ADVERTISEMENT
home / आरोग्य
मेटाबॉलिझम आणि वजन

मेटाबॉलिझम चांगले असेल तर वजन कमी होते,काय आहे तथ्य

वजन कमी करण्याचा प्रयत्न हा 10 पैकी 7 जण तरी नक्कीच करत असतात. खूप जणांचे वजन हे काही केल्या कमी होत नाही यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यापैकी एक म्हणजे चांगले मेटाबॉलिझम. तुम्ही आतापर्यंत अनेक जाहिराती पाहिल्या असतील त्यामध्ये तुमच्या मेटाबॉलिझमचा सतत उल्लेख केला जातो. चांगले मेटॉबॉलिझम म्हणजे हेल्दी लाईफ. हे मेटाबॉलिझम म्हणजे तुमची पचनशक्ती. तुमची पचनशक्ती चांगली असेल तर तुमचे वजन कमी करण्यास मदत मिळते. असे तुम्हाला ग्रीन टीच्या जाहिरातीमध्ये अनेकदा दिसते. पण यामध्ये खरंच तथ्य आहे का? तुमच्या मेटाबॉलिझमचा आणि तुमच्या वजनाचा काहीही संबंध आहे का? चला जाणून घेऊया मागील तथ्य


मेटाबॉलिझम म्हणजे काय? 

तुम्ही काय खाता? त्यातून तुम्हाला किती उर्जा मिळते हे प्रत्येकाच्या खाण्यावर अवलंबून असते. काही जण खूप खातात पण तरीही त्यांचे वजन कधीही वाढत नाही. त्या उलट काही लोक असे असतात की ज्यांनी जरा एक दिवस वेगळे खाल्ले की, त्यांचे पोट सुटते. वजन वाढते. असे का होते? तुमचे मेटाबॉलिझम यासाठी कारणीभूत असते. तुम्ही खाल्लेले अन्न तुमच्या ॲक्टिव्हिटीमुळे किंवा तुमच्या चांगल्या पचनशक्तीमुळे लवकर कॅलरी रुपात बर्न होत असेल तर त्याचा फायदा तुम्हाला होण्यास नक्कीच मदत मिळते. तुमचे शरीर जितके कार्य करत असेल तितकी तुमची मेटाबॉलिझमची गती अवलंबून असते. ज्यांना जन्मजात चांगले मेटाबॉलिझम मिळत नाही अशांनी त्यांच्या लाईफस्टाईलच्या माध्यमातून ती वाढवून घ्यायला हवी. 

असे वाढवा तुमचे मेटाबॉलिझम

सवयी बदला

आता तुमचे मेटाबॉलिझम चांगले नसेल पण तुम्हाला जर चांगल्या आहारातून आणि चांगल्या सवयीतून ते करणे शक्य असेल तर काही सवयी तुम्ही लावून घ्यायला हव्यात. 

  1. शक्य असेल तर आहार तुम्ही वेगवेगळ्या पोर्शनमध्ये वाटून घ्या. म्हणजे सकाळचा नाश्ता झाल्यानंतर थेट जेवण घेण्यापेक्षामध्येही काहीतरी खा. त्याचा फायदा असा की, तुमची पचनशक्ती ही सतत सुरु राहील तुम्ही खात राहाल तर शरीर त्याप्रमाणे तुम्हाला उर्जा देऊन ॲक्टिव्ह ठेवण्याचे काम करेल. 
  2.  मेटाबॉलिझम चांगले हवे असेल तर आहारात फळ, भाज्या अशा गोष्टी असू द्या. या गोष्टी पचण्यास फारच हलक्या असतात. त्यामुळे पोटही स्वच्छ राहते आणि तुम्ही ॲक्टिव्ह राहता. 
  3. जर शक्य असेल तर तुमच्या आहारात ग्रीन टी चा समावेश करा. कारण त्यामुळेही तुमचे मेटाबॉलिझम चांगले राहण्यास मदत मिळते. त्यामुळे ही गोष्टही समाविष्ट करायला अजिबात विसरु नका. 

आता वजन कमी करण्याआधी तुमचे मेटाबॉलिझम कसे आहे याचा विचारही नक्कीच करा. 

ADVERTISEMENT
28 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT