home / स्टोरीज
Buddha Purnima Information In Marathi

जाणून घ्या बुद्ध पौर्णिमेची इत्यंभूत माहिती (Buddha Purnima Information In Marathi)

 

बौद्ध धर्मियांसाठी अत्यंत महत्वाचा असा सण म्हणजे ‘बुद्ध पौर्णिमा’ भगवान गौतम बुद्धांचा जन्म दिवस म्हणून हा दिन मोठ्या उत्साहात बौद्धधर्मीय साजरा करतात. जगभरात गौतम बुद्धांचे अनुयायी असून हा दिवस फार मोठ्या उत्साहात साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा एकमेंकाना दिल्या जातात. भारतात ही जयंती साजरी करण्याची सुरुवात ही भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. त्यांनी पहिल्यांदा दिल्ली येथे गौतम बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले आणि त्या दिवसापासून आजतायागत ही बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा पडली आहे. यंदा ही बुद्ध पौर्णिमा 26 मे 2021 रोजी आली आहे. जगातील दु:खाचे निवारण करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी अनेक मार्ग सांगितले. पण त्यांना नेमकी ज्ञान प्राप्ती कशी झाली आणि त्यांनी समाज हितासाठी नेमकी कोणती शिकवण दिली हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घेऊया बुद्ध पौर्णिमा माहिती (Buddha Purnima Information In Marathi)

बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय ? (What Is Buddha Purnima In Marathi)

बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय?

Instagram

आता सगळ्यात आधी प्रश्न पडतो ते म्हणजे बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय?  बुद्ध जयंती किंवा याल बुद्ध पौर्णिमा असे म्हणतात. भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.  भगवान बौद्ध विष्णू धर्माचे संस्थापक होते आणि त्यांना विष्णूचा नववा अवतार मानले जाते. भगवान गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला. नेपाळच्या लुम्बिनी  वनामध्ये वैशाख पौर्णिमेला झाला. नेपाळ- भारताच्या सीमेवर असलेल्या  रुमीनोदेई  नावाचे गाव लुम्बिनी असे होते. गौतम बुद्धांचे गाव म्हणून हे गाव फारच प्रसिद्ध आहे. गौतम बुद्ध हे राजघराण्यातील होते. बुद्धांची आई म्हणजेच कपिलवस्तूची महाराणी मायादेवी या माहेरी म्हणजेच देवदह या ठिकाणी निघाल्या होत्या  तेव्हा लुम्बिनी वनामध्ये एका शाल वृक्षाखाली त्यांनी बुद्धांना जन्म दिला. राजघराण्यात जन्म झालेल्या सिद्धार्थांना दु:खाच अनुभव नव्हता. त्यांचे बालपण आणि संसार हे अतिशय सुरळीत सुरु होते. पण एकदा फेरफटका मारताना त्यांना जगातील वेगवेगळ्या दु:खांचा अनुभव आला. त्यांनी संसाराचा त्याग केला आणि  ते भटकत तपस्वी झाले. जगातील दु:ख निवारण्यासाठी त्यांचे मूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली आणि  त्यांना ते मूळ सापडले त्यांनी सत्य शोधून काढले. ज्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली तो दिवस हा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

वाचा – यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स

बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते / आख्यायिका (Why Buddha Purnima Is Celebrated)

भगवान गौतम बुद्ध

Instagram

 

जगातील दु:ख नाहीसे करणे हे भगवान गौतम बुद्धांचे मुख्य उद्दिष्ट्य होते.  त्यासाठी त्यांनी निरनिराळे मार्ग स्विकारले. त्यांनी घराचा त्याग करुन ध्यान आणि तपश्चर्येचा मार्ग स्विकारला. पण त्यांना वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ज्ञान प्राप्ती झाले.  त्यांना ध्यानधारणा केल्यानंतर सुखाचा मार्ग सापडला. म्हणून हा दिवस ‘बुद्ध पौर्णिमा’ नावाने साजरा केला जातो. गौतम बुद्धांनी सत्याचा मार्ग शोधताना आणि दु:ख 

मिळालेल्या माहितीनुसार, गौतम बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर सत्याच्या शोधासाठी सात वर्षांचे कठोर असे तप केले. बोधगया येथील बोधिवृक्षाखाली ते तपश्चर्या करण्यासाठी बसले. या ठिकाणी बसूनच त्यांना ज्ञानप्राप्ती देखील झाली होती. पण तुम्हाला माहीत आहे का? आणखी काही कारणांसाठी बुद्ध जयंतीही साजरी केली जाते. याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला, याच दिवशी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि याच दिवशी त्यांचे महानिर्वाण झाले. म्हणून या दिवसाला फारच पवित्र असा दिवस मानला जातो. सत्याचा शोध लागल्यानंतर त्यांनी लोकांना आपल्या शिकवणीतून आयुष्याचा एक नवा मार्ग दाखवला.

वाचा – Nag Panchami Information In Marathi

बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली जाते ? (Different Ways Of Celebrating Buddha Purnima)

बुद्ध पौर्णिमा

Instagram

 

जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. गौतम बुद्धांचे अनुयायी हे संपूर्ण जगात पसरलेले आहे. भारत वगळता बौद्ध धर्मांचे अनुयायी जगभरात पसरलेले आहेत. चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया,नेपाळ अशा तब्बल 180 देशांमध्ये गौतम बुद्धांचे अनुयायी आहेत.  त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बुद्ध पौर्णिमा साजरा करण्याची पद्धत ही थोड्याफार फरकाने सारखीच आहे.  भारतात गौतम बुद्धांच्या अस्थी या दिवशी दर्शनासाठी बाहेर काढल्या जातात. त्यांच्या दर्शनसाठी अलोट अशी गर्दी लोटलेली असते.  त्या अस्थीचे दर्शन घेऊन लोकं त्या ठिकाणी प्रार्थना करतात.  गौतम बुद्धांशी निगडीत अशा क्षेत्रांना भेट दिली जाते. लुम्बिनी, सारनाथ,गया, कुशीनगर, दीक्षाभूमी अशा पवित्र स्थळांनाही या दिवशी भेट दिली जाते. 

  • बौद्ध धर्माशी महत्वपूर्ण सुत्रे, त्रिपिटिके यांचे वाचन केले जाते. याच दिवशी उपवास करण्याची देखील पद्धत आहे. 
  • बौद्ध घरांमध्ये दिवे प्रजल्वित केले जातात. घर फुलांना सजवले जाते.
  •  या दिवशी बोधिवृक्षाची पूजा केली जाते.
  • पक्ष्यांना पिंजऱ्यातून काढून त्यांना मोकळे केले जाते. 
  • या दिवशी मासांहार हा वर्ज्य असतो.
  • गरिबांना भोजन आणि वस्तूंचे दान केले जाते. 
  • बुद्ध मंदिरामध्ये जाऊन अगरबत्या लावल्या जातात आणि मूर्तीवर फळ आणि फुलं चढवली जातात.

वाचा – यशस्वी जीवनासाठी प्रयत्नपूर्वक करा सकारात्मक विचार

गौतम बुद्धांची शिकवण (Lessons From Gautam Buddha In Marathi)

जाणून घ्या गौतम बुद्धांची शिकवण

Instagram

 

गौतम बुद्धांची शिकवण ही समाजासाठी फारच हितकारक अशी आहे. गौतम बुद्धांची शिकवण आता जाणून घेऊया. वाईट विचारांनी वाईट विचार संपत नाहीत. वाईटाला फक्त प्रेम संपवू शकते. हे शाश्वत सत्य आहे. 

  1. भूतकाळात रमू नका, भविष्याच्या स्वप्ननात हरवू नका,  वर्तमानावर लक्ष द्या, सुखी रहाण्याचा तो एकमेव मार्ग आहे.
  2. एक जळणारा दिवा दुसऱ्या दिव्यांना प्रकाश देतो, तरी सुद्धा त्याचा प्रकाश कमी होत नाही, त्याचप्रमाणे सुख वाटण्याने कमी होत नाही, तर अजून जास्त सुख वाट्याला येते. 
  3. तुम्हाला शिक्षा तुमच्या रागामुळे होत नाही, तर तुम्हाला तुमच्या रागातूनच शिक्षा मिळते. म्हणजे राग, संताप करुन आपण स्वत:च्याच दु:खात भर घालून घेतो. 
  4.  बाहेरील जगात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वत:वर विजय प्राप्त करा,  स्वत:वर विजय मिळवलेल्या माणसाला कुणीच हरवू शकत नाही, हा विजय तुमच्यापासून कुणीच हिरावून घेऊ शकता नाही, ना देवदूत ना राक्षस!
  5. तीन गोष्टी कधीच लपून राहात नाहीत
    सूर्य, चंद्र आणि सत्य
  6. सुखाचा कुठलाच मार्ग नाही, सुखी राहणे हाच मार्ग आहे.
  7.  जो  माणूस स्वत:वर खऱ्या अर्थाने प्रेम करतो, तो दुसऱ्याला कधीच दु:ख देऊ शकत नाही. 
  8. आपण जसा विचार करतो. आपण तसेच बनत जातो. ज्या गोष्टीची आपण कल्पना करतो तीच गोष्ट आपण निर्माण करत राहतो. 
  9. सत्याच्या मार्गावर चालणारा व्यक्ती फक्त दोनच चुका करतो.
  10. एक म्हणजे पूर्ण रस्ता निश्चित न करणे
    दुसरी म्हणजे सुरुवातच न करणे

वाचा – Ganpati Bappa Visarjan Quotes In Marathi

गौतम बौद्धांबद्दल हे माहीत आहे का ? ( Unknown Facts About Gautam Buddha)

गौतम बुद्धांचा पुतळा

Instagram

गौतम बौद्धांबद्दल अशाही काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अगदी माहीत असायला हव्यात अशा आहेत. कदाचित तुम्ही या गोष्टींचा तधीही विचार केला नसेल. जाणून घेऊया गौतम बुद्धांच्या माहीत नसलेल्या गोष्टी (Unknown Facts Of Gautam Buddha) 

  1. गौतम बुद्धांचा जन्म हा एका राजघराण्यात झाला. त्यांनी त्यांचे सगळे राज ऐश्वर्य आणि संसाराचा त्याग लोकांच्या भल्यासाठी केला. 
  2.  गौतम बुद्धाला हे एक उत्तम शिक्षक मानले जाते. त्यांना गुरु मानले जाते. 
  3. गौतम बुद्धांचा पुतळा हा थोडासा जाडआणि गुटगुटीत दाखवला जातो. पण त्यामागे  पूर्वेकडील देशांमध्ये आनंदी असण्याचे लक्षण मानले जाते. 
  4. बुद्ध यांचे लग्न यशोदरा यांच्याशी झाले आणि त्यांना राहुल नावाचा मुलगा देखील होता.
  5. 4 ते 6 व्या शतकात गौतम बुद्ध हे नेपाळमध्ये वास्तव्यास होते. 
  6. बुद्ध धर्मामध्ये आत्महत्या करणे म्हणजे आयुष्य रुपाने दिलेली अमूल्य संधी घालवणे असा होतो. 
  7. जगामध्ये सगळ्यात तीन मोठे पुतळे आहेत आणि ते सगळे गौतम बुद्धांचे आहेत.
  8. थायलंड, बर्मा, श्रीलंका आणि कंबोडिया या ठिकाणी बुद्ध पौर्णिमा ही तीन दिवसांसाठी साजरी केली जाते. 
  9. जगातील दुसऱ्या मोठ्या उंचीचा  हा चीन मध्ये आहे भगवान बुद्धांची ही कोरीव मूर्ती आहे.चीनमध्येच गौतम बुद्धांचे सगळ्यात जास्त अनुयायी आहेत.
  10. सारनाथ येथील धामेक स्तूप या ठिकाणी गौतम बुद्धांनी महत्वपूर्ण शिस्तीची शिकवण दिली.

भगवान गौतम बुद्धांची शिकवण ही आयुष्य पालटून देणारी आहे. ही शिकवण प्रत्येकाने घ्यावी अशी आहे. जर तुम्ही बुद्ध धर्माचे अनुयायी असाल तर तुम्हाला बुद्ध जयंतीची ही माहिती नक्कीच माहीत असायला हवी. 

वाचा – आनंदी राहण्यासाठी 25 कोट्स (Quotes On Happiness In Marathi)

You Might Also Like

Buddha Purnima Quotes in English

Buddha Purnima Significance in English

गौतम बुद्ध सुविचार

महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती

15 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this