त्वचेची योग्य निगा राखून, स्कीन केअर रूटिन पाळूनही तुमच्या त्वचेवर पिंपल्स येत असतील तर तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मग लगेच तुम्ही पिंपल्स येण्यामागची कारणं शोधू लागतात. थोडा विचार केला तर तुमच्या जीवनशैलीत यामागची काही कारणं दडलेली असू शकतात. एवढंच नाही जर तुम्हाला मेकअपची आवड असेल आणि तुम्ही अति प्रमाणात क्रीम ब्लश वापरत असाल तर हे देखील यामागचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं. याचा अर्थ तुम्ही क्रीम ब्लश वापरूच नये असा नाही, मात्र त्याचा अति वापर नक्कीच त्रासदायक ठरू शकतो. यासाठी जाणून घ्या यामागचं कारण… यासोबतच जाणून घ्या उन्हाळ्यात मेकअप कसा करावा | Tips For Summer Makeup In Marathi
क्रीम ब्लशमुळे खरंच होतात का पिंपल्स
नॅचरल मेकअप हा सध्या एक ट्रेंडचा विषय आहे. सहाजिकच नॅचरल आणि नो मेकअप लुकसाठी तुम्ही असे प्रॉडक्ट वापरता जे तुमच्या त्वचेमध्ये सहज मुरतील. यासाठीच बऱ्याचदा क्रीम ब्लशचा वापर मोठया प्रमाणावर केला जातो. ज्यामुळे तुमची त्वचा एकसमान दिसते आणि त्वचेवर मेकअप केल्याचा भास होत नाही. मात्र अति प्रमाणात क्रीम ब्लश वापरण्यामुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स ब्लॉक होतात. हळू हळू यामुळे तुमच्या त्वचेवर पिंपल्स निर्माण होण्यास सुरूवात होते.
क्रीम ब्लश वापरताना काय काळजी घ्यावी
क्रीम ब्लश नेहमी चांगल्या ब्रॅंडचे आणि नैसर्गिक घटक असलेले निवडावे. यासोबतच क्रीम ब्लश जास्त वेळ तुमच्या चेहऱ्यावर राहणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजेच काही काळापुरताच असा मेकअप करावा. दररोज क्रीम ब्लश वापरू नये. शिवाय मेकअप आधी आणि नंतर चेहरा स्वच्छ करावा. चेहऱ्यावर क्रीम ब्लश ब्लेंड करण्यापूर्वी तुमचे हात निर्जंतूक करा. जर तुमची त्वचा एक्ने प्रोन असेल तर तेलकट प्रॉडक्ट वापरू नका. पण जर तुमची त्वचा तेलकट असेल तर क्रीम ब्लश पेक्षा पावडर ब्लश वापरणं तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरेल. कोरड्या त्वचेच्या लोकांनी क्रीम ब्लशचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. शिवाय पिंपल्स होण्याचं मुख्य कारण तुम्ही तुमच्या त्वचेनुसार प्रॉडक्ट न निवडणं असू शकतं. यासाठी आधी तुमची त्वचा कशी आहे ते समजून घ्या आणि त्यानुसार ब्लशची निवड करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक