ADVERTISEMENT
home / फॅशन
budget friendly shopping and fashion tips

कमी पैशात अशी करा शॉपिंग आणि दिसा स्टायलिश

आजकालचा जमाना हा फॅशन आणि स्टाईलचा आहे. सहाजिकच प्रत्येकाला स्टायलिश आणि फॅशनेबल दिसण्यासाठी काहीतरी करावं असं वाटत असतं. मात्र कमी बजेटमुळे अनेकांना ब्रॅंडेड वस्तू घेणं जमत नाही. मात्र हौसमौज करण्यासाठी प्रत्येकवेळी जास्त पैशांची गरज असतेच असं नाही. कारण एखादा स्टायलिश अथवा ट्रेंडी लुक तुम्ही कमी बजेटमध्येही करू शकता. यासाठी फॉलो करा या बजेट फ्रेंडली फॅशन टिप्स

सेलवर लक्ष ठेवा

फॅशनेबल दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी ब्रॅंडेड वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर त्या ब्रॅंडच्या सेलवर लक्ष ठेवा. कारण सेलमध्ये अशा कपड्यांवर भरघोस सुट देण्यात येते. ब्रॅंडेड कपड्यांची फिटिंग, स्टाईल तुम्हाला हवी तशी असते. फक्त तो सेल काही काळापुरताच असतो. यासाठी अशा सेलवर लक्ष ठेवून राहा. ऑनलाईन असो वा ऑफलाईन अशा सेलमध्ये केलेली खरेदी बऱ्याचदा तुमच्या फायद्याची ठरू शकते.

मिक्स अॅंड मॅच फॅशन करा

स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी प्रत्येकवेळी नवनवीन कपडे खरेदी करायलाच हवेत असं नाही. कारण बऱ्याचदा तुमच्याकडे असलेल्या कपड्यांना मिक्स अॅंड मॅच करून तुम्ही निरनिराळी स्टाईल करू शकता. यासाठी तुमच्याकडे खोडा स्टाईल सेंन्स आणि प्रयोगशीलता असायला हवी. एकाच पॅंटवर तुम्ही निरनिराळे टॉप परिधान करू शकता. निरनिराळ्या स्टाईलिश ब्लाऊजमुळे तुमची एकच साडी हटके दिसू शकते. यासाठी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असलेलं काय काय तुम्ही मिक्स अॅंड मॅच करू शकता याचा विचार करा. 

काळ्या रंगाचा करा वापर

काळा हा एक असा रंग आहे तो सर्व स्कीन टोनवर खुलून दिसतो. शिवाय हा रंग न्युट्रल असल्यामुळे कशावरही मॅच होतो.क्लासिक लुकसाठी तुमच्याकडे काळ्या रंगाची साडी, ब्लाऊज, कुर्ता, ओढणी, टॉप, टी- शर्ट, शर्ट, लेगिन्स, स्कर्ट असायलं हवं. ज्यामुळे तुम्ही त्यावर विविध गोष्टी पेअर करून वापरू शकता. शिवाय प्लेन काळ्या रंगाचे हे कपडे तुम्हाला स्वस्तात मिळतात. तुमच्या वॉर्डरोबमध्ये असे कपडे वर्षानूवर्ष टिकतात. 

ADVERTISEMENT

स्ट्रीट शॉपिंग

मुंबई, पुणे, दिल्ली अशा अनेक शहरांमध्ये स्ट्रीट शॉपिंग करणं प्रचलित आहे. त्यामुळे तुम्ही फॅशनेबल आऊटफिट्स, इअपरिंग्ज, बांगड्या, स्कार्फ, बेल्ट, कॅप्स, पर्स अशा अनेक गोष्टी स्वस्तात या ठिकाणी खरेदी करू शकता. विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला भाव करून वस्तू खरेदी करता येतात. ज्यामुळे तुम्हाला हवी तशी स्टाईल तुमच्या बजेटमध्ये नक्कीच बसवता येते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

05 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT