ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
बारावीनंतर करिअर

बारावीचा निकाल चांगला नाही, करिअरचे हे पर्यायही आहेत उत्तम

 बारावी हे करिअरच्या दृष्टिकोनातून खूपच महत्वाचे असे वर्ष मानले जाते. याचा निकाल उत्तम लागला की, मग करिअर सुस्साट आहे असे अनेकांना वाटते. काहींच्या बाबतीत ही गोष्ट अगदीच खरी आहे. कारण जर या वर्षी अभ्यास उत्तम झाला तर पुढे काय करता येईल असा अंदाज येतो. पण हुशार यामध्ये मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना वगळता काही मुलांना अभ्यासात फार रस असतो असे नाही. किंवा त्यांना चांगले मार्क्स मिळतातच असे नाही. काहींना अपेक्षेपेक्षा कमी गूण मिळतात. एकदा निकाल लागल्यानंतर त्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही आहे त्या गुणांमध्येच काय बेस्ट करिअर करता येईल का ते पाहायला हवे. कमी गुणांमध्येही चांगले करिअर घडणे हे सहज शक्य आहे. त्यासाठीच शेअर करत आहोत करिअरचे काही पर्याय

डेरी डिप्लोमा

जर तुमचे शिक्षण सायन्समधून झाले असेल तर तुम्हाला डेरी डिप्लोमा हा देखील करता येईल. यामध्ये दुध आणि दुग्धजन्य पदार्थ त्यावर होणारी प्रक्रिया यावर आधारीत हा कोर्स आहे. मुंबई आणि मुंबईबाहेर अनेक ठिकाणी याचे कॉलेजेस आहेत. हा डिप्लोमा असला तरी देखील हा चार वर्षांचा कोर्स आहे. त्यामुळे याच्या पुढे जाऊन नोकरी करता येते किंवा स्पेशलायझेशनही करता येते. त्यामुळे तुम्ही डेरी डिप्लोमा या कोर्सचीही अधिक माहिती घ्या. 

इव्हेंट मॅनेजमेंट

तुम्ही कोणत्याही शाखेतून बारावी झालेले असाल आणि तुम्हाला नोकरीपेक्षा बिझनेसमध्ये रस असेल तर तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटदेखील करु शकता. एखाद्या मोठ्या कार्यक्रमांपासून तर लग्नसमारंभापर्यंत तुम्ही वेगवेगळे इव्हेंट ऑरगनाईज करु शकता. यामध्येही चांगले पैसे कमावता येतात. लग्न, वाढदिवस किंवा अन्य काही कार्यक्रमांना सगळे काही करणे जमत नाही. अशावेळी इव्हेंट मॅनेज करणारी टीम सगळी काम अगदी नीट सगळे सांभाळतात. तुम्हीही एखादी टीम बनवून काम घेऊ शकता किंवा एखादी टीम जॉईन करु शकता.

एअर हॉस्टेस

जर तुमचा आत्मविश्वास चांगला असेल. फिरण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी फ्लाईट अटेंट किंवा एअर हॉस्टेस हा पर्याय खूपच चांगला आहे. या फिल्डसाठी खूप सुंदर असावे लागते असा अनेकांचा गैरसमज आहे. पण असे अजिबात नाही. तुमच्यामध्ये आत्मविश्वास चांगला असेल तर तुम्ही अगदी आरामात हे फिल्ड निवडू शकता. यामध्येही तुम्हाला वाढण्याची संधी असते. हा पर्याय आवडत असेल तर हे देखील ट्राय करु शकता. मुलांनाही यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध असतात. 

ADVERTISEMENT

ॲनिमेशन 

तुमच्यामध्ये क्रिएटिव्हीटी असेल तर ॲनिमेशन हा पर्याय देखील तुमच्यासाठी फारच उत्तम आहे. घरबसल्याही काही काम तुम्हाला हा कोर्स झाल्यानंतर करता येतात. इतेकच नाही तर हल्ली खूप ठिकाणी याची पोस्ट असते. सगळेच सोशल मीडियावर असतात. आपल्या पोस्ट, फोटोज आणि क्रिएटिव्हज चांगले दिसावे असे सगळ्यांना वाटते. अशावेळी ॲनिमेशन हे कामी येते. तुम्हालाही हा कोर्स अगदी हमखास करु शकता. 

वरील सगळे पर्याय हे बजेटमध्ये बसणारे आहेत. मुलांनी हा कोर्स योग्यपद्धतीने केला तर त्याचा फायदा होऊ शकतो. 

14 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT