ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
brahmastra trailer out

चाहत्यांची प्रतीक्षा संपली, ब्रह्मास्त्रचे ट्रेलर अखेर झाले रिलीज

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने आणि रणबीर कपूरच्या दृश्यांनी सुरू झालेला ट्रेलर, महाबली आणि सर्वशक्तिमान शस्त्राच्या शोधाची कथा सांगतो. प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला हा चित्रपट शस्त्रांची देवता ‘ब्रह्मास्त्र’च्या शक्तींना साकारण्याचा प्रयत्न करतो. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर व्यतिरिक्त, या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मेगास्टार अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय यांची झलक पाहायला मिळते. ट्रेलर पाहून असा अंदाज बांधला जातोय की, ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील प्रेमापासून ते ब्रह्मास्त्रासाठीच्या युद्धापर्यंतची कथा दाखवण्यात येणार आहे.

ट्रेलरमध्ये काय दाखवले आहे  

ट्रेलरमध्ये अनेक शस्त्रांपासून बनवलेल्या वस्तूला ‘ब्रह्मास्त्र’ म्हटले गेले आहे आणि रणबीर कपूरचा या ब्रह्मास्त्राशी थेट संबंध दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात शिवाची भूमिका साकारणाऱ्या रणबीर कपूरला सुरुवातीला त्याच्यातील शक्ती लक्षात येत नाही. तो अग्नीजवळ जातो पण अग्नी त्याला जाळत नाही. त्‍यामुळे रणबीर कपूरला आपले अग्नीशी  जुने नाते आहे असे वाटते. शिवा ईशाच्या प्रेमात पडतो.पण अंधाराची राणी ‘ब्रह्मास्त्र’च्या शोधात रणबीर कपूर उर्फ ​​शिवापर्यंत पोहोचते. शिवाव्यतिरिक्त, इतर पात्रे ब्रह्मास्त्राचे अंधाराच्या राणीपासून संरक्षण करतात. पण ब्रह्मास्त्र चुकीच्या हातात पडू नये म्हणून रणबीर कपूरकडे अग्निशस्त्र असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत गुरूची भूमिका साकारणारे अमिताभ बच्चन रणबीरला काही गोष्टी सांगतात. आता शिव अंधाराच्या राणीला पराभूत करण्यास सक्षम आहे का हे चित्रपट बघूनच कळू शकेल. या ट्रेलरवर चाहत्यांच्या रंजक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे, आता ते रिलीजच्या तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

प्रेक्षकांची प्रतिक्रिया –  ‘सर्वोत्तम ट्रेलर’

हे ट्रेलर बघून एका यूजरने कमेंट करत लिहिले की, “मी माझ्या आयुष्यात पाहिलेला हा सर्वोत्तम ट्रेलर आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी रणबीरने आपले रक्त आणि घाम गाळला आहे. अयान मुखर्जीच्या अनेक वर्षांच्या मेहनतीला यंदा नक्कीच फळ मिळेल. मी चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे.”  ट्रेलर लॉन्च होण्यापूर्वी रणबीर म्हणाला होता की, “मला माहित नाही की मला ‘ब्रह्मास्त्र’ सारख्या चित्रपटाचा भाग बनण्याची संधी पुन्हा मिळेल की नाही. हा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही आमचे रक्त, घाम, वेळ, हृदय, आत्मा, यकृत, किडनी, सर्वकाही दिले आहे आणि मला खरोखर आशा आहे की तुम्हांला हा चित्रपट आवडेल आणि शेवटपर्यंत तुमचे लक्ष वेधून ठेवेल.”

रणबीरच्या अभिनयाचे कौतुक होतेय 

रणबीर कपूरच्या एका चाहत्याने या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली की, “हा ट्रेलर इतका दमदार आहे की तो पुन्हा पुन्हा पाहण्यापासून मी स्वतःला रोखू शकत नाही. रणबीर नेहमीप्रमाणेच शानदार दिसत आहे. जेव्हा त्याला त्याच्या शक्तीची जाणीव होते, तेव्हा त्याच्या भावना खूप छान वाटतात.” तर आणखी एका युजरने लिहिले की, “प्राचीन भारतातील शस्त्रास्त्रांचे जग अनुभवण्यासाठी तयार व्हा.”

ADVERTISEMENT

अयान मुखर्जीचे होतेय कौतुक 

रणबीर, आलिया, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या अभिनयासोबतच लोक अयान मुखर्जीचेही कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा वाढवली आहे.’

हा चित्रपट येत्या 9 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

15 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT