गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांना होणाऱ्या सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. याचा स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो आणि तिला नैसर्गिकरित्या गर्भधारणा करणे कठीण होते. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगानंतर वंध्यत्व अपरिहार्य असले तरी, एक स्त्री तिची अंडी गोठवून तिची प्रजनन क्षमता टिकवून ठेवू शकते. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग स्त्रीच्या गर्भाशयाच्या ग्रीवेपासून सुरू होतो जो गर्भाशयाचा खालचा, अरुंद भाग असतो. मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) चे काही विशिष्ट प्रकार, लैंगिक संक्रमित संसर्ग हे या कर्करोगाच्या घटनेमागील कारण असू शकतात. शिवाय कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असणे, धूम्रपानीसीरख्या वाईट सवयी आणि लैंगिक संक्रमित संसर्ग (STIs) क्लॅमिडीया, गोनोरिया आणि सिफिलीस हे देखील कर्करोगास कारणीभूत ठरत आहेत. योनीतून होणारा तीव्र रक्तस्त्राव, संभोगानंतर किंवा अगदी मासिक पाळीच्या दरम्यान होणारा रक्तस्त्राव आणि ओटीपोटात वेदना ही लक्षणे एखाद्या स्त्रीला दिसू शकतात. तिच्या स्थितीचे निरीक्षण केल्यानंतर एखाद्या तज्ज्ञाद्वारे उपचारांची शिफारस केली जाईल. परंतु जर कर्करोग प्रगत अवस्थेत असेल, तर स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
अधिक वाचा – महिलांमध्ये वाढतोय गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका
प्रजनन क्षमतेवरील परिणाम
डॉ. भारती ढोरेपाटील, सल्लागार फर्टिलिटी एक्सपर्ट, नोवा आयव्हीएफ खराडी सांगतात की केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो. जर एखाद्याने हिस्टेरेक्टॉमी केली असेल आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात आढळला नाही, तर ती गर्भधारणा करू शकणार नाही. जर अंडाशय काढून टाकले गेले तर ती स्त्री अंडी तयार करू शकत नाही ज्यामुळे वंध्यत्व येते. जर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रेडिएशन थेरपीच्या मदतीने व्यवस्थापित केला गेला तर कर्करोगाच्या पेशींना मारण्यासाठी किरणे एखाद्याच्या अंडाशयांना किरणोत्सर्गाच्या संपर्कात आणतील, त्यांचे नुकसान करतात आणि अंडी तयार करू शकत नाहीत. यामुळे अकाली रजोनिवृत्ती होऊ शकते. ज्याचे गर्भाशय रेडिएशनच्या संपर्कात आले आहे किंवा जो केमोथेरपी औषधे घेत आहे त्याला गर्भाशयात रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे गर्भपात किंवा अकाली मूल जन्म होण्याची शक्यता जास्त असते. लूप इलेक्ट्रोसर्जिकल एक्सिजन प्रोसिजर (LEEP) आणि शंकूच्या बायोप्सी सारख्या गर्भाशय ग्रीवामध्ये असलेल्या पूर्व-कॅन्सेरस पेशींवर उपचार देखील वंध्यत्वास कारणीभूत ठरतात कारण या प्रक्रियेदरम्यान गर्भाशयाच्या मुखाचा भाग काढून टाकला जातो. या प्रक्रियेमुळे गर्भाशय ग्रीवाचा स्टेनोसिस होतो ज्यामुळे शुक्राणू आणि अंडी एकत्र येत नाहीत, एक स्त्री गर्भधारणा करू शकत नाही.
डॉ. प्रितिका शेट्टी, सल्लागार प्रसूती तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, खराडी यांनी सांगितले, “गर्भाशयाच्या कर्करोगाच्या 1a किंवा 1b टप्प्यांदरम्यान रॅडिकल ट्रॅकेलेक्टोमी केली जाऊ शकते ज्यामध्ये संपूर्ण गर्भाशय ग्रीवा किंवा गर्भाशयाच्या मुखाजवळील ऊतक काढून टाकले जाईल. परंतु या प्रक्रियेनंतरही स्त्री गर्भवती होऊ शकते. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा उपचार सुरू करण्यापूर्वी एखाद्याला तज्ञांशी चर्चा करावी लागेल आणि त्यासंबंधीच्या सर्व शंका दूर कराव्या लागतील.
अधिक वाचा – स्वादुपिंडाचा कर्करोग पहिल्या टप्प्यात बरा होऊ शकतो
वंध्यत्वाचा सामना
“गर्भाशयाच्या कर्करोगामुळे वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो जी एखाद्या महिलेकरिता चिंतेची बाब ठरु शकते. तिचे पुनरुत्पादक अवयव यापुढे काम करत नाहीत हे जाणून घेणे स्त्रीसाठी मोठा धक्का असू शकतो. ज्या स्त्रिया त्यांची प्रजनन क्षमता टिकवून ठेवू इच्छितात त्यांना प्रजनन सल्लागाराकडे पाठवले जाते जे त्यांचे मातृत्व अनुभवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकतात. अशा महिलांसाठी एग फ्रीझिंग हा चांगला पर्याय असू शकतो. एग फ्रीझिंग (ओसाइट क्रायोप्रिझर्वेशन.) ही एक पद्धत आहे ज्या दरम्यान स्त्रीच्या अंडाशयातून अंडी घेतली जातात. त्यानंतर फलित नसलेली अंडी भविष्यातील वापरासाठी साठवून ठेवली जातात. ही प्रक्रिया करिअरच्या आकांक्षेमुळे गर्भधारणा पुढे ढकलू इच्छिणाऱ्या महिलेसाठी, प्रजननक्षमतेवर परिणाम करणारे कर्करोग उपचार घेत असलेल्या, रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांसाठी आणि एंडोमेट्रिओसिस असलेल्या महिलेसाठी हा पर्याय योग्य आहे अशी प्रतिक्रिया डॉ ढोरेपाटील यांनी निष्कर्ष काढला.
अधिक वाचा – स्त्रियांमधील कर्करोग समज-गैरसमज
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक