नुकतेच आमिर खान आणि किरण राव (Aamir Khan and Kiran Rao) या जोडीने 15 वर्षाच्या संसारानंतर घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. मात्र दुसऱ्याच दिवशी हे दोघेही आपल्या एका संस्थेच्या कामासाठी एकत्र आले आणि अतिशय व्यवस्थित त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सामान्य माणसासाठी लग्न आणि घटस्फोट या दोन्ही गोष्टी अत्यंत वेगळ्या भावना आहेत. लग्न ठरल्यावर अत्यानंद आणि घटस्फोट होताना अतीव दुःख अशा भावना असणं साहजिक आहे. पण मग सेलिब्रिटींसाठी हे सगळं सहज आणि इतकं साहजिक कसं आहे असा प्रश्न नक्कीच त्यांच्या चाहत्यांना पडतो. आजकाल घटस्फोटांचे प्रमाणही वाढत चालले आहे. खरं तर आपल्याकडे कितीही नाही म्हटलं तरीही सेलिब्रिटींचा आणि चित्रपटांचा खूपच प्रभाव चाहत्यांवर असतो. आपण कितीही नाकारलं किंवा स्वीकारलं तरीही समाजावर याचा परिणाम होतो हे मात्र नक्की!
शिल्पा शेट्टीने घेतली सुपरडान्सरच्या गुरूची फिरकी, उलटवली चाल
तरूणाईवर प्रभाव
aamir khan and kiran rao
डेट करणे, प्रेम करणे, ब्रेकअप होणे, नात्यांमध्ये सतत चढउतार असणे हे सध्या तरूणाईमध्ये जास्तच प्रमाणात दिसून येत आहे. नात्यामध्ये टिकून राहणे अथवा प्रेमात एकमेकांना समजून घेणे हे आता फारच कमी होते आहे असेही सध्या चित्र आहे. चित्रपटांचा प्रभाव आधीपासूनच पिढीवर होता मात्र आता डिजीटलचे वाढते प्रमाण तसंच सेलिब्रिटींनी पटापट लग्न करणे आणि तितक्यात पटापट घटस्फोट घेऊन वेगळं होणं हेदेखील नक्कीच तरूणाईवर प्रभाव टाकत आहे. आपल्याकडे सेलिब्रिटींना आदर्श मानले जाते. कितीही नाही म्हटले तरी कोणता ना कोणता सेलिब्रिटी हा आपल्या प्रत्येकाच्या मनावर एक प्रभाव टाकत असतो. त्यामुळे सेलिब्रिटींनाही बऱ्याचदा अगदी विचारपूर्वक पाऊल उचलावी लागतात आणि निर्णय घ्यावे लागतात. पण लग्न आणि घटस्फोट या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा मात्र सर्वात जास्त उतारचढाव हा या इंडस्ट्रीमध्ये दिसून येतो. आमिर खानने आपल्या पहिल्या पत्नीशी काडीमोड घेऊन जेव्हा किरण रावशी लग्न केले तेव्हाही भुवया उंचावल्या गेल्या होत्या. तर आता असे अचानक काय झाले की, आमिर आणि किरणने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे असाही चर्चांना ऊत आला आहे. पण सर्वात जास्त चर्चा रंगतात ते या सेलिब्रिटींच्या वागण्याच्या. दोन व्यक्ती जेव्हा वेगळ्या होतात तेव्हा इतक्या शांत आणि सहजपणे होऊच शकत नाहीत असं बऱ्याच जणांना वाटतं आणि त्यामुळेच सध्या आमिर आणि किरणच्या नात्यावर उलटसुलट चर्चा होताना दिसून येत आहेत.
आमीर खानच्या घटस्फोटावर मुलगी इराची प्रतिक्रिया,शेअर केली पोस्ट
सेलिब्रिटींमध्ये तणाव का
सर्व काही असूनही नक्की सेलिब्रिटींमध्ये तणाव का असतो आणि त्यांचे घटस्फोट का होतात असाही प्रश्न सामान्य व्यक्तींना येणे साहजिक आहे. पण तुम्ही जितके प्रसिद्ध तितका तुमच्याकडे वेळ कमी. नात्यामध्ये एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांना वेळ देणे अत्यंत गरजेचे असते. केवळ पैसा असून चालत नाही. आपल्यासारख्या व्यक्तींना नेहमी वाटतं की, सेलिब्रिटींकडे पैसा, गाडी, बंगला सर्व काही आहे मग असं असतानाही यांचे घटस्फोट का होतात? अशी नक्की काय कारणं असतात? दोन व्यक्तींनी एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांवर प्रेम करून एकमेकांना वेळ देणे हे नात्यात अत्यंत गरजेचे असते आणि या इंडस्ट्रीत त्याच गोष्टीची कमतरता अधिक भासते. त्यामुळेच बऱ्याचदा घटस्फोट घेतले जातात. अनेक सेलिब्रिटींनी आतापर्यंत घटस्फोट घेऊन दुसरी लग्नं केली आहेत. तर काहींनी दोन लग्न करूनही मोडली आहेत. नाते आणि माणसांना जपणे ज्याला जमले त्यालाच लग्न व्यवस्थित टिकवता येते. त्यामुळे पुढेही या इंडस्ट्रीत हे चालूच राहणार आहे. पण त्याचा परिणाम आपण आपल्या मनावर किती करून घ्यायचा हे मात्र आपले आपणच ठरवायला हवे.
पुन्हा एकदा एकत्र येणार गोविंदा आणि रविनाची सुपरहिट जोडी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक