची (Kangana Ranuat) टिवटिव बंद केल्यानंतर आता अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यासंदर्भात बोलत आहेत. तर अनेक पंजाबी कलाकार स्वतःहून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा न करता आपल्या हक्कासाठी हे शेतकरी लढत आहेत आणि त्यासाठी केंद्र सरकारकडे आपले मागणे त्यांनी लावून धरले आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी याबाबत आपले मत मांडले आहे. 

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra Jonas) आपले मुद्दे नेहमीच बिनधास्त मांडत असते आणि यासंदर्भातही प्रियांकाने आपले मत सोशल मीडियावर मांडले आहे. प्रियांका सध्या लंडनमध्ये असून दिलजित दुसांजच्या एका ट्विटला रिट्विट करत प्रियांका म्हणाली, ‘आपले शेतकरी बांधव हे भारतातील फूड सोल्जर आहेत. त्यांची भीती दूर करणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याची गरज आहे. एका संपन्न डेमोक्रेसी स्वरूपात हे संकट लवकरात लवकर दूर होऊन यावर काही तोडगा निघेल अशी अपेक्षा’

कोरोनामुळे झाले अभिनेत्रीचे निधन, देवोलीनाची भावूक पोस्ट व्हायरल

रितेश देशमुख

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनेता असला तरीही त्याच्या घरात संपूर्ण राजकारणाचं वातावरण आहे. त्यामुळे राजकारणातील विषयांवर रितेश नेहमीच आपली मतं मांडत असतो. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला रितेशने समर्थन दिले असून ट्विट केले की, ‘तुम्ही आज अन्न खाताय तर त्यासाठी शेतकऱ्यांचे आभार मानले पाहिजेत. मी आपल्या देशातील प्रत्येक शेतकऱ्यासह एकजुटीने उभा आहे. #JaiKisaan’

ADVERTISEMENT

असं काय झालं की रेस्टॉरंटमध्ये अचानक प्लेट फोडू लागली अर्पिता खान

सोनम कपूर

सोनम कपूरही (Sonam Kapoor Ahuja) अनेक मुद्द्यांवर आपले मत स्पष्ट मांडते. यावेळी आपला नवरा आनंद आहुजा यासह सोनमने शेतकऱ्यांच्या या आंदोलानाला पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे काही फोटो शेअर करत प्रसिद्ध अमेरिकन वकील आणि थिंकर डॅनिअल वेबस्टरची ओळ लिहिली आहे, ‘जोपर्यंत शेती होत नाही तोपर्यंत इतर कामं होऊ शकत नाहीत. त्यामुळेच शेतकरी आपल्या सभ्यतेचे संस्थापक आहेत.’

मनोरंजनाची खुमासदार फोडणी म्हणजे ‘बायकोला हवं तरी काय?’

उर्मिला मातोंडकर

नुकताच काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणारी अभिनेत्री उर्मिलानेही (Urmila Matondkar) आपले मत मांडले आहे. ‘अन्नदाता सुखी भव’ असे ट्विट करत उर्मिलाने आपला पाठिंबा दर्शवला आहे. 

ADVERTISEMENT

स्वरा भास्करनेही केले ट्विट

अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) अनेक सामाजिक मुद्द्यांवर आपले मत रोखठोकपणे मांडत असते. शेतकरी आंदोलनासंदर्भातही तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत तिने फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एक सुरक्षारक्षक शेतकऱ्यावर लाठीचार्ज करताना दिसत आहे. या फोटोसह तिने लिहिले, ‘सर्वात दुःखाची गोष्ट ही आहे की, हा जवानही एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा असू शकतो’. स्वराचे हे ट्विट अत्यंत व्हायरल झाले होते. याचे अनेक रिट्विट तर झालेच पण अनेकांनी स्वराच्या या ट्विटवर प्रतिक्रियाही दिली आहे. 

दरम्यान पंजाबी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे सर्वच कलाकार या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. दिलजित दुसांजने शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून 1 कोटी रूपयांची देणगी तर दिलीच. पण त्याशिवाय तो स्वतः या आंदोलनात सहभागी झाला. मिका सिंह, जस्सी गिल, हिमांशी खुराणा, सारा गुरपाल, सरगुन मेहता ही काही प्रसिद्ध नावं आहेत ज्यांनी पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत सरकाने योग्य पाऊल उचलावं अशी अपेक्षा केली आहे. तर ज्या प्रसिद्ध व्यक्तींनी अजूनही यासंदर्भात काही ट्विट केले नाही त्यांना त्यांचे चाहते यासंदर्भात आपली मतं व्यक्त करावीत असे सांगत आहेत. यामध्ये हरभजन सिंह, कपिल शर्मा अशा प्रसिद्ध व्यक्तींची नावं आहेत ज्यांनी अजूनही काहीही आपली मतं मांडलेली नाहीत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT