ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
बॉलीवूड कलाकार जे सध्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले आहेत परदेशात

बॉलीवूड कलाकार जे सध्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले आहेत परदेशात

कोरोना व्हायरसमुळे सर्वां प्रमाणेच बॉलीवूड इंडस्ट्रीचे फार मोठे नुकसान झाले. कारण गेले काही महिने संपूर्ण देशच कोरोनामुळे लॉकडाऊन होता. ज्यामुळे सर्वच चित्रपटांचे शूटिंग, प्रमोशन, प्रदर्शन रद्द करण्यात आलं होतं. सहाजिकच या सर्वाचा फिल्म इंडस्ट्रीच्या उद्योगावर खूप मोठा परिणाम झाला. त्यामुळे अनलॉक सुरू होताच हळूहळू पुन्हा चित्रपटसृष्टी पुर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करू लागली. अनेक रखडलेल्या चित्रपटांचे शूटिंग लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू झाले. ज्यामुळे कोरोनाच्या काळातही काही बॉलीवूड कलाकारांना त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशी जावे लागले. सध्या अक्षय कुमार, अमिर खान सारखे अनेक कलाकार जोखिम पत्करत परदेशात त्यांच्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करत आहेत. जाणून घेऊ या कोणकोणते कलाकार सध्या यासाठी परदेशी रवाना झाले आहेत.

अक्षय कुमार –

काही दिवसांपुर्वीच मास्क लावलेला आणि एअरपोर्टवर असलेल्या अक्षय कुमारचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय कुमार सध्या त्याच्या बेल बॉटम या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशी गेला आहे. सध्या  तो या चित्रपटाचं शूटिंग त्याच्या टीमसह ग्लासगो येथे करत आहे. पंधरा ऑगस्टला त्याने त्याच्या टीमसोबत त्याचा एक फोटो तिथून शेअर केला होता. 

आमिर खान –

आमिर खानही त्याच्या  चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशी गेला आहे. त्याच्या लालसिंह चढ्ढा या चित्रपटाचं शूटिंग अर्ध्यावरच राहिलं होतं. ते पूर्ण करण्यासाठी आमिर तुर्कीला गेलेला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने तुर्कीच्या  राष्ट्रपती एमीन एर्दोगन यांची भेट घेतली होती. त्या दोध्यांच्या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर झाला होता. लाल सिंह चढ्ढामध्ये  आमिरसोबत करिना कपूर सुद्धा आहे. हा चित्रपट हॉलीवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा रिमेक असणार आहे. 

हुमा कुरेशी –

हुमा कुरेशीदेखील सध्या तिच्या शूटिंगसाठी परदेशी आहे. हुमा बेल बॉटम या चित्रपटात  अक्षय कुमारसोबत काम करत आहे. त्यामुळे तिही सध्या ग्लासगोमध्ये  या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलेली आहे. हुमाने काही दिवसांपूर्वीच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिला तिथे सकाळी पाच वाजता योगा सेशनसाठी जावं लागतं हे तिने शेअर केलं होतं. 

ADVERTISEMENT

लारा दत्ता –

लारा दत्ताही अक्षय कुमारसोबत बेल बॉटममध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. ज्यामुळे तिही अक्षय आणि हुमासोबत ग्लासगोला आहे. चित्रपटाचे शूटिंग लवकर पुर्ण करण्यासाठी तिने ही जोखिम घेतली आहे. तिच्यामते परदेशी जाताना आणि  तिथे राहताना त्यांना सुरक्षेबाबत सर्व नियम काटोकोरपणे पाळावे लागत आहेत. त्यामुळे याबाबत काळजी करण्यासारखं काहीच नाही. 

मौनी रॉय –

मौनी रॉय ही सध्या तिच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात आहे. मौनी सध्या लंडनमध्ये तिच्या  चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करत आहे. मौनीही लंडनवरून सतत तिचे अपडेट चाहत्यांना देत आहे. लॉकडाऊन आधीही मौनी दुबईमध्ये काही दिवस अडकली होती. मात्र ती नंतर पुन्हा भारतात आली आणि आता लॉकडाऊन संपल्यावर तिला लंडनला जावं लागलं आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

राकेश बापट घेणार ऑनलाईन क्लास स्वतःच बनवा ‘बाप्पाची मुर्ती’

श्रीगणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी पाहा ‘हे’ मराठी चित्रपट

गुंजन सक्सेना’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, वायूसेनेला बदनाम करण्याचा आरोप

18 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT