ADVERTISEMENT
home / xSEO
Hair Loss In Children

लहान मुलांची केस गळती: कारणे, उपाय, टिप्स | Hair Loss In Children In Marathi

आजकाल मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांचे केस गळणे हीदेखील एक गंभीर समस्या आहे. लहान बाळाचे केस गळणे त्रासदायक असतं कारण मुळातच बाळाचे केस नाजूक आणि मऊ असतात. त्यामुळे त्यांच्या केसांची वाढ हळूहळू होत असते. त्यामुळे केसांची वाढ होत असताना लहान बाळाचे केस गळणे (Hair Loss In Children In Marathi) आईवडीलांसाठी चिंतेचे ठरू शकते. बाळाचे अथवा लहान मुलांचे केस गळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. जसं की, बाळाला नियमित अंघोळ न घालणं, केस स्वच्छ न ठेवणं, केसांमध्ये उवा अथवा लिखा असणं, बाहेरील वातावरण आणि प्रदूषण, लहान मुलांनी सतत धुळ आणि मातीत खेळणं, चुकीचा आहार आणि एखादी गंभीर आरोग्य समस्या. या सर्व कारणांमुळे लहान वयातच मुलांचे केस गळू शकतात. लहान मुलांचे केस गळणं ही एक गंभीर समस्या असल्यामुळे त्यावर वेळीच योग्य उपचार व्हायला हवेत. पण त्यासाठी तुम्हाला माहीत असायला हवेत लहान मुलांचे केस गळणे लक्षणं, कारणं आणि घरगुती उपाय

लहान मुलांचे केस गळण्यामागची कारणे | Causes of Hair Fall in Children in Marathi

लहान मुलांचे अथवा लहान बाळाचे केस गळणे यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. यासाठीच केस गळण्यामागचं कारण शोधा आणि योग्य उपचार करा.

लहान मुलांचे केस गळण्या मागची कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात –

1. इंफेक्शन (Infections)

इन्फेकशन हे लहान मुलांच्या केस गळतीचं एक सामान्य कारण आहे. लहान मुलांना कुठे खेळावं अथवा काय तोंडात घालावं याचं ज्ञान नसतं. त्यामुळे ते धुळ, माती असा कसलाच विचार न करता खेळत असतात. मातीत अथवा जमिनीवर मस्त लोळतात. अशातून लहान मुलांना इनफेक्शनची लागण होऊ शकते. खरूज, गजकर्ण असे संसर्ग यातून पसरले जातात. त्यामुळे जर तुमच्या मुलांच्या डोक्यात फोड अथवा जखमा असतील, स्काल्पवर लाल चट्टे असतील, केसांचे पुंजके गळत असतील तर हे इनफेक्शन झाल्याचे लक्षण असू शकते. अशा वेळी पटकन मुलांना वैद्यकीय उपचार मिळणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT
Hair Loss In Children In Marathi
Hair Loss In Children In Marathi

2. शारीरिक कारणे अथवा सवयी (Physical Causes)

लहानपणी केस हे मजबूत असतात परंतु लहान मुलांच्या बालिश सवयींमुळे भविष्यात केस गळती किंवा केस विरळ होण्याची शक्यता असते. म्हणून लहान मुलाच्या सवयी आणि शारीरिक कारणे हे सुद्धा केस गळतीसाठी कारणीभूत ठरू शकत. लहान वयात मुलांना अनेक चुकीच्या सवयी लागण्याची शक्यता असते. कधी मुलं जे पाहतात त्याचं अनुकरण करतात. कारण ती गोष्ट योग्य आहे की अयोग्य हे समजण्याची अक्कल त्यांच्याजवळ नसते.

केस ओढणे, डोकं आपटणे अशा चुकीच्या सवयी मुलांना लहाणपणी लागू शकतात. अशा चुकीच्या सवयींमुळे शारीरिक नुकसान होऊन लहान मुलांचे केस तुटू शकतात (Causes Of Hair Loss In Children In Marathi). जर लहान मुलांचे केस प्रमाणाबाहेर वाढले तर ते त्यांच्या हातात येतात आणि ओढले जातात. यासाठी बाळाचे केस वेळीच लहान करणं गरजेचं आहे. 

3.ऑटो इम्यून विकार (Autoimmune disorder)

मुलांना कधी कधी असे ऑटोइम्यून आजार असतात. ज्यामुळे त्यांचे केस गळण्याची शक्यता वाढते. अलोपेसिया हा असाच एक ऑटोइम्यून विकार आहे. अशा मुलांची रोग प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे केस खूप गळतात. अशा मुलांच्या डोक्यावरचे संपूर्ण केस गळण्यामुळे टक्कल पडते अथवा केस गळलेल्या ठिकाणी टक्कल झाल्याचे पॅच निर्माण होतात. अशा आजारपणात मुलांना योग्य वैद्यकीय उपचारांची गरज असते.

4.पोषणाचा अभाव (Nutritional Deficiency)

आजकाल मोठ्यांचाच आहार चुकीचा असल्यामुळे लहान मुलांच्या आहाराबाबत आजकाल फारसं कुणी जागरूक असलेलं दिसत नाही. त्यामुळे मोठी माणसं खातात तेच लहान मुलं खाण्याचा हट्ट करतात. बर्गर, पिझ्झा, चॉकलेट हे तर मुलं आवडीने खातात. मात्र अशा पदार्थांमुळे मुलांचे योग्य पोषण होत नाही. अपुरे पोषण हे लहान मुलांच्या केस गळण्यामागचे महत्त्वाचे कारण (Causes Of Hair Loss In Children In Marathi)असू शकते. कारण आहारातून मिळणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटिन्स केसांसाठी खूप महत्त्वाचे ठरतात. 

ADVERTISEMENT
Causes Of Hair Loss In Children In Marathi
Causes Of Hair Loss In Children In Marathi

5. आरोग्य समस्या (Medical Conditions)

लहान मुलांना जर काही आरोग्य समस्या असतील तर त्यामुळे त्यांचे केस मोठ्या प्रमाणावर गळू शकतात. यासाठीच लहान मुलांच्या आरोग्याकडे नीट लक्ष द्यायला हवे. केस गळण्यासोबतच त्यांच्यामध्ये आजारपणाची काही इतर लक्षणे आढळत असतील तर त्यांना त्वरीत डॉक्टरांकडे न्यायला हवे. कारण ताप, मानसिक ताण, अपघात, अभ्यासाची  चिंता अशा अनेक कारणांमुळे तुमच्या मुलांच्या केसांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळीच या आरोग्य समस्यांवर उपचार करा. 

6. लहान मुलांच्या केस गळण्या मागील इतर कारणे | Other Causes Of Hair Loss In Children In Marathi

वर दिलेल्या कारणांप्रमाणेच आणखी अनेक अशी कारणं आहेत. ज्यामुळे लहान मुलांचे केस गळणे वाढण्याची शक्यता असते. जसं लहान वयात मुलांना थायरॉईड असंतुलन होणे, मधुमेह होणे, काही विशिष्ट पोषक मुल्यांचा अभाव निर्माण होणे. अशा परिस्थितीत मुलांचे अचानक केस गळू लागतात अथवा केसांचे काही भागातील पुंजके निघू लागतात.

लहान मुलांचे जुलाब साठी उपाय

लहान मुलांचे केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय | Home Remedy For Child Hair Loss In Marathi

लहान मुलांचे केस गळत असतील तर काही घरगुती उपाय करूनही तुम्ही त्यावर घरच्या घरी उपाय करू शकता. 

ADVERTISEMENT

लहान मुलांचे केस गळणे थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय खालील प्रमाणे

1. नारळाचे तेल (Coconut Oil)

Home Remedy For Child Hair Loss In Marathi
Home Remedy For Child Hair Loss In Marathi

हा एक सर्वात उत्तम आणि सोप्पं असा लहान मुलांचे केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय आहे. नारळाचे तेल हे केसांच्या वाढीसाठी अतिशय पोषक असे तेल आहे. नारळाच्या तेलाचे फायदे अनेक आहेत मात्र जर तुमच्या लहान मुलांचे केस गळत असतील तर त्यांच्यासाठी हे तेल अतिशय सुरक्षित आहे (Home Remedy For Child Hair Loss In Marathi). कारण या तेलामुळे तुमच्या बाळाची टाळू लवकर भरून निघतेच शिवाय त्याचे केस मजबूत आणि निरोगी होतात. यासाठी तान्ह्या बाळापासून सर्व वयातील लहान मुलांच्या केसांवर नियमित नारळाच्या तेलाने हळुवार मसाज नेहमी करायला हवा. 

2. ऑलिव्ह ऑईल (Olive Oil)

नारळाच्या तेलाप्रमाणेच ऑलिव्ह ऑईलचे फायदेही अनेक आहेत. ऑलिव्ह ऑईल खाण्यासाठी वापरले जातेच पण ते तुमच्या केस आणि त्वचेसाठीदेखील तितकेच फायदेशीर असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या लहान मुलांचे केस गळणे थांबवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा मसाज करू शकता. ऑलिव्ह ऑईल वापरताना ते नारळाच्या तेलात मिसळून थोडं कोमट करा आणि मग थंड झाल्यावर बाळाच्या केसांना लावून हळुवार हाताने मसाज करा. 

3. पोषक आहार (Nutritious Diet)

पोषक आहार हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जो लहान मुलांमध्ये प्रत्येक गोष्टीत फार महत्वाचा ठरतो. म्हणून पोषक आहार घेणे हा सुद्धा लहान मुलांचे केस गळणे थांबवण्यासाठी घरगुती उपाय आहे. आहार हा माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही जे खाता त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर आणि आरोग्यावर होत असतात. केस आणि त्वचा हा शरीरातील मुख्य भाग असल्यामुळे कुपोषणाचा परिणाम सर्वात आधी या दोन गोष्टींवर दिसू लागतो. त्वचा कोरडी पडणे, केस गळणे हे अयोग्य आहाराचे लक्षण असू शकते. यासाठीच जर तुमच्या मुलांचे केस गळत असतील तर त्यांच्या आहाराकडे नीट लक्ष द्या. त्यांना असे पदार्थ खाण्याची सवय लावा ज्यातून त्यांच्या शरीराला योग्य पोषण मिळेल. 

ADVERTISEMENT

4. अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

लहान मुलांचे केस गळण्यावर घरगुती उपाय- Hair Loss In Children In Marathi
लहान मुलांचे केस गळण्यावर घरगुती उपाय | Home Remedy For Child Hair Loss In Marathi

बाळाचे केस गळत असतील आणि त्यामागे एखादे इनफेक्शन कारणीभूत असेल तर तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगर बाळाच्या केसांना लावू शकता. बाळाच्या अथवा लहान मुलांच्या डोक्यातील उवा अथवा अस्वच्छता कमी करण्यासाठी तुम्ही पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगरचे काही थेंब मिसळून बाळाच्या केसांना लावा आणि अर्धा तासाने बाळाचे केस धुवून टाका. मात्र हा घरगुती उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. 

5. पोषक सप्लीमेंट (Nutritional Supplements)

जर तुमच्या मुलांचे योग्य पोषण झाले नाही तर कुपोषणामुळे शरीरासोबत त्यांच्या त्वचा आणि केसांवर दुष्परिणाम दिसू लागतो. यासाठीच बाळाच्या आहारातून त्याला योग्य प्रमाणात पोषक तत्त्वे मिळणं गरजेचं आहे. बाळाचे केस गळत असतील तर त्याच्या आहारात व्हिटॅमिन्स, झिंक आणि लोह आहे का याची खात्री करा. बाळाला जर आहारातून पोशक गुणधर्म मिळाली नाहीत तर डॉक्टरांच्या सल्लाने त्याला पोषक मुल्यं मिळतील असे सप्लीमेंट सुरू करावे लागतील. 

6. आवळ्याचा रस (Amla Juice)

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अॅंटि ऑक्सिडंट्स, अॅंटि इनफ्लैमटरी आणि अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे केसांची वाढ व्यवस्थित होते (Home Remedy For Child Hair Loss In Marathi). जर तुमच्या लहान मुलांचे केस गळत असतील तर त्यांना आवळ्याचा रस पिण्यास द्या. ज्यामुळे मुलांच्या शरीराचे योग्य पोषण होईल आणि केस गळणे थांबेल. केसांची मुळं मजबूत होण्यासाठी आणि केस योग्य पद्धतीने वाढण्यासाठी आवळा अथवा आवळ्याचा रस नक्कीच फायदेशीर ठरेल. 

लहान मुलांच्या केसांची काळजी घेण्यासाठी टिप्स – Tips For Taking Care Of Children’s Hair In Marathi

लहान मुलांचे केस गळू नये आणि केसांची वाढ योग्य व्हावी यासाठी या टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरतील.

ADVERTISEMENT
लहान मुलांच्या केसांची काळजी घेण्यासाठी टिप्स - Hair Loss In Children In Marathi
लहान मुलांच्या केसांची काळजी घेण्यासाठी टिप्स
  • लहान मुलांचे केस धुताना आणि विंचरताना ते काळजीपूर्वक हाताळा.
  • लहान मुलांचे केस त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या खास कंगवा अथवा हेअर ब्रशनेच विंचरा. 
  • लहान मुलांच्या केसांवर ड्रायर, कर्लर, केमिकल शॅम्पू अशा त्रासदायक गोष्टी वापरू नका.
  • बाळाचे केस धुताना बेबी शॅम्पू सारखे सौम्य शॅम्पू वापरा.
  • लहान मुलांच्या हेअर स्टाईल साजेशा असतील याची काळजी घ्या. फॅशनच्या नावाखाली मुलांच्या केसांवर निरनिराळे चुकीचे प्रयोग करणं टाळा.
  • केस ओले असताना ते विंचरू नका, आधी केस पूर्ण कोरडे करा आणि मगच केसांवरून कंगवा अथवा हेअर ब्रश फिरवा.
  • बाळाचे केस पुसण्यासाठी टॉवेल केसांवर रगडू नका. हळूवारपणे बाळाचे केस पुसा.
  • बाळाच्या केसांवर नियमित तेलाने मालिश करा.
  • मुलांना आहार आणि त्याचे शरीर, केस, त्वचेवर होणारे परिणाम समजावून सांगा, ज्यामुळे ते पोषक आहार खाण्याचा कंटाळा करणार नाहीत.

FAQ’sलहान मुलांची केस गळती: कारणे, उपाय, टिप्स

लोहच्या कमतरतेमुळे मुलांचे केस गळतात का ?

शरीरात जर पुरेशा प्रमाणात लोह नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. लोहच्या कमतरतेमुळे तुमचे शरीर पुरेसं हिमोग्लोबिन तयार करू शकत नाही. ज्यामुळे शरीराला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही आणि केसांच्या वाढीवर याचा परिणाम होतो. 

लहान मुलांचे केस गळणे सामान्य समस्या आहे का ?

लहान मुलांचे केस काही महिन्यांनी ठराविक प्रमाणात गळत असतील तर ते नैसर्गिक आहे. पण जर मुलांचे केस भरपूर प्रमाणात गळत असतील तर हे नक्कीच सामान्य नाही. त्यामुळे मुलांच्या केसांचे आरोग्य राखण्यासाठी योग्य ते उपचार वेळीच करायला हवेत. 

केस लांब असण्याचा मुलांच्या वाढीवर परिणाम होतो का ?

केसांच्या उंचीचा आणि मुलांच्या वाढीचा काहीच संबध नाही. त्यामुळे जर तुमच्या मुलांचे अथवा मुलींचे केस लांब असतील तर त्यामुळे त्यांच्या शारीरिक उंची अथवा वाढीवर परिणाम होत नाही. 

हे हि वाचा,

ADVERTISEMENT

केसांच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी वापरा तुळशीचे DIY मास्क

लग्नापूर्वी केस चमकदार दिसण्यासाठी करा या हेअर ट्रिटमेंट

11 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT