home / रेसिपी
paneer afghani recipe

पनीर टिक्का खाण्याचा कंटाळा आलाय, ट्राय करा पनीर अफगाणी

पनीर हा असा खाद्यपदार्थ आहे, की कोणत्याही स्वरूपात खाल्ला तरी तो स्वादिष्टच वाटतो. पार्टी असो किंवा गेट-टूगेदर आणि त्यात पनीरचा पदार्थ नाही, असे होऊ शकत नाही. शाकाहारींसाठी तर पनीर आणि सोया हेच ऑप्शन्स असतात. आणि प्रोटीनचा स्रोत म्हणून शाकाहारींना पनीर हा उत्तम पर्याय आहे. सामान्यतः पनीरचा वापर अनेकदा ग्रेव्ही असलेल्या भाज्या बनवण्यासाठी केला जातो. पनीरपासून चटपटीत पदार्थ बनवता येतात. स्टार्टर म्हणून पनीर टिक्का हा पदार्थ सगळ्या जगात लोकप्रिय आहे. पण जर तुम्हाला पनीर टिक्का खाऊन खाऊन कंटाळा आला असेल त्या ऐवजी एखादा वेगळा आणि स्वादिष्ट पदार्थ ट्राय करून बघायचा असेल तर पनीर अफगाणी खाऊन पहा. ही एक अतिशय स्वादिष्ट पनीर रेसिपी आहे. जसे पनीर टिक्का आपण घरी बनवू शकतो तसेच तुम्ही पनीर अफगाणी सुद्धा सहज बनवू शकता. पनीर अफगाणीची चव थोडी माईल्ड असते आणि त्यात फ्रेश क्रीम आणि बटर वापरले जाते, ज्यामुळे त्याची चव अनेक पटींनी वाढते. ज्यांना पनीर टिक्का तिखट आणि मसालेदार वाटत असेल त्यांनी तर पनीर अफगाणी नक्कीच ट्राय करावे कारण हा पदार्थ खूप सौम्य आहे. तसेच त्यात खरबूजाच्या बिया, काजू इत्यादींचे विशेष मिश्रण वापरल्याने अफगाणी पनीर हे इतर सर्व पदार्थांपेक्षा वेगळे ठरते. तर चला बघूया घरच्या घरी पनीर अफगाणी बनवण्याची सोपी पद्धत कोणती आहे. 

प्रथिनांचा उत्तम स्रोत पनीर 

Paneer Afghani Recipe
Paneer Afghani Recipe

प्रथिनांसाठी पनीर हा एक चांगला पर्याय आहे, विशेषतः शाकाहारी लोकांसाठी! कारण प्रथिनांची बायोलॉजिकल व्हॅल्यू ही 80-86% असल्याने, त्यात सर्व नऊ अत्यावश्यक अमीनो ऍसिड असतात. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, प्रथिने हे आपल्या पेशींचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत; ते शारीरिक वाढीसाठी, ऊतकांची दुरुस्ती करण्यासाठी, आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी, आपल्या रक्ताचे प्रमाण राखण्यासाठी देखील आवश्यक आहेत आणि जवळजवळ प्रत्येक संप्रेरक आणि एन्झाइमचा आवश्यक भाग आहेत. भारतीय आहारांमध्ये प्रथिनांची कमतरता असते आणि मुख्यतः धान्य-आधारित आहार असतो. म्हणूनच शाकाहारी लोकांनी आहारात प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी आवर्जून पनीर खाल्ले पाहिजे. पनीर हे चवीला सौम्य असल्याने, ते वापरून एखाद्या व्यक्तीच्या आवडीनुसार विविध पदार्थांमध्ये वापरले जाऊ शकते. 

अफगाणी पनीर रेसिपी 

Paneer Afghani Recipe
Paneer Afghani Recipe

साहित्य – पनीर – 1 वाटी,लोणी – 1 टेबलस्पून, मलई / क्रीम – 1/2 कप, मिरचीचा ठेचा / लाल तिखट – 1 टेबलस्पून, मीठ – 1 टेबलस्पून , गरम मसाला – दीड टेबलस्पून, दूध – 2 टेस्पून, तेल – 1 चमचे,  खरबूज बिया – 1 चमचे,  खसखस ​​- 1 चमचे, काजू – 5-6

कृती – सर्वप्रथम मिक्सिंग जार घ्या आणि त्यात खसखस, खरबूजाच्या बिया, काजू घालून बारीक वाटून घ्या. आता एक वाडगा घ्या आणि त्यात ताजे क्रीम /मलाई/ साय, दूध, लोणी, गरम मसाला, मिरची, व मसाले घालून सर्वकाही चांगले एकत्र करून घ्या. नंतर त्यात मीठ घालून सर्व गोष्टी नीट मिक्स करा. या मिश्रणात पनीरचे चौकोनी तुकडे घाला आणि मसाल्यांमध्ये चांगले मिसळा.  पनीरचे चौकोनी तुकडे अर्धा तास मॅरीनेट होऊ द्या.  एक पॅन घ्या आणि त्यात तेल घाला. स्कीवर घ्या आणि त्यात पनीरचे चौकोनी तुकडे घाला. पनीरचे चौकोनी तुकडे तेलात व्यवस्थित शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून प्लेटमध्ये काढा आणि ते सॅलड आणि चटणीबरोबर सर्व्ह करा. फक्त एक लक्षात ठेवा की पनीरचे तुकडे खूप नाजूक असल्याने तळताना ते जास्त शिजवू नका आणि दोन्ही बाजूंनी तळताना कमी दाब द्या. पनीरने  मसाल्यांची सगळी चव शोषून घ्यावी यासाठी क्यूब्स पुरेसे मॅरीनेट करा. 

पोषण माहिती – कॅलरीज – 213 कॅलरीज, फॅट्स – 19.3 ग्रॅम,  प्रथिने – 5.8 ग्रॅम, कार्बोहायड्रेट – 3.9 ग्रॅम

Photo Credit – pinterest, istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

22 Jun 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text