ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
choose-right-jeans-for-ladies-with-big-bums-or-hips-in-marathi

हिप्स मोठे असतील तर जीन्स निवडा अशा पद्धतीने

जीन्स (Jeans) असे आऊटफिट आहे जे सर्वात जास्त घातले जाते. बाजारामध्ये महिलांसाठी जीन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक महिलेच्या शरीराचा आकार वेगळा असतो, त्याप्रमाणे त्यांना जीन्स घालणे गरजेचे आहे अन्यथा दिसायला खराब दिसते. विशेषतः ज्या महिलांचे हिप्स (Big Hips) मोठे असतील त्यांना जीन्स निवडताना काळजी घेण्याची गरज आहे. चुकीच्या आकाराची जीन्स निवडल्यास, तुमच्या शरीराचा खालचा भाग अधिक मोठा दिसू शकतो. त्यामुळे मोठे हिप्स असणाऱ्या महिलांना कशा पद्धतीची जीन्स निवडावी याची महत्त्वाची माहिती. 

क्लासिक स्ट्रेट जीन्स (Classic Straight Jeans)

क्लासिक स्ट्रेट जीन्स तुम्हाला बाजारात रेग्युलर फिट (Regular Fit) मध्ये अगदी सहजपणाने कोणत्याही ब्रँडमध्ये मिळू शकते. या जीन्सच्या पाय, मांडी आणि हिप एरियाजवळ एक चांगली स्पेस असते, त्यामुळे तुम्ही स्वतःला अत्यंत चांगल्या पद्धतीने स्टाईल करू शकता. तसंच तुमचे हिप्स मोठे असतील अथवा सरळ असतील तर ही जीन्स कोणत्याही पद्धतीच्या शरीराच्या आकारावर चांगली दिसू शकते. 

हाय राईज स्किनी जीन्स (High Rise Skinny Jeans)

आजकाल हाय राईज बॉटम्सची फॅशनदेखील खूप ट्रेंडमध्ये आहे. हा ट्रेंड डेनिम जीन्समध्येदेखील फॉलो करण्यात येते आहे. तुम्हाला बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हाय राईज जीन्स मिळेल. वास्तविक जीन्स कमेरच्या वर घातली जाते, त्यामुळे कमरेच्या खालचा आकार दिसून येतो. तुम्ही बेलबॉटम स्टाईलमध्ये हाय राईज जीन्स घाला जर तुमचे हिप्स मोठे असतील. यामुळे तुमचे पाय अधिक लांब दिसतील आणि हिप्स लहान दिसतील. तुमचे कुल्ले कमी आकाराचे दाखविण्यात ही टिप तुमची नक्की मदत करू शकते. तसंच तुम्ही या जीन्समध्ये थोड्या बारीकही दिसता. 

स्ट्रेच जीन्स (Stretch Jeans)

स्ट्रेच जीन्स ही घालण्यास सोपी असते आणि याचं फिटिंगदेखील उत्तम असतं. बाजारात खूप स्ट्रेच जीन्स मिळतात. तुमचे हिप्स मोठे असतील तर स्ट्रेच जीन्स ही तुमच्यासाठी अत्यंत योग्य ठरते. या जीन्समध्ये व्हॉल्युम नसतो आणि ही जीन्स घातल्यानंतर कंबर बारीक दिसते. हिप्सचा भाग मोठा असेल तर तो कमी दिसण्यासाठी तुम्ही स्ट्रेच जीन्स घालू शकता. 

ADVERTISEMENT

या चुका करू नका 

  • कधीही तुम्ही सैलसर जीन्स तुमच्यासाठी निवडू नका. यामुळे तुमच्या हिप्सचा भाग अधिक मोठा दिसून येतो. त्यामुळे ही चूक अजिबात करू नका 
  • लाईड शेडपेक्षा तुम्ही नेहमी गडद रंगाची डेनिम जीन्स निवडा. गडद रंग तुमच्या शरीरातील फॅट लपविण्यास मदत करतो
  • तुम्ही तुमच्या जीन्सची निवड करताना तुम्ही वेस्टलाईन रूंद ठेवायला हवी. यामुळे हिप्स साईज कमी दिसून येते. ही टीप तुम्ही नेहमी लक्षात ठेवा

हिप्स मोठे असल्यास, तुम्हाला या सोप्या टिप्सचा नक्कीच फायदा होऊ शकतो. तुम्ही सर्वात जास्त सोपी टिप वापरू शकता ती म्हणजे जीन्स शिऊन घ्या. तुम्ही तुमच्या मापाची योग्य जीन्स शिऊन घेतल्यास तुम्हाला आरामदायीदेखील वाटतं आणि त्रासही होत नाही. याशिवाय बूट कट, वाईड लेग पँट, मॉम जीन्स, कॅरेट फीट या जीन्सचे पर्यायदेखील उत्तम ठरतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

09 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT