ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
chamkhil-yenyachi-karane-ani-gharguti-upay-in-marathi

चामखीळ येण्याची कारणे, प्रकार, औषध ,घरगुती उपाय

आपल्या शरीराच्या भागावर तीळ असणे म्हणजे सौंदर्याचे एक लक्षण मानले जाते. मात्र याच ठिकाणी जर चामखीळ (Warts) असेल तर मात्र याकडे चांगल्या दृष्टीने पाहिले जात नाही. तीळ आणि चामखीळ यामध्ये नक्कीच फरक आहे. पण चामखीळ म्हणजे नेमके काय (What is Warts in Marathi), चामखीळ येण्याची कारणे काय आहेत (Ghamkhil Ka Yetat), चामखीळ वर औषध आहे का नाही? चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत, चेहऱ्यावरील चामखीळ घालवण्याचे उपाय काय आहेत याबाबत आपण सर्व माहिती या लेखातून घेऊ. तुमच्याही शरीरावर चामखीळ असतील तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. 

चामखीळ येणे म्हणजे काय – What Is Chamkhil In Marathi

चामखीळ येणे म्हणजे काय | What Is Chamkhil In Marathi
चामखीळ येणे म्हणजे काय | What Is Chamkhil In Marathi

अनेक व्यक्तींना चामखीळाचा त्रास असतो. विशेषतः वर्णाने गोऱ्या असणाऱ्या व्यक्तींच्या अंगावरील वा चेहऱ्यावरील चामखीळ पटकन दिसून येतात. पण चामखीळ नक्की का येतात? तर ह्यूमन पॅपोलोमा व्हायरस (HPV) – Human Papillomavirus हे चामखीळ येण्यासाठी कारणीभूत ठरताना दिसतात. या चामखीळामुळे काहीही त्रास होत नाही. मात्र तुमच्या सौंदर्यावर याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो. चामखीळ येणे हे अत्यंत सर्वसामान्य आहे. मात्र काही जणांना हे अंगावर आलेले चालत नाहीत. त्यामुळे त्यांना चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय करावेसे वाटतात. तर काही जण चामखीळ घालविण्यासाठी डॉक्टरांची मदतही घेताना दिसून येतात.  

चामखीळ येण्याची कारणे – Chamkhil Ka Yetat

चामखीळ येण्याचे एकमेव महत्त्वाचे कारण जे आम्ही वर सांगितले आहे आणि ते म्हणजे ह्यूमन पॅपोलोमा व्हायरस (HPV) – Human Papillomavirus. बरेचदा शरीरावर चामखीळ आल्यानंतर आपण ते खाजवतो अथवा आपल्या नखाने ते कोचत राहातो. ज्यामुळे त्यातील व्हायरस शरीराच्या इतर भागामध्येही पसरतो आणि मग शरीरावरील चामखीळ वाढते. त्यामुळे एखादा चामखीळ तुमच्या शरीरावर आला तर तुम्ही नखाने चामखीळ कोचणे टाळणे गरजेचे आहे. तुम्ही चामखीळाला सतत हात लाऊ नये. याशिवाय चामखीळ हा एकाला झाल्यास, दुसऱ्यालाही होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे कपडे वापरणंही तुम्हाला टाळायला हवं. अर्थात एखाद्याचा टॉवेल, कंगवा, अंतर्वस्त्र, रेझर वा कोणत्याही प्रकारचे कपडे दुसऱ्यांचे वापरणं टाळा. 

चामखीळचे प्रकार – Type Of Warts In Marathi

चामखीळचे प्रकार | Type Of Warts
चामखीळचे प्रकार 

हे वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण हो हे खरं आहे. चामखीळचेदेखील प्रकार असतात. चामखीळचे एकूण पाच प्रकार आहेत. याबाबत काही महत्त्वाची माहिती – 

ADVERTISEMENT

कॉमन वॉर्ट्स (Common Warts) – या पद्धतीचे चामखीळ हे शरीरावर कुठेही येतात आणि विशेषतः तुम्हाला हाताच्या बोटांवर अशा पद्धतीचे चामखीळ अधिक दिसून येतात. 

प्लँटर वॉर्ट्स (Plantar Warts) – पायाच्या तळव्यावर येणाऱ्या चामखीळांना प्लँटर वॉर्ट्स असं म्हणतात. या पद्धतीचे चामखीळ हे पायाच्या तळव्यावर अधिक प्रमाणात येतात. 

फ्लॅट वॉर्ट्स (Flat Warts) – चेहरा, पाय आणि हातावर येणाऱ्या चामखीळांना फ्लॅट वॉर्ट्स असं म्हटलं जातं. हे कुठेही येऊ शकतात. हातापायावर येणारे चामखीळ हे त्रासदायक नसतात. 

फिलिफॉर्म वॉर्ट्स (Filiform Warts) – मान, हनुवटीच्या खाली अथवा चेहरा आणि नाकाच्या अवतीभोवती येणाऱ्या चामखीळना फिलिफॉर्म वॉर्ट्स म्हणतात. 

ADVERTISEMENT

पेरीयुंग्वॉल वॉर्ट्स (Periungual Warts) – नखांच्या आत येणाऱ्या चामखीळाला पेरीयुंग्वॉल वॉर्ट्स नावाने ओळखण्यात येते. मात्र याचा नखांच्या वाढीवर परिणाम होतो आणि त्यामुळे नखंदेखील दुखतात. त्यामुळे हे काढण्यासाठी बरेचदा डॉक्टरांची नखं घ्यावी लागते. 

जेनिटल वॉर्ट्स (Genital Warts) –  याशिवाय काही जणांच्या गुप्तांगावरही चामखीळ येतात. याला जेनिटल वॉर्ट्स असं म्हणण्यात येते. महिलांच्या गुप्तांगावर चामखीळ आल्यास गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यताही असते. त्यामुळे अशा ठिकाणी चामखीळ दिसल्यास, महिलांनी अजिबात दुर्लक्ष करू नये. वेळीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

चेहऱ्यावरील चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय – Home Remedies For Chamkhil In Marathi

चामखीळ कोणत्या भागावर आहे यानुसार त्याचे उपचार ठरतात. तर काही वेळा चामखीळ येतात आणि आपोआप निघूनही जातात. काही वेळा चामखीळ वर औषध म्हणून Salicylic Acid युक्त क्रिम लावल्यासदेखील हे निघून जाण्यास मदत मिळते. तर चेहऱ्यावरील चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय आपण या लेखातून पाहूया. चामखीळ घरगुती उपाय – 

कांद्याचा रस चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय केला जाऊ शकतो

कांद्याचा रस चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय
Onion Juice

(Onion Juice To Remove Warts) कांद्याचा रस हा चामखीळ घालवण्यासाठी उत्तम घरगुती उपाय आहे. ज्या ठिकाणी चामखीळ आला आहे, त्या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळ असं दोन वेळा कांद्याचा रस काही वेळ लाऊन ठेवाच. थोड्या वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा. चामखीळ वर औषध म्हणून असं नियमित केल्यास, काहीच दिवसात चामखीळ गळून गेल्याचे तुम्हाला दिसून येईल. 

ADVERTISEMENT

दोरा बांधून चामखीळ घालवली जाऊ शकते

(Use Thread To Remove Warts) दोरा बांधणे हादेखील एक चामखीळ घरगुती उपाय आहे. दोरा बांधल्यामुळे चामखीळ असणाऱ्या ठिकाणचा रक्तप्रवाह कमी होतो आणि थोड्याच दिवसात चामखीळ गळून पडण्यास मदत मिळते. मात्र दोरा बांधताना अगदी करकचून बांधला जाणार नाही आणि त्वचेला त्याचा त्रास होणार नाही याची तुम्हाला काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला त्वचेचा वेगळा त्रास अथवा समस्या सहन करावी लागण्याची शक्यता आहे. 

टी ट्री ऑईल लावून चामखीळ घरच्या घरी घालवा

टी ट्री ऑईल लावून चामखीळ घरच्या घरी घालवा
Tea Tree Oil

(Tea Tree Oil Use For Get Rid Of Warts) टी ट्री ऑईलमध्ये अँटीव्हायरल गुण असतात, जे तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्तीमधील पांढऱ्या पेशी जागविण्यास मदत करतात. एका अभ्यासानुसार, जेव्हा टी ट्री ऑईल तुम्ही चामखीळावर लावता, तेव्हा हे टी ट्री ऑईल पांढऱ्या पेशींना जागृत करते आणि चामखीळ काढण्यास मदत करते. 

  • टी ट्री ऑईल आणि चंदनाचे तेल एकत्र मिक्स करून घ्या 
  • हे मिश्रण तुम्ही रोज चामखीळावर लावा 
  • साधारण 12 आठवडे तुम्ही याचा रोज वापर केल्यास, तुमच्या शरीरावरील चामखीळ जाण्यास मदत मिळते 

लिंबाचा रस लावून चेहऱ्यावरील चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय आहे

लिंबाचा रस चेहऱ्यावरील चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय
Lemon Juice

(Lemon Juice To Remove Warts) लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते. हे चामखीळ होणाऱ्या व्हायरसचा नाश करण्यास उपयोग ठरते. एका अभ्यासानुसार, लिंबाचा रस हा फ्लॅट वॉर्ट्स हटविण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. साधारण सहा आठवडे तुम्ही लिंबाच्या रसाचा चामखीळावर वापर केल्यास, तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येतो. मात्र लिंबाचा कच्चा रस तुम्ही कधीही आपल्या चेहऱ्यावर डायरेक्ट लाऊ नये, यामुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते. 

  • 2 चमचे लिंबाचा रस आणि त्यात काही थेंब मध घालून मिक्स करून घ्या
  • हे मिश्रण तुम्ही चामखीळवर लावा. यामुळे जळजळ होणार नाही
  • काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा आणि असे साधारण सहा आठवडे करा 

कोरफड चा वापर चेहऱ्यावरील चामखीळ घालवण्यासाठी उत्तम उपाय आहे

कोरफड  चेहऱ्यावरील चामखीळ घालवण्यासाठी उत्तम उपाय
Aloe Vera Gel

(Aloe Vera To Get Rid Of Warts) कोरफड जेलमध्ये मॅलिक एसिड असते, जे चामखीळवर प्रभावशाली ठरते. याचे अँटीव्हायरल, अँटिबॅक्टेरियल आणि अँटिबायोटिक गुण चामखीळ त्वचेवर सुकविण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारतात. हे जेव्हा तुम्ही लसूणसह मिक्स करता, तेव्हा याचा अधिक चांगला प्रभाव पडतो. 

ADVERTISEMENT
  • 2-3 चमचे ताजी कोरफड जेल घ्या आणि त्यात लसणीच्या दोन पाकळ्या मिक्स करा 
  • हे मिश्रण चामखीळवर लावा आणि त्यावर एक बँड लावा 
  • रात्रभर हे असंच राहू द्या आणि सकाळी उठल्यावर बँड काढून पाण्याने स्वच्छ धुवा 
  • रोज 2-3 आठवडे असंच करा, चामखीळ निघून जाईल

बेकिंग सोडा – चेहऱ्यावरील चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय आहे

बेकिंग सोडा - चेहऱ्यावरील चामखीळ घालवण्यासाठी घरगुती  उपाय आहे
Baking Soda

(Baking Soda To Remove Warts From Skin) बेकिंग सोड्यामध्ये असणारे अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिसेप्टिक गुण हे चामखीळच्या इन्फ्लेमेशन आणि त्रासातून सुटका देण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये तुम्ही अॅप्पल साईडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) मिसळा. हे तुमच्या त्वचेवरील चामखील सुकवून काढून टाकण्यास लाभदायक ठरते. तसंच याच्या जळजळपासून वाचण्यासाठी तुम्ही यात कॅस्टर ऑईल (Caster Oil) देखील मिक्स करा. 

  • 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा अॅप्पल साईडर व्हिनेगर आणि त्याच प्रमाणात कॅस्टर ऑईल मिक्स करून घ्या 
  • ही पेस्ट तुम्ही चामखीळवर लावा 
  • त्यानंतर हे डक्ट टेपने कव्हर करा आणि रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी साध्या पाण्याने स्वच्छ करा
  • असे साधारण 2 आठवडे करा 

हळद पावडर वापरून चेहऱ्यावरील चामखीळ घरच्या घरी घालवा

हळद पावडर वापरून चेहऱ्यावरील चामखीळ घरच्या घरी घालवा
Turmeric Powder

(Turmeric To Remove Warts) हळद तर त्वचेसाठी उत्तम ठरते हे सर्वांनाच माहीत आहे. हळदीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हळदीमध्ये करक्युमीन असते, हा असा घटक आहे ज्यामध्ये अँटीव्हायरल गुण असतात. त्यामुळे चामखीळ घालविण्यासाठी घरगुती उपाय करताना याचा उपयोग होतो. 

  • ताजी हळद घ्या आणि त्यात ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) मिक्स करा
  • ही पेस्ट तुम्ही चामखीळ असणाऱ्या ठिकाणी लावा 
  • त्यावर रात्रभर बँडेज लावा आणि सकाळी काढून हे धुवा 
  • काही दिवस तुम्ही हेच केल्यास चामखीळ निघण्यास मदत मिळते

चामखीळ काढल्यानंतर काय लक्षात ठेवावे – Precautions For Warts In Marathi

तुम्ही चामखीळ घरगुती उपाय करून काढला असेल, तर तुम्ही चामखीळ काढल्यानंतर काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात – 

  • डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, तुम्ही दिवसातून कमीत कमी दोन वेळा चामखीळ होता ती जागा स्वच्छ धुवावी 
  • तसंच तुम्हाला डॉक्टरांनी एखादे क्रिम वा ऑईन्टमेंट दिले असेल तर ते त्या जागी नक्की लावावे 
  • कोणताही त्रास होऊ नये अथवा त्या जागी दुखापत होऊ नये, म्हणून काही दिवस चामखीळ होता त्याठिकाणी बँडेज लावावे 
  • घाणेरड्या अथवा न धुतलेल्या हाताने कधीही चामखीळ होता त्या ठिकाणी स्पर्श करू नये. तसंच त्याठिकाणी सतत स्पर्श करणे शक्यतो टाळावे 

प्रश्नोत्तरे (FAQs) – चामखीळ येण्याची कारणे आणि घरगुती उपाय

प्रश्नः चामखीळ असल्यास, डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
उत्तरः शरीराच्या संवेदशनशील भागात अर्थात गुप्तांग, तोंड, नाक यावर चामखीळ असल्यास अथवा तुम्हाला मधुमेह असेल आणि चामखीळाचा त्रास होत असल्यास, त्याचप्रमाणे चामखीळमधून पू अथवा रक्त येत असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. 

ADVERTISEMENT

प्रश्नः चामखीळ घालविण्यासाठी उपाय केल्यानंतर त्याचा डाग राहातो का?
उत्तरः तुम्ही जर चामखीळ घालविण्यासाठी सर्जरी केली अथवा घरगुती उपाय करत असाल, तर त्या ठिकाणी डाग राहण्याची शक्यता असते. मात्र हे साधारण दोन आठवड्यात बरं होतं आणि नंतर डाग दिसून येत नाही. 

प्रश्नः मानेवर आलेल्या चामखीळामुळे काही त्रास होतो का?
उत्तरः चेहरा, मान याठिकाणी चामखीळ येणे हे अत्यंत सामान्य आहे. याचा काहीही त्रास होत नाही. मात्र जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांना दाखवावे. 

निष्कर्ष – चामखीळ हा कोणत्याही वयात आणि कधीही त्वचेवर येऊ शकतो. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते त्यांनाच चामखीळ येतात. आपण या लेखातून चामखीळ म्हणजे नेमके काय (What is Warts in Marathi), चामखीळ येण्याची कारणे काय आहेत (Chamkhil Ka Yetat), चामखीळ वर औषध आहे का नाही? चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत, चेहऱ्यावरील चामखीळ घालवण्याचे उपाय काय हे जाणून घेतले आहे. तुम्ही यावर नक्कीच उपाय करून चामखीळ घालवू शकता. 

17 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT