अवघ्या 29 वर्षांच्या पंजाबी पॉप सिंगर सिद्धू मूझेवालाची (Sidhu Moosewala) रविवारी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण पंजाबमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी त्याच्या हत्येच्या घटनास्थळातील व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत होते. भर उजेडात इतक्या मोठ्या पॉप सिंगर आणि काँग्रेसच्या नेत्याची हत्या कोणी केली? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता या हत्येची जबाबदारी कॅनडातील भारतीय गँगस्टर गोल्डी ब्ररारने घेतली आहे. त्याने चक्क फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिली आहे. आता ही पोस्टदेखील व्हायरल होऊ लागली आहे. नेमंक हे प्रकरण काय? कोण सिद्धू मुझेवाला आणि गँग रायवलरी चला घेऊया जाणून
सिद्धू मुझेवालाची हत्या
सिद्धू मुझेवाला आज कोणतीही सिक्युरीटी न घेता घराबाहेर पडला. पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील एका गावात आल्यावर त्याच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या.या गोळ्या गाड्यांवर इतक्या अंदाधुंद होत्या की, त्यामध्ये सिद्धू मुझेवालाला बऱ्याच गोळ्या लागल्या. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यावेळीच त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या गाडीचे आणि त्याचे काही शेवटच्या क्षणाचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये तो गाडीतच गेला असावा असे दिसत आहे. शिवाय पोलीस तपासात या हत्येसाठी खास A-94 रायफलच्या बुलेट्स ही सापडल्या. त्यामुळे हा फुल प्रुफ प्लॅन अशा प्लॅन होता असे लक्षात येते.
कॅनडा बेस्ड गँगस्टरने मान्य केला गुन्हा
सिद्धूची हत्या होत नाही तोच यासंदर्भात अनेक वेगवेगळ्या पोस्ट येऊ लागल्या. ही हत्या गँगस्टर गोल्डी ब्ररार, लॉरेन्स बिश्णोई यांनी घेतली आहे. या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत ही माहिती देण्यात आली आहे. यात लिहिले आहे की,
मी गोल्डी ब्ररार आणि लॉरेन्स बिश्णोई या हत्येची जबाबदारी घेतो.सिद्धी मुझेवालाचे नाव आमच्या निकटवर्तीय विकी मुद्दुखेरा याच्या हत्येसाठी पुढे आले होते. पोलिसांनी हे माहीत असून त्याला शिक्षा दिली नव्हती. म्हणून आम्ही हे काम केले आहे. उघड उघड गुन्ह्याची कबुली ही त्यांनी फेसबुकवरुन दिली आहे. ही पोस्ट काही काळ व्हायरल होत होती. पण त्यांचे अकाऊंट आता दिसत नाही.
सिक्योरिटी का घेतली नाही
खून झाल्यानंतर काहीच वेळात जी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली त्यामध्ये यावर अधिक प्रकाश पडला कारण सिद्धू मोझेवाला याच्याकडे बॉडीगार्ड (गनमॅन) आणि बुलेट प्रुफ गाडी आहे. असे असतानाही तो रविवारी दुसरी गाडी घेऊन निघाला. त्याच्यासोबत एक व्यक्ती होती जी जखमी झाली.पण सिद्धूला बऱ्याच गोळ्या लागल्या. तो जागीच ठार झाला. त्याच्यासोबत आणखी एक गाडी होती. पण तरीही हा हल्ला थांबण्यास सगळेच असमर्थ ठरले. पण सिद्धूकडे बुलेटप्रुफ गाडी असताना त्याने असे का केले हा प्रश्न आहे. त्याच्या जाण्याने सर्वस्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सिद्धू मुझेवालाच्या हत्येनंतर आता पुन्हा एकादा गँगवॉर होते की काय अशी शक्यता आहे.