व्हॅलेंटाईनला (Valentine Day) आपण नेहमी आपल्या जोडीदाराला भेट देत असतो. पण तुम्ही सिंगल असाल तर नक्कीच तुम्हाला वाईट वाटत असणार की आपल्याला कोणी व्हॅलेंटाईन शुभेच्छा देत नाही अथवा व्हॅलेंटाईन गिफ्ट देत नाही. पण कोणी दुसऱ्याने गिफ्ट द्यायची गरज काय? तुम्ही स्वतःदेखील स्वतःला या व्हॅलेंटाईन डे (Valentine Day in Marathi) साठी गिफ्ट देऊ शकता. यासाठी काय काय पर्याय आहेत आम्ही तुम्हाला सांगतो.
व्हॅलेंटाईन गिफ्ट बॉक्स (MyGlamm Valentine’s Gift Box)
दिवस कोणताही असो आपल्याला नटायला आणि सजायला नक्कीच आवडतं. अप्रतिम गिफ्ट बॉक्स आपण स्वतःच स्वतःला भेट म्हणून देऊ शकतो. MyGlamm चा हा व्हॅलेंटाईन गिफ्ट बॉक्स आहे खास. यामध्ये तुम्हाला बॉडी लोशन (MyGlamm SUPERFOODS Watermelon & Aloe Body Lotion), लिपस्टिक (LIT Liquid Matte Lipstick), काजळ (SUPERFOODS Kajal), फ्लेवर्ड ब्लश (K.Play Flavoured Blush) यांचा समावेश असणारा तुमच्या आवडीच्या शेड्सनुसार निवडता येईल. तुम्ही स्वतः तुमची काळजी घेणंही गरजेचे आहे. तसंच हा बॉक्स आहे तुमच्या खिशाला परवडणारा आणि तुम्हाला त्वरीत मिळू शकतो. त्यामुळे या व्हॅलेंटाईनला तयार होण्यासाठी नक्कीच तुम्ही याची ऑर्डर करू शकता
उपलब्ध आहे – MyGlamm.com
किंमत – रू. 1299/-
POPxo चे मेकअप कलेक्शन (POPxo Makeup Collection)
तुम्हालाही ट्रेंडी मिनी बॅग्ज आवडतात का? पण मेकअप कॅरी करण्यासाठी तुम्ही त्या घेणे टाळत असाल तर आता तुमच्या मोठ्या मेकअप प्रॉडक्टला बाय बाय करा. कारण आम्ही असे प्रॉडक्ट निवडले आहेत. जे तुम्हाला अगदी झटपट टचअप करण्यास मदत करतील. हे मेकअप प्रॉडक्ट लाईटवेट आणि तुमच्या बॅगमध्ये सहज राहणारे असतील. याचे उत्तर आमच्याकडे मिळाले आहे. जो तुमचा makeup टचअप अगदी पटकन करु शकतील. याचे उत्तर आहे The Rise & Shine Face & Eye Kit from the POPxo Makeup Collection.
उपलब्ध आहे – MyGlamm.com
किंमत – रू. 459/-
SWAROVSKI- White Rhodium Plated Una Pendant
कोणत्याही महिलेला नाजूक पेंडंट हे सुंदरच दिसते. Swarovski चे दोन सुंदर हंसाचे डिझाईन असणारे अत्यंत नाजूक असे पेंडंट तुम्ही स्वतःसाठी नक्की खरेदी करू शकता. हा तुमच्यासाठी यंदाच्या व्हॅलेंटाईनला चांगला पर्याय आहे. व्हॅलेंटाईनला खास दिसण्यासाठी तुम्ही जर वेस्टर्न आऊटफिट घालणार असाल तर त्यावर हे नाजूक पेंडंट अत्यंत आकर्षक दिसू शकते. तसंच हे प्रेमाचे प्रतीक असून तुमच्या रोजच्या वापरासाठीही उपयुक्त ठरू शकते.
उपलब्ध आहे – Tata CLiQ Luxury
किंमत – रू. 10,500/-
परफ्युम एक उत्तम पर्याय (Studiowest Goddess Eau De Parfum For Women, 50ml)
स्टुडिओवेस्ट गॉडेस परफ्युम तुम्हाला खरेदी करता येईल. व्हॅलेंटाईनच्या दिवशी अधिक काळ टिकून राहणारा असा सुगंध नक्कीच तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय नक्कीच चांगला आहे. ज्या मुलींना फ्रुटी फ्लोरल सुगंध आवडतो त्यांच्यासाठी हे परफ्युम उत्तम आहे. यामध्या सायट्रस आणि प्लम हे जास्वंदीच्या सुगंधासह समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या विशिष्ट दिवशी तुम्ही तुमच्यासाठी अथवा अगदी तुमच्या जोडीदारासाठी हे नक्कीच खरेदी करू शकता.
उपलब्ध आहे – Westside
किंमत – रू 595/-
घरच्यासाठी पर्याय (Westside Home Fragrance Diffuser With Four Reed Sticks)
तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन दिवस घरीच साजरा करणार असाल तर तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. तुमचा मूड चांगला करण्यासाठी fragrance diffuser from Westside चा वापर करा. तुमच्या घरात तुम्हाला आरामदायी आणि सुगंधी वाटावं यासाठी हा डिफ्युझर बनविण्यात आला आहे. यामध्ये लिंबू, बे लिव्ह्ज, सायट्रस आणि मस्कचा वापर करण्यात आला असून तुम्हाला ताजेतवाने वाटावे याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.
उपलब्ध आहे – Westside
किंमत – रू 499/-
तुम्हीही तुमचा व्हॅलेंटाईन या गिफ्ट्सने साजरा करू शकता. कोणी आपल्याला गिफ्ट देईल की नाही देईल याची वाट पाहायची अजिबातच गरज नाही. तुमच्या खिशाला परवडणारी ही गिफ्ट्स नक्कीच तुम्ही मागवून घेऊ शकता.