फॅशन काय असते यांचा अंदाज बुधवारी मुंबईत पार पडलेल्या #voguebeautyaward मध्ये दिसून आला. या सोहळ्यासाठी उपस्थित सगळ्या अभिनेत्रींनी सगळ्यांची मनं जिंकली. म्हणजे काहींचा अंदाज हा फारच हॉट होता. जर तुम्ही अद्याप या सेलिब्रिटींचा हा हॉट अंदाज पाहिला नसेल तर मग तुम्ही त्याचा या #voguebeautyaward मधला लुक एकदा तरी पाहायला हवा. कारण तुम्ही यांचा लुक पाहिल्यानंतर नक्कीच म्हणाल ‘हाय खतरनाक, एकदम राडाच’
असा पार पडला #voguebeautyaward सोहळा
#voguebeautyaward चे हे दहावे वर्ष होते. दरवर्षी या सोहळ्याला सेलिब्रिटींची मांदियाळी असते.सेलिब्रिटींच्या लुकवरुन त्यांची जितकी तारीफ केली जाते तितकाच जर त्याचा लुक सो सो असेल तर त्यांना ट्रोल केले जाते. पण यंदा तिघांनी सगळ्यांच्या नजरा खिळवून ठेवल्या. मलाइका अरोरा, आलिया भट, सारा अली खान या तिघांना लगेचच प्रशंसेची पावती मिळाली. याशिवायही अनेकांनी त्यांच्या हॉट अंदाजात लोकांची मने जिंकली.
पाहा तिघींचा अंदाज
आता या तिघांचा अंदाज खास ठरला याचे कारण होते त्याचे अटायर मलायका अरोराने या कार्यक्रमासाठी पांढऱ्या रंगाचा नेटेड हॉट गाऊन घातला होता. फ्रंट स्लीट असलेला हा ड्रेस मिलायकाला चांगलाच उठून दिसत होता. दुसरीकडे आलियाने गोल्ड सिक्वेन्स ड्रेस घातला होता. थोडा पाँचो स्टाईल असलेला हा गाऊन आणि तिचा पोनीटेल यामुळे ती या ड्रेसमध्ये परफेक्ट दिसत होती. तर साराबद्दल अधिक काय सांगायला नको. सारा अनेकांसाठी डार्लिंग आहे. तिने काहीही केले तरी लोकांना आवडते. या कार्यक्रमासाठी तिने काळ्या रंगाचा गाऊन घातला होता. ब्लॅक नेटेड फ्रंट स्लीट, फ्रिल्ड ड्रेसमध्ये ती एकदम क्युट दिसत होती.
प्रेम पॉझजन पंगा’मुळे सुरू झालाय प्रेक्षकांच्या मनात दंगा
बॉईजही नव्हते मागे
आता तारकांचा हा हॉट अंदाज पाहिल्यानंतर बॉलीवूडमध्ये अभिनेते आहेत यांचा विसर पडायला नको. कारण या कार्यक्रमाला आलेले अभिनेतेही एकदम कडक अंदाजात आले होते.म्हणजे त्यांना पाहिल्यानंतर ते ही या कार्यक्रमासाठी एकदम खास तयार आले होते असे म्हणायला हवे. शाहीद कपूर, विकी कौशल हे सध्या सगळ्या तरुणींच्या गळ्याचे ताईत आहेत. कबीर सिंह या चित्रपटावर लोकांनी इतकं भरभरुन प्रेम केलं आहे की, शाहीद कपूर अजूनही तरुणींसाठी त्यांचा कबीर आहे. शाहीदने या सोहळ्यासाठी त्याला चमकवेल असा सुट घातला होता. ब्लॅक आणि सिल्व्हर असं त्याचं कॉम्बिनेशन होतं. तर विकी कौशल ब्लॅक आणि ग्रे मध्ये दिसला.
रितेश – जेनेलियामध्ये नक्की काय बिनसलं, रितेशला दिलं जेनेलियाने सडेतोड उत्तर
या शिवाय क्रिती सनॉन, भूमी पेडणेकर, सनी लिओनी, अमृता अरोरा, शिल्पा शेट्टी अंदाजही एकदम खास होता असे म्हणायला हवे. एकूणच सगळ्यांनी #voguebeautyaward मध्ये त्यांच्या हॉट लुकने धूम माजवली आहे हे मात्र नक्की!
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.