बॉलीवूडची मिस हवाहवाई…चांदनी श्रीदेवीच्या आठवणी आजही तिच्या चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. तिचे कुटुंबियही तिला आजही मिस करत आहेत हे पुन्हा एकदा दिसलं. दिल्लीत नुकतंच श्रीदेवीवरील पुस्तकाच्या अनावरण सोहळ्यात निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूरला अश्रू अनावर झाले. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने या पुस्तकाचं अनावरण केलं. यावेळी दीपिकानेही श्रीदेवीसोबतच्या बाँडबाबत मोकळेपणाने सांगितलं. या कार्यक्रमाला इंग्लिश-विग्लीश चित्रपटाची दिग्दर्शिका गौरी शिंदेही उपस्थित होती.
दीपिका आणि श्रीदेवीचं आगळंवेगळं नातं
दीपिकाने 2017 सालच्या दिवसांची आठवण काढत एक स्पीच दिली. ज्यामध्ये तिने सांगितलं की, बोनी कपूर आणि श्रीदेवी त्यांच्या कामात कसे परफेक्ट होते. दोघंही दीपिकाच्या प्रत्येक चित्रपटातील अभिनयाबाबत कौतुक करत पर्सनल मेसेज करत असत.
दीपिकाने हेही सांगितलं की, श्रीदेवी आणि तिच्या संबंधाबाबत बऱ्याच जण्यांना माहीती नव्हतं. पण श्रीदेवीही अशी अभिनेत्री होती जी दीपिकाची व्यक्तिगतरित्या आवडती अभिनेत्री होती. त्यामुळे जेव्हा बोनी कपूरने दीपिकाला या बुक लाँचला येण्याबाबत विचारलं असता तिने लगेच होकार दिला. कारण ती फक्त एक चांगली अभिनेत्रीच नाहीतर त्या दोघींचं बाँडींगही खूप चांगलं होतं.
दीपिका म्हणाली की, श्रीदेवी नेहमी पर्सनली आणि प्रोफेशनली सपोर्ट करत असे. तसंच दीपिकाच्या कामाचं कौतुक बोनी कपूर आणि श्रीदेवी दोघंही करत असत.
बोनी कपूरच्या डोळ्यात आलं पाणी
या बुक लाँचवेळी दीपिका श्रीदेवीबाबत बोलत असताना बोनी कपूरला अश्रू अनावर झाले. तेव्हा दीपिकाने त्यांना शातं केलं.
अभिनेत्री श्रीदेवीचे टॉप 10 चित्रपट, ज्यामुळे ती झाली सुपरस्टार
श्रीदेवीच्या बायोग्राफीचं वैशिष्ट्य
या पुस्तकाचं नाव ‘श्रीदेवी- द इटर्नल स्क्रीन गॉडेस’ असं आहे. ज्याचे लेखक आहेत सत्यार्थ नायक. या पुस्तकात त्यांनी श्रीदेवीच्या अभिनयाच्या पाच दशकांच्या मोठ्या प्रवासाबाबत लिहीलं आहे. ज्या दिग्दर्शकांनी आणि अभिनेत्यांनी श्रीदेवीसोब काम केलं त्यांचे अनुभवही या पुस्तकात आहेत. 1969 मध्ये बाल कलाकाराच्या रूपात श्रीदेवीने केलेला पहिला सिनेमा ‘थुनाईवन’ पासून शेवटचा सिनेमा 2017 साली आलेला ‘मॉम’ पर्यंतचे अनेक माहित नसलेले किस्से या पुस्तकात आहेत.
जेव्हा माधुरीने सांगितल्या श्रीदेवीसोबतच्या आठवणी
2018 मध्ये झालं होतं श्रीदेवीचं निधन
श्रीदेवीचं निधन हे 54 व्या वर्षी 24 फेब्रुवारी 2018 झालं. ती दुबईत आपल्या भाच्याच्या मोहीत मारवाह लग्नासाठी गेली होती. तिथे हॉटेलमधील रूमच्या बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा दुर्देवी मृत्यू झाला. ज्या परिस्थितीत तिचा मृत्यू झाला, त्यामुळे ही बातमी कळणाऱ्या प्रत्येकालाच धक्का बसला.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा – श्रीदेवीच्या ‘चालबाज’प्रमाणे जान्हवी कपूर ‘या’ चित्रपटात साकारणार डबलरोल