राष्ट्रपती भवनाच्या भव्य परिसरात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्यांमध्ये देशाविदेशातील मिळून तब्बल 8 हजारांपेक्षा जास्त अतिथी सहभागी होणार आहेत. या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक बॉलीवूड, खेळ जगत आणि व्यापार जगतातील प्रसिद्ध चेहऱ्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे.
आमंत्रित सेलेब्स दिल्लीला रवाना
शपथविधी सोहळ्याची वेळ जसंजशी जवळ येत आहे. तसं तसे सोशल मीडियावरही अपडेट्स यायला सुरूवात झाली आहे. बॉलीवूडची झांशीची राणी कंगना रणौतला ही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. पाहा कंगनाचे हे फोटोज
कंगना दिल्लीला पोचली असून काही वेळापूर्वीच तिने दिल्ली एअरपोर्टवर मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने पीएम मोदींना शुभेच्छा देत आपला आनंद व्यक्त केला. कंगनाने अनेकदा पब्लिक प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून खुलेपणाने मोदी सरकारचं समर्थन केलं आहे.
बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात करण जोहरसुद्धा या सोहळ्यासाठी दिल्ली रवाना झाला आहे. जर तुम्हाला लक्षात असेल तर करण जोहर आणि बॉलीवूडच्या अनेक सेलेब्स काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदी यांना भेटले होते. ज्याचे फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अंबानी कुटुंबिय आणि रतन टाटाही या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत पोचले आहेत.
तसंच अभिनेता शाहिद कपूर आणि आलिया भट्टही दिल्लीला दाखल झाले आहेत.
या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बॉलीवूडचा संतूर हिरो अनिल कपूरला आमंत्रित करण्यात आलं आहे. निवडणुका होण्याआधी अनिल कपूरने दिल्ली जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली होती. तसंच हे फोटोज सोशल मीडियावरही शेअर केले होते.
बॉलीवूडची ड्रीमगर्ल हेमामालिनी मथुरा येथून लागोपाठ दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत जिंकली आहे. त्याही या शपथविधी सोहळ्यात सामील होत आहेत.
अनुपम खेर हे बऱ्याच काळापासून बीजेपी आणि मोदी समर्थक आहेत. त्यांची पत्नी आणि अभिनेत्री किरण खेर यांनी चंदीगढमधून लोकसभा निवडणूक जिंकून दिल्ली गाठली आहे. अनुपम खेर यांनी चंदीगढ जाऊन त्यांचा प्रचारही केला होता. अनुपम खेरही पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होतील.
दिग्दर्शक मधुर भांडारकरलाही सोहळ्यात सामील होण्यासाठी आमंत्रण आलं आहे. तसंच देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या रहस्यमयरित्या झालेल्या मृत्यूवर आधारित द ताश्कंद फाईल्स या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री आणि त्यांची बायको पल्लवी जोशीसोबत शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
हे स्टार्सही होणार सहभागी
या लिस्टमध्ये प्रसिद्ध संगीतकार जोडी सलीम-सुलेमान, अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक, प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष सिद्धार्थ रॉय कपूर, कमल हसन, रजनीकांत, दिग्दर्शक संजय लीला भन्साली, बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि बंगाली अभिनेत्री आणि पश्चिम बंगालची खासदार नुसरत जहा, इंडियन फिल्म आणि टीव्ही डायरेक्टर्स असोसिएशनचे सल्लागार अशोक पंडीत यांचीही नाव सामील आहेत.
तसंच या शपथविधी सोहळ्याला बॉलीवूडचा किंग खान शाहरूखही सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा –
विवेक ओबेरॉयला मिळाली सर्वात मोठी भूमिका, साकारणार पंतप्रधान नरेंद्र मोदी