ADVERTISEMENT
home / मनोरंजन
case-filed-against-marathi-actor-director-mahesh-manjrekar-under-posco-in-marathi

दिग्दर्शक अभिनेता महेश मांजरेकरांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हे नाव हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीला नक्कीच नवे नाही. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटातील काही दृष्यांमुळे आणि या चित्रपटाच्या कथेमुळे वादाच्या भोवऱ्यात महेश मांजरेकर सापडले होते. पुन्हा एकदा मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महेश मांजरेकर यांच्या विरोधात मुंबईच्या माहीम पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याच्या बोल्ड विषयामुळे आणि त्यातील काही दृष्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. तर आता पुन्हा एकदा या गोष्टीने डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. 

पोस्को अंतर्गत झालाय गुन्हा दाखल

महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने ट्वीट करत सांगितले आहे. एएनआय (ANI) यांनी केलेल्या ट्विटनुसार, ‘माहिम पोलिसांनी जी माहिती दिली आहे, त्यानुसार मराठी चित्रपटामध्ये अल्पवयीन मुलांची काही आक्षेपार्ह दृष्य दाखविण्यात आल्यामुळे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांच्याविरूद्ध कलम 292, 34 तसेच पोस्कोचे कलम 14 आणि आयटी कलम 67 आणि 67ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणात न्यायालायने पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत.’ तर महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील बऱ्याच दृष्यांना विरोध करण्यात आला होता आणि सोशल मीडियावरही या चित्रपटाची खूपच चर्चा झाली होती. 

अल्पवयीन मुलांच्या दृष्यावर आक्षेप

‘नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटातील अनेक दृष्य ही अल्पवयीन मुलांवर चित्रीत आहेत. यावरून बराच गदरोळही झाला होता. तर या चित्रपटाला अनेक ठिकाणी विरोध दर्शविण्यात आला होता. मात्र हा चित्रपट अडल्ट असून 18 वर्षांवरील प्रेक्षकांनीच पाहावा असं स्पष्ट मत यावेळी महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले होते. तरीही या चित्रपटाला जोरदार विरोध अनेकांनी केला. पण आता पुन्हा एकदा यासंदर्भात महेश मांजरेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढे काय पावले उचलण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र महेश मांजरेकर यांची यावर कोणतीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत आलेली नाही. तर यातील कलाकारांनीही याबाबात काहीही आपले मत नोंदवलेले नाही. कश्मेरा शाह हीनेदेखील या चित्रपटामध्ये अत्यंत बोल्ड भूमिका साकारली असून याबाबत कोणतेही वक्तव्य तिने केलेले नाही. मात्र अल्पवयीन मुलांच्या या दृष्यामुळे समाजावर विपरीत परिणाम होत असल्याची चर्चा रंगली आहे. तर काही ठिकाणी वेबसिरीजमधील दृष्य चालतात पण चित्रपटाला उगाच विरोध दर्शविण्यात येत असल्याचे मतही मांडले आहे. मात्र आता महेश मांजरेकर यांच्यावर नक्की पुढे काय कारवाई होणार आणि त्यांच्याकडून काय उत्तर असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान सध्या ‘पांघरूण’ या आपल्या दुसऱ्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही महेश मांजरेकर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
24 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT