उन्हाळा आला की, घरी विशेष तयारी केली जाते. सगळ्यात आधी उन्हापासून वाचण्यासाठी एसीचे सर्व्हिसिंग केले जाते. पंख्यावर धूळ साचली असेल तर ते स्वच्छ केले जातात. कपाटातील सगळे सुती कपडे वापरण्यासाठी काढले जातात. घरातील जेवणात बदल केले जातात. पण तुमच्या बेडशीटचे काय? तुम्ही उन्हाळ्यात कोणत्या मटेरिअलची बेडशीट वापरता? कोणता रंग निवडता? बेडशीटची काळजी कशी घेता? या संदर्भातच आपण अधिक जाणून घेणार आहोत. मग करायची का सुरुवात ?
उन्हाळ्यात हे पदार्थ खाणे टाळा
म्हणून बदला बेडशीट
तुम्ही बेडवर किमान ७ तासांची झोप घेता. कितीही एसी लावला तरी तुमच्या मानेला, पाठीला,काखेत घाम आल्यावाचून राहत नाही. घामामुळे प्रत्येकवेळी तुमची बेडशीट ओली होत राहते. कालांतराने तुमचा घाम सुकला आणि बेड शीट नाही बदलली तर तो तुम्हाला येणारा घाम त्यात झिरपत राहतो. शिवाय तेथे सूक्ष्म जीवाणू तयार होण्याची भिती आलीच.
उदा. तुम्ही बेडवर झोपल्यानंतर तुम्हाला खाज येऊ लागली की, समजून जावे की बेडशीट बदलण्याची वेळ आलेली आहे. सर्वसामान्यपणे उन्हाळ्यात साधारण ४ ते ५ दिवसांनी बेडशीट बदलावी. जर तुम्हाला खूप घाम येत असेल पण रोजच्या रोज बेडशीट बदलणे शक्य नाही.अशावेळी तुम्ही झोपत असलेल्या ठिकाणी दुसरी एखादी सिंगल बेडशीट अंथरावी त्यावर बेबी पावडर शिंपडावी. त्यामुळे तुमचा घाम त्या चादरीपुरता राहिल. शिवाय बेबी पावडरमुळे छान सुंगधही दरवळत राहिल.
बेडशीटची निवड
उन्हाळ्यात आपण फिकट रंगाचे कपडे घालतो. ते यासाठी की, गडद कपडे उष्णता शोषून घेतात. अगदी तोच नियम बेड शीट संदर्भात लागू होतो. तुम्ही घराच्या आत असलात म्हणून काय झाले? जर तुम्ही गडद रंगाच्या बेडशीट घातल्या तर त्या उष्णता शोषून घेतात. ज्याने तुम्हाला अधिक गरम होऊ लागते. त्यामुळे फिक्कट पिवळा,बेबी पिंक, शक्य असल्यास पांढरा शुभ्र, आकाशी असे रंग निवडा. असे रंग जे तुमच्या डोळ्याला थंडावा देतील आणि तुमच्या शरीरालासुद्धा
तुमचे इनरवेअर एक्सपायर्ड तर झाले नाहीत ना?
कॉटनच सगळ्यात बेस्ट
अनेकांचा चकचकीत अशा बेडशीट आवडतात. इतर ऋतुंचे ठिक आहे. पण उन्हाळ्यात कॉटन किंवा लीननच्या चादरींची निवड करा. अगदी उशींची कव्हरेसुद्धा कॉटनची असू द्या. कॉटन बेडशीटमुळे तुमच्या बेडरुममध्ये हवा खेळती राहते. शिवाय प्रसन्न वाटते. त्यामुळे सिंथेटिक बेडशीट शक्यतो या काळात वापरु नका. त्या छान धुवून बांंधून वर ठेवून द्या.
बेडशीट धुताना
आता बेडशीट सारख्या बदलायचे आहेत म्हटल्यावर फार महागड्या बेडशीट नव्याने घेऊ नका आणि त्या धुताना विशेष काळजी घ्या. बेडशीट वॉशिंगमशीनमध्ये धुण्यापेक्षा तुम्ही एका बादलीत कमीत कमी डिटर्जेंट घेऊन त्यात ५ ते ७ मिनिटे भिजवून ठेवा. पाण्यातून काढून ती थेट वाळत घाला. ओली बेडशीट जर तुम्ही तुमच्या बेडरुमच्या खिडकीत वाळत घातली तर तुम्हाला बेडरुममध्ये थंडावा जाणवेल.
उशांच्या कव्हरर्सची घ्या काळजी
बेडशीटसोबत उशीच्या कव्हर्सची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण जर तुमचे केस लांब असतील तर तुम्हाला माहीतच असेल की, तुमच्या केसांचा घाम सतत उशीला लागत राहतो. त्यामुळे उशीच्या कव्हरलादेखील घामाचा दर्प येऊ लागतो. उशीच्या कव्हरची काळजी घ्यायची म्हटली तर तुम्ही उशीवर एक पातळ कव्हर घालून ठेवा आणि त्यावर आणखी एक कव्हर घालून ठेवा. म्हणजे उशीही खराब होणार नाही. तुम्हाला हाताने कव्हर धुणे शक्य असेल तर त्याला अंगाचा साबण लावा.
( फोटो सौजन्य- Shutterstock)