लग्न म्हटलं की सर्वात सुंदर दिसण्यासाठी एक महिना आधीपासून पार्लरची अपॉईंटमेंट घेतली जाते. कारण लग्नात नवरीला सर्वाधिक सुंदर दिसायचं असतं. यासाठी स्किन ट्रीटमेंट, फेशियल अशा एक ना अनेक गोष्टींचा आधार घेतला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही हा खर्च वाचवून केमिकलयुक्त रसायनांचा चेहऱ्यावर वापर न करता घरगुती पद्धतीने अधिक सुंदर दिसू शकता. नवरीच्या चेहऱ्यावर अधिक उजळपणा येण्यासाठी घरगुती ब्रायडल उटण्याचा वापर केल्यास अधिक फायदा मिळतो. या ब्रायडल उटण्याचे केवळ चमकच येणार नाही तर चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि आलेली मुरूमंही निघून जाण्यास मदत करते. हे विशिष्ट उटणे कसे बनवायचे आणि याचा कसा वापर करायचा हे आपण या लेखातून जाणून घेऊया.
उटणे बनविण्याचे साहित्य आणि पद्धत
साहित्य
- 1 चमचा ओट्स
- 1 चमचा मसूर डाळ
- 1 चमचा तांदूळ
- चिमूटभर हळद
- गुलाबपाणी
- 1 चमचा दही
- 1 चमचा कच्चे दूध
बनविण्याची पद्धत
- एका बाऊलमध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या
- त्यानंतर त्यामध्ये दही, गुलाब पाणी आणि कच्चे दूध घाला
- याची स्मूथ पेस्ट बनवा
- त्वचा कोरडी असेल तर यामध्ये तुम्ही मलईही मिक्स करू शकता
- चेहरा स्वच्छ धुऊन घ्या
- हे तयार झालेले उटणे तुम्ही चेहऱ्याला लावा
- 15-30 मिनिट्स तसंच राहू द्या आणि मग चेहरा धुवा
आठवड्यातून किती वेळा लावावे
उटणे चांगले आहे म्हणून रोज त्वचेवर लावणे योग्य नाही. चमकदार त्वचा नवरीला मिळवायची असेल तर आठवड्यातून दोन वेळा हे उटणे तुम्ही चेहऱ्यावर लावावे. तुम्हाला जर इतका वेळ मिळत नसेल तर आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी तुम्ही या उटण्याचा वापर करू शकता.
उटण्याचे फायदे
अँटीएजिंग – उटण्यामध्ये नैसर्गिक अँटीएजिंग असते. उटणे लावल्याने वाढत्या वयाची लक्षणे अर्थात फाईन लाईन, सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. तसंच उटणे लावल्यामुळे त्वचेचे कोलेजन वाढते आणि त्वचा अधिक कसदार बनते.
मुरूमांपासून सुटका – जिद्दी मुरूम (पिंपल्स) आणि डागांपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही या उटण्याचा वापर करू शकता. तुमचे लग्न ठरल्यावर तुम्ही त्वरीत या उटण्याचा वापर सुरू करावा. या उटण्यामध्ये हळदीचा वापर करण्यात येतो आणि हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असून मुरूमांचे डाग कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.
चमकदार त्वचा – उटण्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुण असून त्वचेमधील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच चमकदार त्वचेसाठी आठवड्यातून दोन वेळा उटण्याचा वापर करावा.
नवरीची त्वचा नेहमीच चमकदार आणि ताजी दिसायला हवी असे म्हटले जाते. मग त्यासाठी तुम्ही पार्लरच्या फेऱ्या मारण्यापेक्षा या नैसर्गिक उटण्याचा वापर केल्यास, तुम्हाला याचा अधिक फायदा मिळतो. तुम्हाला त्रासही होत नाही. उटण्याचे अनेक फायदे आहेत, तसंच यामध्ये नैसर्गिक घटक असल्यामुळे त्वचेला त्रासदायक ठरत नाही. त्यामुळे लग्नाला जर सहा महिने असतील तर तुम्ही याचा वापर वेळीच सुरू करा आणि अधिक चमकदार त्वचा मिळवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक