ADVERTISEMENT
home / Care
स्तनांवरील केसांचा होत असेल त्रास तर करा हे सोपे उपाय

स्तनांवरील केसांचा होत असेल त्रास तर करा हे सोपे उपाय

प्रत्येक महिलेच्या शरीरावर केस असतात. फक्त त्याचे प्रमाण कमी जास्त असते. हातापायावर असलेल्या केसांसाठी आपण वॅक्स करतो. पण ज्या महिलांच्या स्तनांवरही केस आहेत अशा महिलांना त्या केसांचा नक्कीच त्रास होत असतो. मग अशावेळी काय करायचं? कारण स्तन हा शरीरातील अत्यंत नाजूक भाग आहे. स्तनांवर केस आहेत अशा तुम्ही एकट्याच नाही. त्यामुळे तुम्हाला वाईट वाटून घेण्याचं अथवा त्यामध्ये  लाज बाळगण्याची काहीही गरज नाही. छातीवर अथवा स्तनावर केस असणं हे अत्यंत नैसर्गिक आणि सामान्य आहे. शरीरातील हार्मोन्स बदलामुळे कमी जास्त प्रमाणात प्रत्येकालाच हा त्रास सहन करावा लागतो. पण तुम्हाला याचा जास्त त्रास होत असेल तर आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला असे काही सोपे उपाय सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही स्तनांवरील केस काढून  टाकू शकाल आणि तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्हाला कात्री अथवा रेझर अथवा लेझर पद्धतीनेही हे केस काढता येतात. पण त्याहीपेक्षा तुम्हाला जर नैसर्गिकरित्या हे केस काढून टाकायचे असतील तर त्याचे उपाय आम्ही तुम्हाला देत आहोत. कात्री अथवा अन्य गोष्टींची जोखीम उचलण्यापेक्षा तुम्ही नैसर्गिक उपायांचा आधार घेणं जास्त सोयीस्कर आहे. यासाठी आपल्या स्वयंपाकघरातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा उपयोग आपल्याला करून घेता येऊ शकतो. जाणून घेऊया तर काय आहे यासाठी सोपे उपाय. 

हळद आणि बेसन (Turmeric and Gram Flour)

हळद आणि बेसन (Turmeric and Gram Flour)

Shutterstock

त्वचेवर कोणतेही उपचार करायचे असतील तर हळद ही अतिशय विश्वासार्हपूर्ण गोष्ट आहे. अँटिसेप्टिक आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुण असणारी हळद ही अनेक समस्यांवरील एक उपाय आहे. हळदीचा उपयोग केसांची वाढ रोखण्यासाठी होतो याची तुम्हाला कल्पना आहे का? नैसर्गिकरित्या तुम्हाला स्तनांवरील केस काढायचे असतील आणि कोणताही त्रास व्हायला नको असेल तर तुम्ही हळद आणि बेसनाचा वापर करू शकता. तुम्हाला हे काढून टाकताना पाण्याचा वापर करण्याआधी MyGlamm चे सॅनिटायझिंग वाईपआऊट्सही वापरता येऊ शकतात. 

ADVERTISEMENT
  • हळद आणि बेसन दोन्ही समप्रमाणात घ्या
  • त्यामध्ये तिळाचे तेल घालून जाडसर पेस्ट तयार करा 
  • ही पेस्ट तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये स्तनांना केस असणाऱ्या ठिकाणी लावा 
  • काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवा 
  • आठवड्यातून  एकदा हा प्रयोग करा आणि तुम्हाला महिनाभरात याचा परिणाम दिसून येईल

चॉकलेट, रिका अथवा रेग्युलर, कोणतं Wax आहे तुमच्यासाठी अप्रतिम, जाणून घ्या

लिंबू आणि साखर (Lemon and Suger)

लिंबू आणि साखर (Lemon and Suger)

Shutterstock

कोणतेही वॅक्स वापरण्यापेक्षा तुम्ही साखर आणि लिंबाचे मिक्स्चर वापरून पाहा. साखर आणि लिंबू हे तुमच्या त्वचेला हानी पोहचवत नाही आणि स्तनांवरील केस पटकन निघण्यासाठी हा एक उत्तम स्क्रब म्हणून तुम्ही वापरू शकता. यामध्ये तुम्ही मधदेखील मिसळू शकता. 

ADVERTISEMENT
  • एक चमचा साखर, 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध एकत्र मिक्स करून घ्या
  • साखर वितळू द्या आणि त्यानंतर एका मेटलच्या भांड्यात हे मिश्रण गरम करून उकळून घ्या
  • थंड झाल्यावर तुम्ही स्तनांना हे मिश्रण लावा आणि वॅक्सप्रमाणे तुम्ही हे केसांच्या वाढीच्या दिशेने वॅक्सिंग स्ट्रिप अथवा कपड्याने काढा
  • महिन्यातून एकदा अथवा दोन वेळा तुम्ही हा प्रयोग करून पाहा आणि तुमच्या स्तनांवरील केसांची वाढ तुम्हाला कमी झालेली दिसून येईल. 

चेहऱ्यावर वॅक्सिंग करताना लक्षात ठेवा या गोष्टी, अन्यथा चेहरा होईल खराब

कच्ची पपई (Raw Papaya)

कच्ची पपई (Raw Papaya)

Shutterstock

पपईमध्ये विटामिन्स आणि मिनरल्स हे भरपूर प्रमाणात आढळते. आपल्या त्वचेसाठी कच्ची पपई हे एक वरदानच आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या त्वचेवरील सर्वात नाजूक भागावर याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे हे तुम्ही बिनधास्तपणे वापरू शकता. 

ADVERTISEMENT
  • कच्च्या पपईचा गुदा आणि हळध पावडर मिक्स करा आणि त्याची पेस्ट बनवा 
  • ही पेस्ट तुम्ही स्तनांना केस असणाऱ्या ठिकाणी लावा 
  • 20 मिनिट्सपर्यंत तुम्ही हलक्या हाताने मसाज करा आणि मग धुवा 
  • योग्य परिणामासाठी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग करावा

कोल्ड वॅक्स स्ट्रिप्स वापरुन झटपट आणि सुरक्षित पद्धतीने काढा अनावश्यक केस

कॉर्नस्टार्च आणि अंडी (Cornstarch and Eggs)

कॉर्नस्टार्च आणि अंडी (Cornstarch and Eggs)

Shutterstock

अंडी आणि कॉर्नस्टार्चचादेखील तुम्हाला यासाठी उपयोग करून घेता येऊ शकतो. यामुळे स्तनांवरील केस पटकन निघण्यास मदत मिळते. हा घरगुती उपचार अत्यंत सोपा आणि पटकन होणारा आहे. 

ADVERTISEMENT
  • एक अंड घ्या आणि ½ चमचा कॉर्नस्टार्च आणि एक चमचा साखर घ्या
  • हे सर्व मिश्रण एकत्र करून जाडी पेस्ट बनवा आणि ही पेस्ट तुम्ही स्तनांवर असणाऱ्या केसांना लावा 
  • साधारण 25 मिनिट्स ही पेस्ट तशीच ठेवा सुकू द्या आणि त्यानंतर हे तुम्ही पीलिंग करा
  • तुम्हाला याचा उत्तम परिणाम दिसून येईल आणि स्तनांवरील केस नाहीसे झालेले दिसतील. 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.

आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

 

09 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT