आर्य चाणक्य तक्षशीला विद्यापीठात अर्थशास्त्राचे आचार्य होते. त्याचप्रमाणे ते सम्राट चंद्रगुप्त मोर्यांच्या राज्यसभेतील महामंत्रीही होते. अर्थशास्त्रासोबत राजनीती आणि कूटनीतीवर त्यांचा सखोल अभ्यास होता. जुलमी नंद घराणेशाहीकडून झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी चंद्रगुप्त धनानंद राजाचे कुशासन मोडून अखंड भारताची स्थापना केली. एका सामान्य बालकास तक्षशीला विद्यापीठात शिक्षण दिले आणि पुढे तोच बालक महान योद्धा चंद्रगुप्त मौर्य झाला. आर्य चाणक्यांनी या विज्ञापीठात दिलेले तत्त्वज्ञान चाणक्य नीती या नावाने आजही प्रसिद्ध आहे. चाणक्यांनी चिंतन करून निरनिराळ्या विषयावर ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना आजही त्यांचे मार्गदर्शन आणि ग्रंथ मार्गदर्शक ठरतात. शिवाय आर्य चाणक्यांचे ज्ञान माणसाला दैनंदिन जीवनात सुखी आणि समाधानी होण्यासाठी उपयोगी ठरते. यासाठी जाणून घ्या आर्य चाणक्याचे विचार (Chanakya Quotes Marathi) आणि चाणक्य नीती (Chanakya Niti In Marathi)
आर्य चाणक्यांनी राजनीती, अर्थनीती, कृषी आणि समाजनीतीवर ग्रंथात मांडलेले विचार चाणक्य नीती अथवा दंडनीती नावाने प्रसिद्ध आहेत.
1. माशीच्या डोक्यात आणि विंचूच्या शेपटीत विष आहे, पण वाईट माणसाच्या संपूर्ण शरीरात विष आहे. म्हणून वाईट व्यक्ती सर्वात विषारी आहे
2. मुर्ख लोकांशी वाद घालू नका कारण असं केल्याने आपण आपलाच वेळ वाया घालवतो
3. जसं भय जवळ येईल हल्ला करा आणि त्याचा नाश करा
4. सर्व प्रकारच्या भीतीपेक्षा बदनामीची भीती जास्त मोठी असते
5. अन्नाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही आणि भुकेपेक्षा मोठा दुसरा कोणताच शत्रू नाही
6. मत्सर अपयशाचे दुसरे नाव आहे
7. संकटाच्या वेळी नेहमी बुद्धीचीच परिक्षा होत असते आणि तीच आपल्या कामाला येते
8. एका आंधळ्या व्यक्तीला आरसा देणे व्यर्थ आहे त्याचप्रमाणे एका मुर्खाला पुस्तक देणे व्यर्थ आहे
9. इतरांच्या चुकीतून शिका कारण स्वतःवर प्रयोग करत राहिलात तर अख्खं आयुष्य कमी पडेल
10. देव मुर्तीमध्ये नाही तुमची भावना तुमचा देव आहे आणि तुमचा आत्मा तुमचे मंदिर आहे
वाचा – Motivational Quotes In Marathi
आर्य चाणक्य विष्णुगुप्त मोर्य अथवा कौटिल्य या नावानेही प्रसिद्ध आहेत. यासाठीच जाणून घ्या आर्य चाणक्यांचे अनमोल विचार. तसंच तुम्ही भगवद् गीता सुविचार ही चांगल्या विचारांसाठी नक्कीच वाचू शकता.
1. इतरांसमोर वाका पण तितकंच जेवढं योग्य आहे, नाहीतर विनाकारण समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढेल.
2. भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होई नका, कारण चिंता आणि बैचेनी सोडून वर्तमानकाळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे.
3. तुमच्या शब्दांची ताकद कधीच तुमच्या आईवडिलांवर वापरू नका, विसरू नका… त्यांनी तुम्हाला बोलायला शिकवले आहे.
4. भाग्यपण त्यांनाच साथ देते ज्यांनी कठीण काळातही स्वतःच्या ध्येयाची साथ सोडली नाही.
5. फुलाचा सुंगध फक्त वातावरणात पसरतो, पण चांगल्या व्यक्तीचे गुण सर्व दिशांना पसरतात.
6. जर कुबेरानेही आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्त करण्यास सुरुवात केली तर तोही एक दिवस कंगाल बनेल
7. एखादी व्यक्ती त्याच्या कर्माने मोठी होते जन्माने नाही
8. बुद्धीमान व्यक्ती एक पाय उचलल्यावर दुसरा स्थिर ठेवतो, त्याचप्रमाणे पुढचे ठिकाण पाहिल्याशिवाय पहिले स्थान सोडू नका.
9. वडिलांच्या संपत्तीवर काय गर्व करायचा, मजा तर तेव्हा येते जेव्हा संपत्ती तुमची असते पण गर्व वडिलांना होतो
10. प्रत्येक मैत्रीमध्ये स्वार्थ लपलेला असतो, स्वार्थाशिवाय मैत्री नाही हे कटू सत्य आहे.
आयुष्याला नवी प्रेरणा देणारे ह्रदयस्पर्शी कोट्स
आजच्या धावपळीच्या आधुनिक युगात आर्य चाणक्यांचे हे बहुमोल विचार तुमच्या नक्कीच फायद्याचे आहेत. यासाठी जाणून घ्या चाणक्य नीती (Chanakya Niti In Marathi) मधील हे काही निवडक विचार.
1. एखाद्या व्यक्तीमध्ये एकजरी चांगला गुण असेल तरी त्याचे सर्व वाईट गुण झाकले जातात.
2. कमजोर व्यक्तीशी केलेले शत्रुत्व जास्त त्रासदायक असते, कारण ती व्यक्ती अशा वेळी तुमच्यावर हल्ला करू शकते जिची तुम्ही कल्पनादेखील केलेली नसेल
3. संकटाच्या वेळी नेहमी बुद्धीची परिक्षा होत असते कारण तीच आपल्या कामाला येते
4. मीठाप्रमाण कडवट ज्ञान देणारा तुमचा खरा मित्र आहे, कारण इतिहास साक्षी आहे आजवर मीठात कधीच कीडे झालेले नाहीत.
5. तुमचे विचार व्यक्त करू नका, बुद्धीमान व्यक्तीपासून ते लपवून ठेवा आणि ते काम करण्याचा दृढ प्रयत्न करत राहा
6. दुधात मिसळलेले पाणी पण दूध बनते, गुणी व्यक्तीच्या सहवासात दुर्गुणी व्यक्तीपण गुणी होते
7. नोकराची परिक्षा तेव्हा घ्या जेव्हा तो काम करत नसेल, नातेवाईकाची परिक्षा तेव्हा घ्या जेव्हा तुमच्यासमोर एखादी समस्या असेल, त्याचप्रमाणे मित्राची परिक्षा संकटात आणि पत्नीची परिक्षा आर्थिक संकटात घ्या.
8. माणसाने भुतकाळाचा पश्चाताप करू नये, भविष्याची चिंता करू नये कारण शहाणी माणसं फक्त भुतकाळात जगतात
9. बुद्धीमान शांत राहतात, शहाणी माणसं बोलतात आणि मुर्ख वाद घालतात.
10. मुर्खाचा आदर त्याच्या घरात होते, गावाचा प्रमुख त्याच्या गावात आदरणीय असतो पण विद्वान मात्र जगात कुठेही वंदनीय असतो.
जीवनात यश मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. पण जे प्रयत्नपूर्वक आणि शहाणपणाने जीवनात वाटचाल करतात त्यांच्या वाट्याला यश येतेच. यासाठी जाणून घ्या आर्य चाणक्य यांचे आयुष्यावरील विचार, चाणक्य नीती मराठीतून (Chanakya Niti In Marathi)
1. जीवनात पश्चाताप करणे सोडा असे काहीतरी करा ज्यामुळे तुम्हाला सोडणारे पश्चाताप करतील
2. सुखी जीवनाचे तीन मंत्र… आनंदात कोणतेही वचन देऊ नका, रागात कोणाला उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणता निर्णय घेऊ नका.
3. नियती तुम्हाला प्रत्येक समस्येमधून बाहेर पडण्याची संधी देत असते.
4. सिंहाकडून शिका जे काही कराल ते भव्य दिव्य आणि मन लावून करा.
5. दुसऱ्याच्या चुकांमधून शिका कारण स्वतःच्या अनुभवातून शिकायला जाल तर आयुष्य कमी पडेल.
6.आळशी माणसाचे भविष्य आणि वर्तमान नसते.
7. दृष्ट माणसाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण जसा वाघ शिकार सोडत नाही तसा तो त्याचा मुळ स्वभाव कधीच सोडत नाही.
8. कोणाच्या वाईट काळात त्याच्यावर हसण्याची चूक करू नका, कारण काळ नेहमी चेहरा लक्षात ठेवतो.
9. तुमचे जीवन इतके स्वस्त करू नका की कोणीही तुमच्या जीवनाचा खेळ करेल.
10. तुमचा आनंद तुमच्या शत्रूची सर्वात मोठी शिक्षा आहे.
व्हॉटसअप मेसेज अथवा संदेशामधून तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना प्रोत्साहित करत असता. यासाठीच गुड मॉर्निंग मेसेज अथवा गुड नाईट मेसेजसाठी खास आर्य चाणक्य कोट्स
1. दृष्ट राजाच्या राज्यात न जनता सुखी होते न जनतेचे भले होते, दृष्ट राजा असण्यापेक्षा चांगलं आहे राज्याला राजाच नसावा.
2. कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न नक्की विचारा… मी हे का करतो आहे, याचा परिणाम काय होईल आणि हे कार्य कसे यशस्वी होईल.
3. मजबूत मनाला हरवण्याची ताकत कोणातच नाही
4. साप विषारी नसेल तरी जगण्यासाठी त्याला फुस्स करावंच लागतं
5. मुर्ख लोकांशी वाद घालणे म्हणजे स्वतःचा वेळ खर्च करणे
6. एखाद्याकडे शक्ती नसूनही तो मनाने हरत नाही त्याला हरवण्याची ताकत कोणाकडेच नाही.
7. जर तुम्ही दुःखी असाल तर तुम्ही भुतकाळात जगत आहात हे ओळखा.
8. जर तुम्हाला चिंता सतावत असेल तर तुम्ही भविष्यकाळात जगत आहात हे ओळखाा.
9. जर तुम्ही शांत असाल तरच तुम्ही वर्तमानकाळात जगत आहात.
10. बुद्धीमान व्यक्ती तीच आहे जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही, घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही, पैशांचा अपव्यय करत नाही, आयुष्यात मिळालेला धोका, अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते.
चाणक्यांचे अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारणावरील विचार तुम्हाला नक्कीच प्रोत्साहित करू शकतात. चाणक्य नीती (Chanakya Niti In Marathi) ऐकून तुमच्या जीवनालाही कलाटणी मिळू शकते. यासाठी वाचा हे चाणक्य सुविचार मराठी
1. जो उद्योगी आहे तो कधीच गरीब असू शकत नाही, जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना पाप स्पर्श करत नाही, जे मौन पाळतात ते भांडणात सहभागी होत नाहीत आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात.
2. मुर्खांकडून प्रशंसा मिळवण्यापेक्षा शहाण्याकडून ओरडा खाणे नेहमीच योग्य असते.
3. अव्यवस्था राहणारा माणूस ना समाजात सुखी राहतो ना जंगलात
4. आयुष्यात कोणतेही काम करायला लाजू नका
5. शब्द हे पण भोजन आहे, प्रत्येक शब्दाला स्वतःची चव असते, बोलण्यापूर्वी तुमचे शब्द चाखून पाहा, जर तुम्हाला नाही आवडले तर इतरांना ते वाढू नका.
6. शहाणी व्यक्ती शहाणपणामुळे शांत बसते आणि मुर्खाला वाटते की ती त्याला घाबरून शांत बसली आहे.
7. तुमचं आचरण चांगलं असेल तर तुमचं दुःख कमी होऊ शकतं, कारण मेंदूचा वापर करून तुम्ही अज्ञानाला हरवू शकता आणि माहिती गोळा करून भीतीला संपवू शकता.
8. जीवनात कोणाचे भलं कराल तर तुमचेही लाभ होईल, कारण भल्याचा उलट शब्द लाभ आहे. आणि कोणावर दया कराल तर तो तुम्हाला याद करेल कारण दयाचा उलट शब्द याद आहे.
9. जर नशीबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका काय माहीत तुमच्या नशीबात हेच लिहिले असेल प्रयत्न केल्यावरच मिळेल
10. वाईट व्यक्ती आणि काटे यापासून वाचण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत, एक तर त्यांना पायाखाली चिरडून टाका नाहीतर त्यांच्यापासून दूर राहा
आर्य चाणक्य यांनी प्रेम, मैत्री अथवा नातेसंबधांवरही अनमोल असे मार्गदर्शन केलेले आहे. यासाठीच प्रेमसंबंधांमध्ये जागरूक राहण्यासाठी वाचा प्रेमाबाबत आर्य चाणक्य कोट्स
1. एका राजाची ताकत त्यांच्या शक्तीशाली हातात असते, विद्वानाची ताकत त्याच्या ज्ञानात असते आणि एका स्त्रीची ताकत तिच्या सौंदर्य, तारूण्य आणि मधुर वाणीत असते.
2. संसारात सर्वात मजबूत बंधन प्रेमाचे असते, कारण भुंगा कठीण लाकडाचा भुगा करू शकतो पण तो कोमल कमळाच्या फुलातून जीव गेला तरी बाहेर पडू शकत नाही.
3. ज्याच्यावर तुमचे प्रेम असते तुम्हाला त्याचीच भीती वाटते, कारण प्रेम सर्व दुःखाचे कारण आहे.
4. प्रेम काय आहे, एक अशी नैतिक मादकता ज्यात डुंबून तुम्हाला सर्व काही निरर्थक वाटू लागते. कारण तुमच्यासाठी फक्त आता तीच व्यक्ती महत्त्वाची असते जिच्यावर तुमचे प्रेम असते.
5. कुटुंबावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्तीला नेहमीच भीती आणि चिंतेचा सामना करावा लागतो, कारण सर्व दुःखाचे मुळ प्रेम आहे
6. प्रेमसंबंध, तुमचे उत्पन्न आणि तुमची पुढची चाल नेहमी गुप्त ठेवा.
7. ज्ञान सर्वात चांगला मित्र आहे कारण शिक्षणापुढे तारूण्य आणि सौंदर्य दोन्ही कमजोर आहेत
8. संसारात नेहमी एकाच स्त्रीवर प्रेम करा जिच्यासोबत तुम्हाला विवाह करायचा आहे.
9. ज्या व्यक्तीला तुमचे मोल नाही त्या व्यक्तीसमोर तुमच्या प्रेमाची कबुली देऊ नका. कारण अशी व्यक्ती तुमच्या प्रेमासोबत तुमच्या भावनाही चिरडून टाकेल.
10. प्रेम आणि मैत्री बरोबरीच्या लोकांसोबत करा, कारण राजाकडे नोकरी करणाऱ्याला सन्मान मिळतो, व्यवसायिकासोबत व्यवहार योग्य ठरतो आणि चांगल्या गुणांची स्त्री तिच्या घरात सुरक्षित राहते.
प्रेमात पडलेल्या सर्वांसाठी मराठी लव्ह कोट्स