ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
ड्रेसचा गळा डीप झाला असेल तर कव्हरेजसाठी करा या सोप्या आयडिया

ड्रेसचा गळा डीप झाला असेल तर कव्हरेजसाठी करा या सोप्या आयडिया

अनेकदा आपण घेतलेले रेडिमेड ड्रेस, टिशर्ट किंवा शिवलेल्या एखाद्या ड्रेसचा गळा मोठा होतो. गळा मोठा झाल्यानंतर त्यातून तुमचा कोणताही अवयव विक्षिप्तपणे दिसू नये असे आपल्या सगळ्यांना वाटते. अनेकदा गळ्याकडे धावदोऱ्याने टाके घालून किंवा कपडा, जाळी नेटचा उपयोग आपण मोठे गळे लहान करतो. पण आता प्रत्येक वेळी हे सगळे करणं शक्य होईल असे नाही. म्हणूनच अगदी बजेटमध्ये गळा लहान करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा प्रकार आहे सोपा आणि तुम्हाला त्यासाठी फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. मग पाहुया याचा वापर

कोणत्याही ट्रेडिशनल ड्रेसवर उठून दिसतात मोजडी, तुम्ही ट्राय केलीत का?

असे करा तुमचे डीप नेक कव्हर

तुमच्याही ड्रेसचा गळा झाला आहे का मोठा

shutterstock

ADVERTISEMENT
  • तुम्ही टीशर्ट, पंजाबी ड्रेस अशा कोणत्याही ड्रेसला कव्हर करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बाजारात कॅमिसोल लेस कव्हरेज. (cami lace coverage) मिळतात. 
  • वेगवेगळ्या रंगांमध्ये तुम्हाला हे कव्हरेज मिळतात. लेस पॅटर्न, प्लेन होजिअरी अशा पॅटर्नमध्ये हे नेक कव्हर मिळतात. 
  • हे कव्हरेज तुमच्या ड्रेसला लावायचे नसते तर तुम्ही वापरत असलेल्या ब्रा ला फिट करायचे असते. 
  • या कव्हरेजवर तुम्हाला प्रेस बटण दिलेले असतात. 
  • तुम्ही ब्रा घातल्यानंतर तुम्हाला त्यांनी दिलेली पट्टी ब्रा च्या आतून तुमच्या पुढील भागावर लावायचे असतात. 
  • प्रेसबटण लावल्यानंतर तुम्ही तुमचा कोणताही डीप नेक ड्रेस घालण्यासाठी तयार आहात. 
  • होजिअरी मटेरिअलमध्ये हे ड्रेसेस मिळत असल्यामुळे हे कॅमिसोल कव्हरेज चांगले फिटींग देतात. 
  • वाकल्यानंतर हे कॅमिसोल खाली येण्याचीही शक्यता नसते. कारण ते तुमच्या अंगाला अगदी घट्ट बसतात. 
  • हे कॅमिसोल धुणे फारच सोपे असते. तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये जर हे धुणार असाल तर तुम्ही एका लाँड्री बॅगमध्ये घेऊन तुमचे कॅमिसोल धुवा. 
  • जर तुम्हाला ते चुरगळलेले वाटत असतील तर तुम्ही कमी तापमानावक त्याची इस्त्री करा. 

2020 मध्ये नक्की ट्राय करा हे कॉटन ब्लाऊज.. आाणि दिसा एकदम क्लासी

ऑनलाईन खरेदी करताना

असे दिसतात नेक कव्हरेज

Flipkart

कॅमिसोल सिक्रेट किंवा नेक कव्हर अशा नावाने हा प्रकार मिळतो. जर तुम्हाला हा प्रकार ऑनलाईन घ्यायचा असेल तर तुम्ही चांगली आणि भरोशाची वेबसाईट पाहा. साधारणपणे तुम्हाला दोन ते तीनच्या सेटमध्ये अगदी स्वस्तात हे कॅमि मिळतात. साधारणपणे यामध्ये लाल, काळा, फिकट गुलाबी, स्किन कलर. पांढरा असे शेड मिळतात. त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या कपड्यांच्या रंगाप्रमाणे करायचा आहे. 

ADVERTISEMENT


आता जर तुमचे डीप ड्रेस तुम्ही तुमच्या डीप नेकमुळे फेकून दिले असतील तर आता या कॅमीचा उपयोग करुन तुमचा गळा कव्हर करा आणि सुंदर दिसा.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

16 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT