ADVERTISEMENT
home / Recipes
Chocolate Recipe In Marathi | जीभेचा गोडवा वाढवणाऱ्या चॉकलेट रेसिपीस

Chocolate Recipe In Marathi | जीभेचा गोडवा वाढवणाऱ्या चॉकलेट रेसिपीस

चॉकलेट म्हटलं तरी सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. चॉकलेटमधील गोड आणि स्टॉंग चव पटकन मूड फ्रेश करते. म्हणूनच की काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नेहमी चॉकलेट आवडत असावं. चॉकलेटचा गोडवा नात्यात उतरावा म्हणून सणसमारंभ, कार्यक्रमांना चॉकलेट वाटलं जातं. एखादा खास दिवस तुम्ही चॉकलेट भेट देऊन अधिक स्पेशल करू शकता. वाढदिवसाच्या शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, सणसमारंभाच्या शुभेच्छा देताना त्यासोबत एखादी खास चॉकलेट दिलं तर या शुभेच्छांची रंगत अधिक वाढते. चॉकलेटपासून विविध पदार्थ (Chocolate Recipe In Marathi) बनवता येतात. जर तुम्ही हे पदार्थ तुमच्या हाताने बनवले तर त्या पदार्थांमध्ये तुमच्या प्रेमाचा गोडवादेखील मिसळतो. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. खास होममेड चॉकलेट रेसिपीज (Homemade Chocolate Recipe In Marathi) ज्या तुम्ही घरी स्वतः ट्राय करू शकता. तुमच्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीला खूश करण्याची ही एक छान संधी आहे.

Chocolate Modak Recipe In Marathi | चॉकलेट मोदक रेसिपी

Chocolate Modak Recipe In Marathi
Chocolate Modak Recipe In Marathi

गणपती बाप्पासाठी खास मोदक बनवले जातात. गणेश चतुर्थी, अंगारकी अथवा घरी गणेश पूजन असेल तर उकडीचे अथवा तळलेले मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र बाप्पा हा लहान मुलांचा आवडता देव असल्यामुळे लहानग्यांच्या आवडीनुसार चॉकलेट मोदक बनवण्याचा सध्या ट्रेंड आहे. यासाठी खास चॉकलेट मोदक रेसिपी (Chocolate Modak Recipe).

साहित्य – 

  • 200 ग्रॅम डार्क चॉकलेट स्लॅब
  • 100 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट
  • अर्धी वाटी काजू, बदाम, पिस्ताचे रोस्टेड तुकडे
  • वाटीभर कंडेन्स मिल्क
  • एक चमचा तूप
  • मोदकाचा साचा

चॉकलेट मोदक बनवण्याची कृती –

ADVERTISEMENT
  • सर्वात आधी डबल बॉयलर म्हणजे एका भांड्यात पाणी गरम करा आणि त्यावर रिकामे भांडे ठेवून वाफेच्या उष्णतेवर चॉकलेट स्लॅब विरघळून घ्या.
  • वितळलेल्या चॉकलेटमध्ये कंडेन्स मिल्क, सुकामेवा, नारळाचा किस टाका आणि मिश्रण थंड होऊ द्या.
  • मोदकाच्या साच्यामध्ये मिश्रण भरून फ्रिजमध्ये सेट करा.

Chocolate Ice Cream Recipe In Marathi | चॉकलेट आयस्क्रिम रेसिपी

Chocolate Ice Cream Recipe In Marathi
Chocolate Ice Cream Recipe In Marathi

चॉकलेटप्रमाणेच आयस्क्रिम हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा आणखी एक पदार्थ आहे. विशेष म्हणजे चॉकलेट आईस्क्रिम केल्यामुळे चॉकलेट आणि आयस्क्रिम अशी दुहेरी चव तुम्हाला मिळू शकते. घरात सर्व साहित्य असेल तर तुम्ही कधीही आयस्क्रिम पार्टी करू शकता. 

साहित्य – 

  • दोन कप दूध
  • एक चमचा कस्टर्ड पावडर
  • एक चमचा कोको पावडर
  • एक कप साखर
  • एक कप क्रीम
  • व्हॅनिला इसेंस
  • सुकामेव्याचे तुकडे

कृती –

  • सर्वात आधी दूधात साखर, कोको पावडर आणि कस्टर्ड पावडर मिसळा.
  • दूध आटून अर्धे होईपर्यंत ते उकळून घ्या.
  • मिश्रण थंड झाल्यावर ते ब्लेंडरने घुसळून घ्या.
  • त्यात क्रिम आणि इसेंस मिसळा आणि पुन्हा घुसळून घ्या.
  • आईस्क्रिमचे मिश्रण भांड्यात ओतून ते सेट करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. 
  • सेट होईपर्यंत एक ते दोन वेळा तासभराच्या अंतराने ते पुन्हा बाहेर काढा घुसळा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवा.
  • तिसऱ्यांना सेट करण्यासाठी ठेवल्यानंतर दोन ते चार तासात आईस्क्रिम सेट होतो
  • सुकामेवा टाकून सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.

असे बनवा घरीच तुमचे आवडते आईस्क्रिम केक (Ice Cream Cake Recipe In Marathi)

ADVERTISEMENT

Chocolate Milkshake Recipe In Marathi | चॉकलेट मिल्कशेक रेसिपी

Chocolate Milkshake Recipe In Marathi
Chocolate Milkshake Recipe In Marathi

चॉकलेट मिल्कशेकचं नाव ऐकताच तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार चॉकलेट मिल्कशेक पिण्याची मजाच निराळी आहे. घरात लहान मुलं असतील त्यांना जेवणाच्या मधल्या वेळी अथवा बच्चेकंपनीच्या पार्टीसाठी तुम्ही नक्कीच असं मिल्कशेक (Chocolate Milkshake Recipe In Marathi) बनवू देऊ शकता.

साहित्य – 

  • एक ग्लास दूध
  • दोन स्कुप चॉकलेट आयस्क्रिम
  • दोन चमचे चॉकलेट सिरप

चॉकलेट मिल्कशेक बनवण्याची कृती –

  • दूध थोड्यावेळ फ्रिजमध्ये ठेवून थंड करा.
  • मिक्सरमध्ये एक स्कुप आयस्क्रिम आणि एक ग्लास दूध घ्या.
  • मिक्सरमध्ये ते छान ब्लेंड करा आणि त्यामध्ये थोडं चॉकलेट सिरप टाका पुन्हा ब्लेंड करा.
  • एका ग्लासामध्ये मिल्कशेक घ्या. त्यावर एक स्कुप चॉकलेट आईस्क्रिम आणि चॉकलेट सिरप टाका आणि सजवा.

Chocolate Sandwich Recipe In Marathi | चॉकलेट सॅंडविच रेसिपी

Chocolate Sandwich Recipe In Marathi
Chocolate Sandwich Recipe In Marathi

सॅंडविचचे विविध प्रकार तुम्ही नक्कीच ट्राय केले असतील पण चॉकलेट सॅंडविच खाण्याची मजाच निराळी आहे. पारंपरिक आणि मॉर्डन टच देत ही फ्युजन रेसिपी लहानांसह घरातील मोठ्या मंडळींनाही नक्कीच आवडू शकते. शिवाय चॉकलेट सॅंडविच (Chocolate Sandwich Recipe In Marathi) बनवणं खूप सोपं आहे.

ADVERTISEMENT

साहित्य –

  • दोन ब्रेडच्या स्लाईस
  • चॉकलेट स्लॅबचे तुकडे
  • काजू, बदाम, पिस्ताचे रोस्टेड तुकडे
  • चीज स्लाईज
  • बटर

चॉकलेट सॅंडविच बनवण्याची कृती –

  • चॉकलेटचे लहान तुकडे करून घ्या.
  • ब्रेड स्लाईसवर चॉकलेटचे तुकडे आणि सुकामेव्याचे तुकडे पसरवा.
  • दोन स्लाईसमध्ये एक चीज स्लाईस ठेवा.
  • दोन्ही स्लाईस बंद करा आणि ग्रिल करा.
  • दोन्ही बाजूंना बटर लावा आणि क्रिस्पी करा.
  • दोन भाग करून सर्व्ह करा.

Hot Chocolate Recipe In Marathi | हॉट चॉकलेट रेसिपी

Hot Chocolate Recipe In Marathi
Hot Chocolate Recipe In Marathi

हिवाळ्यात सतत तुम्हाला काहीतरी गरम गरम पेय प्यावं असं वाटत असतं. कारण गरम पेयामुळे तुम्हाला थंडी कमी लागते. सतत चहा अथवा सूप पिण्याचा कंटाळा आला असेल अशा वेळी हॉट चॉकलेट छान पर्याय ठरू शकतो. ट्राय करा ही हॉट चॉकलेट रेसिपी. 

साहित्य –

ADVERTISEMENT
  • एक ग्लास दूध
  • अर्था कप कोको पावडर
  • दोन चमचे साखर
  • एक चमचा क्रीम
  • व्हॅनिला एक्सट्रॅक्ट एक चमचा
  • व्हिपिंग क्रीम एक चमचा 

हॉट चॉकलेट बनवण्याची कृती –

  • एका भांड्यात दूध, साखर, कोको पावडर आणि क्रीम गरम करा
  • दूध उकळल्यावर गॅस बदं करा
  • गॅस बंद केल्यावर व्हॅनिला एक्सट्रॅक्ट एक थेंबभर टाका.
  • एका ग्लासात हॉट चॉकलेट सर्व्ह करा वरून व्हिपिंग क्रीमने सजवा.

Dairy Milk Chocolate Recipe In Marathi | डेअरी मिल्क चॉकलेट रेसिपी

Dairy Milk Chocolate Recipe In Marathi
Dairy Milk Chocolate Recipe In Marathi

डेअरी मिल्क खाणाऱ्यांना तशाच चवीचं चॉकलेट नेहमी खायचं असतं. वास्तविक तुम्ही घरच्या घरी असं चॉकलेट बनवू शकता. ज्यामुळे लहान मुलांना होममेड चॉकलेट (Homemade Chocolate Recipe In Marathi) खाण्याची सवय लागेल. ज्यामुळे बाहेर गेल्यावर मुलं चॉकलेटसाठी तुमच्याजवळ हट्ट करणार नाहीत.

साहित्य –

  • एक कप मिल्क पावडर
  • एक कप बटर
  • व्हॅनिला इसेंस
  • एक कप पिठी साखर
  • एक कप कोको पावडर

डेअरी मिल्क चॉकलेट बनवण्याची कृती –

ADVERTISEMENT
  • डबल बॉयलर तयार करा. एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा आणि दुसरे भांडे त्याच्यावर ठेवा.
  • पाणी उकळल्यावर वरच्या भांड्यात बटर विरघळवा, त्यात पिठी साखर, कोको पावडर, मिल्क पावडर टाका 
  • आणि मिक्स करा.
  • सर्व साहित्य एकजीव झालं आणि बटर विरघळलं की ते डेअरी मिल्कच्या शेपच्या आकाराच्या चॉकलेट मोल्डमध्ये सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.

Chocolate Brownie Recipe In Marathi | चॉकलेट ब्राऊनी रेसिपी

Chocolate Brownie Recipe In Marathi
Chocolate Brownie Recipe In Marathi

चॉकलेट ब्राऊनी बनवून ठेवल्यास एन वेळी पार्टीच्या वेळी तुमची गडबड होणार नाही. गरम गरम ब्राऊनी सोबत थंडगार आयस्क्रिम अथवा गरम कॉफी खूपच छान लागते. त्यामुळे मित्रमैत्रिणींसोबत गेट टुगेदर अथवा घरी अशाच गप्पा मारताना हा परफेक्ट मेन्यू ठरेल.

साहित्य –

  • एक कप मैदा
  • एक चमचा पिठी साखर
  • एक चमचा कोको पावडर
  • एक चमचा दूध
  • एक चमचा तेल
  • अक्रोडचे रोस्टेड तुकडे
  • एक चमचा चॉकलेट सिरप

चॉकलेट ब्राऊनी करण्याची कृती –

  • मैदा, पिठी साखर, कोको पावडर आणि अक्रोडचे तुकडे एकत्र करा
  • त्यात दूध, चॉकलेट सिरप, तेल मिसळा आणि एकजीव करा.
  • ग्रिसिंग आणि डस्टिंग केलेल्या केकच्या भांड्यात मिश्रण टाका आणि 180 सेल्सि अंशावर केक पाच मिनीट बेक करा
  • चॉकलेट ब्राऊनी गरम असताना सर्व्ह करा.

यासोबतच वाचा चॉकलेट केक रेसिपी मराठीत, घरच्या घरी बनवा सोपे केक (Chocolate Cake Recipes In Marathi)

ADVERTISEMENT

Chocolate Doughnut Recipe In Marathi | चॉकलेट डोनट रेसिपी

Chocolate Doughnut Recipe In Marathi
Chocolate Doughnut Recipe In Marathi

डोनट हा आजकाल मुलांच्या पार्टीमधील खास मेन्यू असतो. कारण मुलांना डोनट्स खूप आवडतात. डोनट विविध प्रकारचे बनवता येतात मात्र तुम्ही घरच्या घरी चॉकलेट डोनट्स बनवू शकता. 

साहित्य –

  • एक कप दूध
  • पाव कप कोको पावडर
  • दोन चमचे दूध
  • एक वाटी पिठी साखर
  • दोन वाटी मैदा
  • यीस्ट
  • पाव चमचा बेकिंग पावडर
  • एक चमचा बटर
  • चवीपुरतं मीठ
  • व्हॅनिला इसेंस
  • तेल

चॉकलेट डोनट बनवण्याची कृती –

  • एका भांड्यात एक चमचा पाणी आणि एक चमचा दूध एकत्र करून गरम करा. त्यात एक चमचा पिठी साखर आणि यीस्ट अॅक्टिव्हेट करा
  • मैदा, बेकिंदग पावडर, बटर आणि मीठ टाकून यीस्टमध्ये पीठ मळून घ्या.
  • गरज असेल तर थोड्या कोमट पाण्याचा वापर करा
  • मळलेले पीठ ओल्या फडक्याखाली ढाकून ठेवा
  • एक ते दोन तासांनी ते फुलून वर येईल
  • पीठाचे एकसमान गोळे करा आणि त्याला लाटून डोनटचा आकार द्या
  • मध्यभागी भोक पाडण्यासाठी बाटलीचे झाकण वापरा
  • बेकिंग ट्रेमध्ये त्यांना दोन तास ठेवा. पुन्हा फुगून ते वर येतील.
  • पंधरा मिनीटे ओव्हनमध्ये गरम करा आणि मग गरम तेलात तळा
  • तळलेल्या डोनटवर साखर, कोको पावडर आणि व्हॅनिला इसेंसने तयार केलेले सिरप अथवा तयार चॉकलेट सिरप ओता.

Chocolate Muffins Recipe In Marathi | चॉकलेट मफिन्स रेसिपी

Chocolate Muffins Recipe In Marathi
Chocolate Muffins Recipe In Marathi

चॉकलेट मफिन्स बनवून ठेवणे हा कोणत्याही पार्टीसाठी उत्तम पर्याय राहिल. कारण हे मफिन्स तुम्ही आधीच बनवू शकता ज्यामुळे तुमची ऐनवेळी घाई होत नाही. शिवाय चॉकलेट मफिन्स कोणालाही आवडतात. त्यामुळे प्रत्येकासाठी वेगळे पदार्थ तुम्हाला बनवावे लागत नाहीत.

ADVERTISEMENT

साहित्य – 

  • चाॉकलेट चिप्स
  • तीन चमचे कोको पावडर
  • अर्धा कप मैदा
  • अर्धा चमचा बेकिंग पावडर
  • पाव चमचा बेकिंग सोडा
  • पाव कप बटर
  • अर्धा कप पिठी साखर
  • अर्धा कप दही

चॉकलेट मफिन्स बनवण्याची कृती –

  • मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळून घ्या
  • एका भांड्यात बटर, पिठी साखर फेटून घ्या.
  • त्यात दही आणि मैद्यासह सर्व साहित्य टाका.
  • मिश्रण एकजीव करा.
  • मफिन्स मोल्डमध्ये बॅटर टाका आणि त्यावर चॉकलेट चिप्स वरून सजवा.
  • ओव्हनमध्ये दोनशे सेल्सि अंशवर वीस ते पंचवीस मिनीटे बेक करा.

बिस्किटांपासून बनवा मस्त केक, बिस्किट केक रेसिपी (Biscuit Cake Recipes In Marathi).

Chocolate Pudding Recipe In Marathi | चॉकलेट पुडिंग रेसिपी

Chocolate Pudding Recipe In Marathi
Chocolate Pudding Recipe In Marathi

घरी कोणी घरी खास पाहुणे येणार असतील तर तुम्ही पुडिंगचा बेत करू शकता. पुडिंग विविध गोष्टींपासून बनवता येतं. पण सर्वांना आवडणाऱ्या चॉकलेट पुडिंगची मजा निराळी आहे.

ADVERTISEMENT

साहित्य –

  • दोन कप मैदा
  • दोन कप पिठी साखर
  • अर्धा कप कोको पावडर
  • एक ब्राऊन साखर
  • दोन चमचे बेकिंग पावडर
  • चवीपुरतं मीठ
  • अर्धा कप दूध
  • एक कप बटर
  • चॉकलेट इसेंस
  • गरम पाणी

चॉकलेट पुडिंग करण्याची कृती –

  • मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर मिक्स करा.
  • त्यामध्ये पिठी साखर आणि मीठ टाका.
  • दूध, बटर आणि चॉकलेट इसेंस मिक्स करा.
  • एका भांड्यात बॅटर टाका वरून ब्राऊन साखर, कोको पावडर आणि गरम पाणी मिक्स केलेलं साहित्य टाका
  • सर्व साहित्य एकत्र करा पण मिसळू नका
  • पंचेचाळिस मिनीटे पुडिंग बेक करा.
  • बेक झाल्यावर वरचा भाग सेट होईल आणि खालील भाग ब्राऊनीप्रमाणे दिसेल
  • हवं तर वरून आईस्क्रिमने सजवा आणि सर्व्ह करा.

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या या चॉकलेट रेसिपीज (chocolate recipe in marathi) तुम्हाला कशा वाटल्या आणि यातील कोणती रेसिपी तुम्ही ट्राय केली त्याचे फोटोज आम्हाला कंमेटमध्ये अवश्य पाठवा. 

17 Feb 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT